हे साहित्यिक कि निधर्म्यांची प्यादी ?
![]() |
| श्री. विक्रम भावे |
गेल्या काही दिवसांपासून अनेक पुरोगामी साहित्यिक आपापले पुरस्कार
परत करत असल्याची वृत्ते येत आहेत. त्यात आता संशोधकांनीही पुरस्कारवापसीची
फॅशन अंगीकारली असल्याचे समजते. आजवर कित्येक अणू शस्त्रज्ञांचे गूढ
मृत्यू झाले; पण संशोधकांना लोकशाही आणि देशहित धोक्यात आल्यासारखे कधीच
वाटले नाही ?
१. पुरस्कारवापसी म्हणजे प्रसिद्धीची भाबडी आशा
देशातील लोकशाही धोक्यात असून त्याचा निषेध करण्यासाठी काही साहित्यिक
आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते गेले काही दिवस वाचनात येत आहेत.
अर्थात् ही वृत्ते तेवढी वाचनात आली; पण खरंच पुरस्कार परत केल्याचे
विश्वसनीय वृत्त अजूनही वाचायला मिळालेले नाही. अर्थात्
पुरस्कारप्राप्तीच्या वेळी जी प्रसिद्धी मिळाली, तशी परत न मिळाल्याने
निदान पुरस्कार परत करण्याच्या नावाखाली तरी प्रसिद्धी मिळेल, अशी भाबडी
आशाही असावी. पुरस्कारातील प्रमाणपत्र परत केले; म्हणजे पुरस्कार परत केला,
असे म्हणता येत नाही. स्मृतीचिन्ह, मानधन (शाल विरून गेली आणि नारळ
साहित्यिकांनी खाल्ला असेल, असे गृहित धरू) या सर्व गोष्टीही परत करण्याची
साहित्यिकांची सिद्धता आहे का ? तसे नसेल; तर मात्र हा प्रसिद्धीचा स्टंटच
म्हटला पाहिजे.
