Wednesday, 9 July 2014

पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे अनावृत्त पत्र !

प्रति,
मा. पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांस,
सप्रेम नमस्कार !
सर्वप्रथम भारताच्या १६ व्या लोकसभा निवडणुकीत आपण अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल आपले हिंदु विधीज्ञ परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन! भोंदू निधर्म्यांना आणि त्यांच्या 'धर्मनिरपेक्षता' नावाच्या अंधश्रद्धेला तडा दिल्याबद्दल देशातील समस्त हिंदू आपले अत्यंत आभारी आहेत.
आजवर काँग्रेसने भाजपला जातीयवादी संबोधून स्वत: मात्र घाणेरडे राजकारण केले आहे. या निवडणुकीत भारतातील हिंदु मतदारांनी काँग्रेसला आणि काँग्रेसच्या राजकारणाला तिलांजली दिली. हे केवळ मोदी यांच्या लाटेमुळे शक्य झाले, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यात संशयाला किंवा वादाला निश्चितच जागा नाही. आपल्या संपूर्ण प्रचारात कोणत्याही धार्मिक सूत्राला हात न घालता केवळ विकासाच्या सूत्रावर आपण भर दिला. मतांकरता अल्पसंख्यांकांच्या पुढे राज्यकर्त्यांनी लोळण घेण्याच्या ६५ वर्षांच्या परंपरेला तोडून आपण नवीन पायंडा पाडला आहे.
त्यामुळेच देशातील हिंदु मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही, याची खात्री आम्हाला आहेच; पण हिंदूबहूल भारतात हिंदूंच्या भावनांचा आदर राखून आपण आपल्या राज्यकारभाराच्या जोरावर या देशातील स्थान पक्के करू शकता, असे वाटते. देशातील काही सूत्रांवर प्रथम प्राधान्याने निर्णय घेणे देशहिताच्या आणि हिंदुत्वाचे शासन घट्ट होण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे, असे वाटते. हे निर्णय घेतल्याने देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाहीच. उलट ही प्रकरणे तातडीने मार्गी लागल्याने कायदा आणि सुव्यवस्था यांना पोषक असेच वातावरण निर्माण हाईल. 'धर्मनिरपेक्षते'च्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लाड पुरवण्याची काँग्रेसची (कु)संस्कृती नष्ट होऊन पारदर्शक प्रशासन आल्याची खात्री देशातील जनतेला निश्चित पटेल.
ही सूत्रे पुढीलप्रमाणे

हिंदूंनो, मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाला रोखण्यासाठी या निकालाचा आधार घ्या !

चर्चकडून होणार्या ध्वनीप्रदूषणावर बंदी घालणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ! 
 श्री. संजीव पुनाळेकर
     सध्याच्या काळात धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात असतांनाही त्याविषयी योग्य आणि कडक कारवाई करण्याचे सामाजिक दायित्व असणारे सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे. मशिदींतून वेळी-अवेळी केला जाणारा भोंग्यांचा कर्णकर्कश आवाज हे त्याचेच एक उदाहरण आहे. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी कायदा होऊन अनेक दशके लोटली असतांनाही सामान्य जनतेला त्यांची इच्छा नसतांना या भोंग्यांचा आवाज प्रतिदिन नियमित ५ वेळा ऐकावा लागतो. कित्येकदा जागरूक नागरिक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यास पोलीसच स्वत:ची हतबलता व्यक्त करतात. 'आम्ही कारवाई केल्यास वरिष्ठांना आवडणार नाही', असे म्हणतात. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यास 'बाकीच्या नागरिकांना त्रास होत नाही; तुम्हालाच का होतो ?' असा निलाजरा प्रश्न विचारतात. काही वेळेस तक्रारदाराने वरिष्ठांकडे दाद मागण्यास जाऊ असे सांगितल्यास 'न्यायालयात जा'. 'इथे येऊ नका'. अशी उद्धट उत्तरेही पोलिसांकडून मिळतात. 'शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये' अशी एक म्हण आहे. न्यायालयीन प्रक्रिया ही फार विलंबाची आणि खर्चिक आहे. त्यामुळे अशावेळी संबंधित तक्रारदार निराश होतो आणि मशिदींच्या भोंग्यांचा जाच असाच चालू रहातो. तामिळनाडूमधील काही जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन संघटितपणे न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर एका बलाढ्य धर्मसंस्थेला न्यायालयापुढे कसे झुकावे लागले, या विषयीची कहाणी सुरस आणि स्फुरणदायी ठरेल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ख्रिस्ताब्द २००० मध्ये दिलेल्या निवाड्याची माहिती येथे देत आहे. - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई. 

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना वैद्यकीय उपचार आणि घरगुती अन्न मिळावे, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत आलेले अनुभव !

श्री. विक्रम विनय भावे
      राजस्थान पोलिसांनी ऑगस्ट २०१३ मध्ये पूज्यपाद संतश्री आसारामबापू यांना बलात्कारासारख्या कथित गुन्ह्याखाली अटक करून त्यांचा छळ करणे चालू केले होते. पू. बापू सध्या जोधपूर येथील कारागृहात असून जोधपूर येथील सत्र न्यायालयातच त्यांचा खटला चालणार आहे. मागील ७ मासांपासून ते कारागृहातच आहेत; मात्र कारागृहातील सर्वसामान्य बंदीवानांना मिळणार्या काही प्राथमिक सुविधादेखील त्यांना दिल्या जात नसल्याचे लक्षात आले. या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांनी लढा दिल्यानंतर न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना घरगुती अन्न देण्याचा आदेश दिला. या न्यायालयीन प्रक्रियेत हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांना आलेले अनुभव येथे देत आहोत. - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई. 

काँग्रेस म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजे काँग्रेस!

श्री. विक्रम विनय भावे
काँग्रेस म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजे काँग्रेस, हे समीकरणच झाले आहे. देशाच्या जनतेला जे दिसते, त्या गोष्टी हिंदुत्ववादी उघडपणे बोलतात; पण काँग्रेसी लोकांना ते उघडपणे बोलता येत नाही. मग त्यांच्या मनातील सल कशी बाहेर पडते, त्याचे उदाहरण म्हणजे हा लेख आहे. - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
हिंदूंना आणि हिंदूंच्या नेत्यांना नावे ठेवणे, 
हे काँग्रेसींच्या जीवनाचे ध्येय !
२४ मार्चच्या दैनिक लोकमतमध्ये राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार आणि लोकमतचे संपादक विजय दर्डा यांचा लेख वाचला. मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे मोदी, असे समीकरण मांडण्याचा प्रयत्न दर्डा यांनी त्यांच्या लेखात केला आहे. या लेखाचा मूळ उद्देश मोदी यांना नावे ठेवणे, हाच आहे. अर्थात्च एक कट्टर काँग्रेसी नेता हिंदूंना आणि त्यांच्या नेत्यांना शिव्या देणे, हे स्वत:च्या जन्माचे ध्येय मानत असतो. मानोत बापुडे !

मग महंमद अफझलला पंतप्रधान का नाही केले ?

श्री. विक्रम भावे
      राष्ट्र्रवादाच्या सूत्रावरून काँग्रेसशी तलाक घेतलेल्या आणि नंतर पुन्हा काँग्रेसच्याच पडवीत संसार थाटून स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्या शरच्चंद्ररावजी पवार साहेबांची पुण्याजवळील कुठल्यातरी माळावर त्यांच्या कन्यारत्नाच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. या सभेत शरच्चंद्ररावजी म्हणाले की, नरेंद्र मोदींची उमेदवारी म्हणजे संसदीय लोकशाहीवरील आक्रमण आहे. पुढे भाषणात हे म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला आहे. 
मग महंमद अफझलला पंतप्रधान करायचे होते ! 

भारतीय संस्कृतीवर घाला घालणारा विकृत इतिहास मांडल्यामुळे अली जे. नाटकाला विरोध !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर
     हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांचा महंमद अली जीना यांचे उदात्तीकरण असलेल्या अली जे. या नाटकाला विरोध का आहे, हे जाणून घेण्यासाठी जर्मनीहून आलेल्या ब्रिंडुसा या महिला पत्रकाराने हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची नुकतीच मुंबई येथे मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित भाग आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. 
      (एकाही भारतीय पत्रकाराला जे वाटले नाही, ते एका जागरूक जर्मन महिला पत्रकाराला वाटून त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या राष्ट्रीय सचिवांची मुलाखत घेतली. यावरून भारतातील पत्रकारिता ही पराकोटीची असंवेदनशील आणि मरणासन्न अवस्थेला पोहोचली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. भारतीय पत्रकार अशी जागरूक पत्रकारिता शिकतील, तो सुदिन ! - संपादक) 
नाटकातून मुसलमान चांगले असून हिंदुबहुल भारत हा संधीसाधूंचा देश आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न ! 

हिंदु नरसिंहाने काढला काँग्रेसी हिरण्यकश्यपूचा कोथळा !

'गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ', अशी माध्यमांची अवस्था ! 
श्री. विक्रम भावे
     १६ मे या दिवशी भारतातील लोकसभाग निवडणुकीचे निकाल लागले. निवडणुका होण्यापूर्वीच ज्या गोष्टीची शक्यता उघडपणे वर्तवली जात होती, ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. देशभरात काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस नावाच्या अपशकुनी लोकांच्या टोळ्यांचा दारूण पराभव झाला. देशात मोदींची लाट आहे का, असा प्रश्न् माध्यमे बेंबीच्या देठापासून ज्याला त्याला विचारून सनसनाटी निर्माण करू पहात होती. काही ठिकाणी माध्यमे शेवटच्या क्षणापर्यंत मोंदींच्या गुजरात मॉडेलवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करत होती; मात्र जसे निवडणुकीचे निकाल लागून मोदी लाटेकडे जनतेचा कौल दिसू लागला, तसे माध्यमांतील सरड्यांनी दोन्ही काँग्रेसवर टीका करायला प्रारंभ केला होता. मोंदींना स्पष्ट बहुमत मिळाल्यावर जी माध्यमे मोंदींवर काल रात्रीपर्यंत टीका करत होती, ती मोंदींच्या बाजूने उभी राहून आधीच्या राज्यकर्त्यांना उद्देशून यांना सत्तेचा माज चढला होता, वगैरे काय काय बोलू लागली. माध्यमांच्या या वागण्यावरून खेडेगावाकडील एक म्हण आठवते ती म्हणजे 'गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ.' अगदी अशीच अवस्था माध्यमांची झालेली दिसत आहे. 

पोलिसांकडून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची होणारी चौकशी आणि त्याविषयीची सूत्रे !

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
        नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर काही हिंदूद्रोही राजकारणी आणि त्यांचे स्तुतीपाठक पोलीस अधिकारी यांनी सहस्रावधी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा छळ केला. रात्री-अपरात्री बोलावून घेणे, धमक्या देणे, महिलांचे छायाचित्र घेणे यांसारख्या अनेक प्रकारांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तोंड दिले. ही हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली आहे, हे गृहित धरून अन्वेषण केल्यामुळे इतर कोणत्याही अंगांचा विचार करण्याची पोलिसांना आवश्यकताच भासली नाही.
आता हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआयकडे) गेल्यामुळे दाभोलकरांचे खरे वैरी कोण होते, त्यामागे आर्थिक, व्यक्तीगत, मालमत्ताविषयक, परदेशातून येणार्‍या निधीविषयक अथवा कोणा कार्यकर्त्यांकडून वसूल केल्या जाणार्‍या खंडणीविषयक काही सूत्रे होती का, याचे अन्वेषण होण्याची आशा आता निर्माण झाली आहे.
- अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

काँग्रेसची वधस्तंभाकडे वाटचाल !

श्री. विक्रम विनय भावे
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. अशा काँग्रेसला आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आणखी एका धक्का देऊन तिला वधस्तंभाकडे नेले पाहिजे.
- श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
काँग्रेसचे अपराध
देशावर सहा दशके सत्ता गाजवतांना काँग्रेसला सत्तेचा माज आला होता. काँग्रेस मदोन्मत्त झाली होती. त्या उन्मादात काँग्रेसने अनेक पापे केली.
सामाजिक गोष्टीत तर सोडाच; पण राष्ट्राच्या संरक्षणाच्या बाबतीतही बोफोर्स सारखे घोटाळे करून काँग्रेसने राष्ट्रद्रोह केला आहे. मुसलमनांना तुष्ट करण्यासाठी हिंदूंना जेथे जेथे म्हणून तुच्छ लेखता येईल, तेथे तेथे काँग्रेसने हिंदूंचा मानभंग केला. हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी जे जे म्हणून करणे शक्य होत होते, ते ते काँग्रेस (म्हणजे समस्त काँग्रेसवाले) करत राहिले. ही सर्व पापकर्मे प्रत्यक्षपणे करणार्‍या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह इत्यादी लोकांना मूकसंमती देणार्‍या मनमोहन सारख्या हतवीर्य लोकांनाही त्याचे तितकेच पाप लागते.

दाभोलकरांच्या हत्येचे अन्वेषण काँग्रेसच्या पोपटाकडे !

हिंदूंनो, सावधान !
श्री. विक्रम भावे
         'डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजे सी.बी.आय.कडे सोपवले आहे. त्याप्रमाणे सी.बी.आय.ने अज्ञाताच्या विरोधात गुन्हाही दाखल केल्याचे वृत्त वाचनात आले. सी.बी.आय. म्हणजे काँग्रेसचे पोपट आहे, हे जगजाहीर आहे. अशा यंत्रणेकडून कशा प्रकारचे अन्वेषण होईल, याची कल्पना येते. - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
काँग्रेसच्या हस्तकांच्या माध्यमातून त्रासाची शक्यता ! 
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाले असले, तरी तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने देशावर राज्य केले आहे.
या साठ वर्षांच्या काळात काँग्रेसने पेरलेले विष बरेच खोलवर झिरपलेले आहे. अनेक शासकीय कार्यालयांत आणि अन्वेषण यंत्रणांत काँग्रेसचे दलाल त्यांची स्थाने पक्की करून बसलेले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसने तिची माणसे मुद्दाम घुसवलेलीही आहेत. त्यांचा वापर करून काँग्रेस सत्ताधारी भाजपला त्रास देण्याचा प्रयत्न भविष्यात करील. मोदी त्याला पुरून उरतील, अशी आशा आहे.

'हिंदु आतंकवाद' या शब्दप्रयोगाच्या विरोधात केलेले कार्य !

तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या समाज, राष्ट्र आणि धर्म 
यांच्या हिताचे कार्य  या उद्बोधन सत्रातील अभिभाषणे !
श्री. विक्रम भावे
१. विषयप्रवेश 
 'हिंदु आतंकवाद' किंवा 'भगवा आतंकवाद', हे तथ्यहीन शब्दप्रयोग राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांच्या अभद्र युतीतून जन्माला आले आहेत. या शब्दप्रयोगांचे खंडण करण्याच्या हेतूने मी माझे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार 'मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे 'हिंदु आतंकवाद' या शब्दप्रयोगाच्या विरोधात कसे कार्य होत आहे, याविषयी मी आपल्याला सांगणार आहे.
तत्पूर्वी प्रथम माझी पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. 'आम्ही पाचपुते' या मराठी नाटकात महाभारताचे विडंबन केले जात होते. या नाटकाला हिंदु जनजागृती समितीने जनजागृती, मूकनिदर्शने आदी सनदशीर मार्गांनी विरोध केला होता. जून २००८ मध्ये महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील 'गडकरी रंगायतन' या नाट्यमंदिरात या नाटकाचा प्रयोग होणार होता. हा प्रयोग चालू होण्यापूर्वी नाट्यमंदिराच्या वाहनतळात एक स्फोट झाला. धर्मश्रद्धेचे भंजन करणार्‍या या नाटकाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध असल्याने महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या सदस्यांचे पूर्वग्रहदूषितपणे अन्वेषण केले. माझ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली. या काळात पोलिसांनी आम्ही न केलेला अपराध स्वीकारावा, यासाठी आमचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. हा छळ किती अमानुष स्वरूपाचा होता, हे शब्दांत वर्णन करणेही कठीण आहे. राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून 'हिंदु आतंकवादी' म्हणून माध्यमांत आणि समाजात आमची प्रतिमा निर्माण करण्यात आली. आमच्यापैकी चार जण निर्दोष सुटले असून माझ्यासह दोन जण जामिनावर सुटले आहेत, तेही १० वर्षांपैकी निम्मी, म्हणजे ५ वर्षांची शिक्षा भोगून झाल्यानंतर !  

खलीफाचे साम्राज्य : तिसर्‍या महायुद्धाकडील वाटचालीतील मैलाचा दगड

श्री. विक्रम भावे
इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी इराक आणि सीरियाचा काही भाग जिंकून त्याला खलीफाचे राज्य घोषित केले आहे. इराक नंतरचे लक्ष्य भारत असल्याची वृत्ते पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत.
१. सुन्नी आतंकवाद्यांनी जिंकलेला प्रदेश 
खलीफाचे राज्य म्हणून घोषित !
इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी गेले काही दिवस हिंसाचार केला आणि इराक अन् सीरिया या दोन्ही देशांचा काही भाग जिंकून घेतला, असे त्यांचे म्हणणे आहे. हा जिंकलेला प्रदेश 'खलीफाचे साम्राज्य' म्हणून त्यांनी घोषित करून अबु बक्र बगदादी हा पहिला खलीफा असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे.
दोन्ही देशांचा जिंकलेला प्रदेश मिळून नवीन 'इस्लामिक स्टेट', असे त्याचे नामकरण केले आहे. मुसलमान नागरिकांनी लोकशाही किंवा पाश्चिमात्य कल्पनांचा निषेध करून नव्या खलीफाचे नेतृत्व मान्य करावे, अशी घोषणाही या 'इस्लामिक स्टेट'ने ऑनलाईन केली आहे. रमजानच्या पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. खलीफाचे राज्य इस्लामी कायद्यानुसार चालेल, असे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच नवीन खलीफाच्या राज्यात जुन्या अमिराती, संघटना, राज्ये, समूह आणि त्यांचे सैनिक हे काहीही अस्तित्वात रहाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

Thursday, 22 May 2014

हिंदू नरिंसहाने काँग्रेसी हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला


गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ अशी माध्यमांची अवस्था : १६ मे या दिवशी भारतातील लोकसभाग निवडणुकीचे निकाल लागले. निवडणुका होण्यापूर्वीच ज्या गोष्टीची शक्यता उघडपणे वर्तविली जात होती, ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. देशभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या अपशकुनी लोकांच्या टोळ्यांचा दारूण पराभव झाला. देशात मोदींचा लाट आहे का, असा प्रश्न माध्यमे बेंबीच्या देठापासून ज्याला-
त्याला विचारून सनसनाटी निर्माण करू पहात होती. काही ठिकाणी माध्यमे शेवटच्या क्षणापर्यंत मोंदींच्या गुजरात मॉडेलवर तोंडसूख घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जसे निवडणुकीचे निकाल लागून मोदी लाटेकडे
जनतेचा कौल दिसू लागला. तसे माध्यमांतील सरड्यांनी दोन्ही काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली होती. मोंदींना स्पष्ट बहुमत मिळाल्यावर जी माध्यमे मोंदींवर काल रात्रीपर्यंत टीका करीत होती, ती मोंदींच्या बाजूने उभी राहून आधीच्या राज्यकत्र्यांना ‘यांना सत्तेचा माज चढला होता’, वगैरे पर्यंत बोलू लागली. माध्यमांच्या या वागण्यावरून खेडेगावकडील एक म्हण आठवते ती म्हणजे ‘गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ.’ अगदी अशीच अवस्था माध्यमांची झालेली दिसत आहे.

Monday, 24 March 2014

या वेळी तरी हिंदूंची निवड चुकू नये !


    काही दिवसांपूर्वी देशाचे अती म्हातारे पंतप्रधान मनमोहन सिंह (?) यांनी तोंड उघडले. बेरोजगारी, महागाई अशा समस्या सोडविण्यास आम्ही कमी पडलो, अशी प्रांजळ कबूली देण्याचे नाटक त्यांनी केले. त्याच वेळी मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर देश बरबाद होईल, अशी टीकाही त्यांनी मोंदींवर केली. मोदींवर टीका करतांनाच त्यांनी राहूल गांधींची देशाचा भावी पंतप्रधान म्हणून जाहीरातही करून घेतली.......

दूरगामी परिणाम, एक उदाहरण : एखादी गोष्टी घडल्यावर समोर दिसणारे प्रत्यक्ष दृश्य म्हणजे ती घटना असे मानणे चुकीचे आहे. त्या घटनेचे सर्वांगीण दूरगामी परिणामही विचारात घ्यावे लागतात. अल-वैâदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिच्या ‘ट्वीन टॉवर्स’वर आक्रमण करून ते पाडले. त्यात हजारो अमेरिकी नागरिकांचे बळी गेले. पडलेल्या इमारतीचा ढीगारा आणि धूळ व धूर. हे जरी प्रत्यक्ष दिसणारे दृश्य असले तरी त्याचे न दिसणारे परिणाम त्याहून भयंकर होते. या आक्रमणात मारल्या गेलेल्या लोकांची अनेक मुले (जी देशाची भावी पीढी आहे.) अनाथ झाली, अमेरिकेचे अनेक नागरिक सतत असुरक्षिततेच्या भावनेत आजही जगत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शेअर्सची किंमत घसरली, वाहतूक आणि प्रवासी विमान कंपन्यांना १ लक्ष ७० हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करावे लागले. एका प्रख्यात हॉटेल कंपनीच्या २० हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करावे लागले. हे त्या घटनेचे दूरगामी परिणाम आहेत.

Wednesday, 5 March 2014

समाजवाद्यांमधील नव-पॅâसिस्ट


    मुंबईच्या फोर्ट परिसरात फूटपाथवर मांडून ठेवलेली जुनी पुस्तके आणि नियतकालीके चाळून एखादे छानसे पुस्तक मिळवण्यासाठी हिंडतांना अवचितपणे कॉम्रेड गोविंद पानसरे अमृत महोत्सव गौरविका हाती लागली. इतर गौरविकांप्रमाणे या गौरविकेचे स्वरूप रटाळ आणि एकसुरी वाटले नाही. बर्‍याच परिचित आणि नामवंतांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कार्याविषयी गोडगोड आणि छानछान लिहिले आहे. मजकूर रंजक तर आहेच पण किस्सेही बरेच आहेत. एका झपाट्यात गौरविका वाचून काढली; पण मध्येच सुग्रास जेवण जेवतांना दाताखाली कच्कन खडा यावा, तसे झाले. स्वत: पानसरे यांनी ‘मी एक कार्यकर्ता’, या शिर्षकाखाली श्री. शशिकांत चौधरी यांनी शब्दांकित केलेले आत्मकथन दिले आहे. कोल्हापूरात काँग्रेसच्या सभा उधळतांना सभा रंगात आल्यानंतर बेडक्या पकडून सभेत फेकायच्या, गाढवाच्या शेपटीला मोकळा डबा बांधून गाढव सभेत घुसवायचे, यासारखे ‘कर्तुत्व’ पानसरे अभिमानाने सांगतात. टोमॅटो, अंडी फेकणे हे तर नेहमी चालू असायचेच, असेही मान्य करतात. कोल्हापूरला तर्वâतीर्थ लक्ष्मणशस्त्री जोशी यांच्या कॉमर्स कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सभेत मेलेला साप तर्वâतीर्थांच्या गळ्यात घालून व नंतर सभा कशी उधळली, हे देखील पानसरे रंगवून सांगतात.

राष्ट्र मोठे, हे अमेरिकेकडून शिका !

व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येत असल्याची तक्रार अमेरिकेतील मुसलमान इसमाने करणे : नुकताच अमेरिकेतील एका न्यायालयाने एक ऐतिहासीक निर्णय दिला आहे. ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करून त्या इमारती पाडल्या. त्या नंतर अमेरिकेतील मुस्लीम संघटनांची कसून चौकशी केली जात असल्याचे तेथील वर्तमानपत्रांतील काही लेखांमुळे पुढे आले. या गुप्तपणे केल्याजाणार्‍या चौकशांमुळे आपल्या व्यक्तीस्वतंत्र्यावर गदा येत आहे, तसेच धार्मिक सेवा करण्यावरही निर्बंध येत असून व्यायसायिक कारकिर्दही धोक्यात आली आहे, अशा आशयाची तक्रार सय्यद फरहाज हसन नावाच्या मुसलमान इसमाने तेथे केली होती.

Saturday, 8 February 2014

आभार - दाभोलकरी चळवळ्यांचे, राष्ट्रवाद्यांचे आणि माध्यमांचेही !

दाभोलकरांचे खुनी पकडले गेल्यावर माध्यमांत स्मशान शांतता : दिनांक २० जानेवारीच्या आसपास डॉ. नरेंद्र दाभोलकर (वैâलासवासी म्हणावे तर अंनिस वाल्यांच्या भावना दुखावतील आणि पैगंबरवासी म्हणावे तर मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून कुठलाच ‘वासी’ म्हटले नाही.) यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे कळले. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन आरोपींना त्या प्रकरणात अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त वाचनात आले.
    दाभोलकर मेल्यावर ज्या पद्धतीने माध्यमांनी स्मशानी बोंब मारली आणि सनातवर आरोप केले, त्या तुलनेत आता मारेकरी पकडले गेल्यावर मात्र माध्यमांत स्मशान शांतता पसरलेली दिसते. स्वत:ला पत्रकार समजणार्‍या बोलघेवड्यांच्या दातखीळ्या बसल्या आहेत.

Thursday, 6 February 2014

१. काय हे ? प.पू. आसाराम बापूंना कारागृहात चांगले जेवण आणि औषधोपचार मिळत नाहीत; पण डॉन लोकांना कारागृहात दारू आणि मोबाईल सुधा मिळतात.

 सगळ्यांनी कर्तव्य ‘पार पाडल्यासारखे’ करा !

    नुकतेच एक वृत्त प्रस्द्धि झाले आहे. कुख्यात डॉन अबू सालेम याला लखनऊ येथील न्यायालयात खटल्यासाठी नेले जात असतांनात्याने रेल्वेत निकाह केला. पोलीस बंदोबस्तात त्याला लखनऊ येथे नेले
जात होते. तेव्हा आजूबाजूला पोलीस पहारा असतांनाही अबू सालेमनेधावत्या गाडीत निकाह केला. हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापल्यावर टाडा न्यायालयाची झोप उडाल्यासारखी झाली. मग टाडा न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यासारखे करून त्याची चौकशी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यासारखे केले. आता पोलीस चौकशी केल्यासारखे करतील. मग अहवाल सादर

Tuesday, 28 January 2014

                             ‘मी मरेन; पण तुला विधवा करेन’, अशा वृत्तीची एन्.आय.ए.

एन्.आय्.ए. म्हणजे ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा‘. देशभरातील अनेक गाजलेल्या (म्हणजे काँग्रेसने गाजवलेल्या) प्रकरणांच्या तपासाचे काम या यंत्रणेकडे देण्यात आले होते. त्यात मालेगाव स्फोट २००६ व २००८, मडगाव स्फोट अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. हे तपास करतांना एन.आय.ए.ने केलेली काळी कृत्ये आणि त्यावरून एन.आय.ए.ची लायकी काय आहे, हेही हिंदूंना कळावे यासाठी....

मी मरेन; पण तुला विधवा करेन’, या वृत्तीची एन.आय.ए. : नुकतेच एन्.आय्.ए.ने साध्वी प्रज्ञासिंग यांना सुनील जोशी यांच्या खुनाच्या आरोपातून मुक्त केले. सुनील जोशी यांच्या खुनाच्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग या मध्यप्रदेशात होत्या. कारागृहातील वैâद्यांना एक माणूस म्हणून ज्या सुविधा असायला हव्यात किंवा जे मानवाधिकार असायला हवेत, ते मध्यप्रदेशातील कारागृहातील वैâद्यांना मिळतात. साध्वी प्रज्ञासिंग यांना देखील त्या सुविधा तेथे मिळत होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील कारागृहाच्या तुलनेत साध्वी प्रज्ञासिंग या मध्यप्रदेशातील कारागृहात थोड्यातरी सुखात होत्या असे म्हणायला वाव आहे.

Friday, 24 January 2014

दाभोलकरांचे खुनी पकडले गेले तरी सगळे शांत का ?

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातन संस्थेवर आरोप करण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांच्यात स्पर्धा सुरू होती. सनातनच्या अनेक निष्पाप साधकांची तासंतास पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली गेली. १५-२० दिवस माध्यमांना पोट भरायला दाभोलकरांच्या हत्येशिवाय दुसरा विषयच नव्हता.
            आता दाभोलकरांच्या हत्येला पाच मास उलटल्यावर नागोरी आणि खंडेलवाल असे दोन इसम दाभोलकरांच्या खुनाच्या प्रकरणी पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले, तशी वृत्तेही एक-दोन वृत्तपत्रांनी छापली असतील. पण दाभोलकरांच्या हत्येनंतर स्मशानी बोंब मारणार्‍या माध्यमांत आता स्मशान शांतता पसरली आहे.

Thursday, 23 January 2014

वाचता वाचता येणारी झोप ही सर्वोत्तम असते, हे खरेच; पण झोपच
उडविणारे पुस्तक उत्तम असते, हेही तितकेच खरे. संवेदनशील मन असणार्‍या
माणसाची झोप निश्चित उडेल असे हे पुस्तक आहे. लेखक विक्रम विनय भावे
हा एक संसारी मराठी िंहदु तरुण आहे. ठाणे येथील गडकरी रंगायतन
नाट्यगृहाजवळ झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी त्यास अटक झाली. त्या
प्रकरणात त्याला मुंबई सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली. या
कारागृहातील जीवनात त्याचा परिचय २००६ साली व २००८ साली
मालेगावात झालेल्या बाँबस्फोटातील मुसलमान व हिंदु आरोपींशी झाला.
मनाची संवेदनशीलता टीकून राहिल्याने विक्रम भावे यांनी या दोन्ही
प्रकरणांतील आरोपींशी मोकळेपणाने संवाद साधला, त्यांची दु:खे जाणून
घेतली. त्यांच्या खटल्याविषयीही विक्रम भावे यांना बरीच माहिती या चर्चेतून
समजली. या चर्चेतून या प्रकरणांतील आरोपी निर्दोष आहेत, असे विक्रम भावे
यास वाटले.
आय.एन.एस. विक्रांत - सत्तातुराणाम् न भयं न लज्जा !

    राज्य सरकारने पुरेसे पैसे न दिल्याने आय.एन.एस. विक्रांत ही
युद्धनौका लिलावात काढण्याविषयीची चर्चा झाली व होतही आहे.
आय.एन.एस. विक्रांत ही युद्धनौका म्हणजे भारतीय नौदलाचा चेहराच
आहे, असे म्हटले जाते. या युद्धनौकेचे रूपांत युद्धसंग्रहालयात
करावयाचे होते. पण त्यासाठी पुरेसा निधी राज्य सरकारने न
दिल्यामुळे ती लीलावात काढयाची चर्चा सुरू झाली.

अधिवक्ते संजिव पुनाळेकर यांच्यासह सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अधिवक्ते श्री. संजिव पुनाळेकर हे हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आहेत. मी त्यांच्यासह हिंदु
विधिज्ञ परिषदेच्या कार्यालयात त्यांचा साहाय्यक म्हणून सेवा करतो. त्यांच्यासह सेवा करतांना
त्यांची काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. प्रत्येकालाच त्यातून बोध घेण्यासारखे काहीतरी आहेच. ती
गुणवैशिष्ट्ये येथे देत आहेत. आम्ही सर्व सहसाधक त्यांना ‘सर’ असे संबोधन लावतो. इथेही त्यांचा
‘सर’ असाच उल्लेख केला आहे.


मालेगाव बाँबस्फोटांमागील अदृश्य हात या पुस्तकाचे लिखाण व प्रकाशन या
संदर्भात आलेल्या अनुभूती व अनुभव


कारागृह किंवा कारागृह संस्था यांचा १०० प्रतिशत अभ्यास करता येणे
शक्य नाही इतकी त्याची खोली असणे :
दिनांक २८.५.२०१३ रोजी मी
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर मुक्त झालो. कारागृहात असतांना
माझा संबंध अनेक प्रकारच्या लोकांशी आला. सामान्य मनुष्यासाठी ‘कारागृह’
हा थोडा गुढ विषय असतो. चित्रपटात पाहिलेल्या काही गोष्टींमुळे सामान्य
माणसाची कारागृहाविषयीची कल्पना थोडी वेगळी असते. तशी माझीही होती.
प्रत्यक्ष कारागृहात गेल्यावर लक्षात आले की ते एक वेगळेच विश्व आहे.

‘मालेगाव बाँबस्फोटांमागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे परिणाम व
पुस्तकाबद्दल समाजातून आलेल्या प्रतिक्रिया


दिनांक १ सप्टेंबर २०१३ रोजी विक्रम भावे यांचे ‘मालेगाव
बाँबस्फोटामागील अदृश्य हात हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रकाशनानंतर
या पुस्तकांबाबत माझ्या वकील मित्रांमध्ये आणि समाजातील अन्य
स्तरांवर उमटलेले प्रतिसाद लक्षणीय आहेत. ते सर्वांसमोर मांडावेत
म्हणून हा लेखप्रपंच.

प्रसवकळा : हिंदुराष्ट्र जन्माच्या

    हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्था कार्यरत आहे. त्यासाठी
दैनिक सनातन प्रभात हे प्रखर धर्माभिमानी वृत्तपत्रही सुरू आहे.
त्यातून धर्मावर नीत्य होणार्‍या आघांविषयी हिंदूंना माहिती मिळत
असते. ती वाचून अनेकांची हृदये हेलावतात. काहींची हे सगळे वाचून
चीड येऊन घुसमट होते, तर काहीजण हतबलतेच्या जाणीवेतून
निराशही होत असतील. पण समाजात घडणार्‍या या गोष्टींकडे
सकारात्मकतेनेच पहायला हवे.

मडगाव स्फोट प्रकरण : पोलीस व काँग्रेस यांना दिगंबरावस्था

३१ डिसेंबर २०१३ या दिवशी गोव्याच्या विशेष न्यायालयाने मडगाव
स्फोट प्रकरणातून सनातनच्या सर्व सहा साधकांना निर्दोष सोडले.

स्फोटाच्या वेळी सनातनची ‘सुपारी’ घेऊन उर बडविणार्‍या
चॅनेलवाल्यांना खटल्याच्या निकालाच्या वेळी दातखीळ बसली होती.
चॅनेलवाल्यांची दातखीळ आणि पोलिसांच्या कानाचे दडे
उघडण्यासाठी.....

दाभोलकर हत्या आणि भारतीय गोबेल्सचा नाझीवाद

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महराष्ट्रातील माध्यमांत एक वादळ उठले.
कुठल्याही प्रसंगाचा माणसाच्या मनावर असणारा परिणाम काळ जाईल तसतसा कमी
होतो. समाजमनाचेही तसेच आहे. आपल्या देशात या गोष्टीची गती थोडी अधिकच
आहे. (२७ नोव्हेंबर २००८ रोजी सी.एस.टी. स्टेशनदाभोलकरांच्या हत्येनंतर ज्या
वादळाला सुरुवात झाली, ते वादळ आता वार्‍याच्या झुळुकीपेक्षाही अशक्त झाले आहे. हे
वादळ वेगात असतांना त्याचा फटका अनेक हिंदुत्ववाद्यांना बसला. त्यात सनातनच्या
साधकांची संख्या अधिक आहे.