Thursday, 23 January 2014


मालेगाव बाँबस्फोटांमागील अदृश्य हात या पुस्तकाचे लिखाण व प्रकाशन या
संदर्भात आलेल्या अनुभूती व अनुभव


कारागृह किंवा कारागृह संस्था यांचा १०० प्रतिशत अभ्यास करता येणे
शक्य नाही इतकी त्याची खोली असणे :
दिनांक २८.५.२०१३ रोजी मी
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर मुक्त झालो. कारागृहात असतांना
माझा संबंध अनेक प्रकारच्या लोकांशी आला. सामान्य मनुष्यासाठी ‘कारागृह’
हा थोडा गुढ विषय असतो. चित्रपटात पाहिलेल्या काही गोष्टींमुळे सामान्य
माणसाची कारागृहाविषयीची कल्पना थोडी वेगळी असते. तशी माझीही होती.
प्रत्यक्ष कारागृहात गेल्यावर लक्षात आले की ते एक वेगळेच विश्व आहे.


‘कारागृह’ व ‘कारागृहसंस्था’ या गोष्टीचा १०० प्रतिशत अभ्यास करताच
येणार नाही, इतकी त्याची खोली आहे. त्यापैकी मला ज्या गोष्टी जाणवल्या व
मी जे पाहिले होते, त्याविषयी पूर्वी लिहिलेच होते.

कारागृहात मालेगाव बाँबस्फोटातील हिंदू व मुसलमान आरोपींशी भेट व चर्चा
होणे, त्यातून एक भयंकर कारस्थान डोळ्यांसमोर उभे रहाणे व ते पुस्तक
रूपाने समाजासमोर यावे असे वाटल्याने पुस्तक लिहिणे :
  कारागृहात मला
मालेगाव २००६ य २००८ या दोन्ही वर्षी झालेल्या बाँबस्फोटातील मुसलमान
व हिंदू आरोपी भेटले. त्यांच्याशी अगदी मित्रासारखा संवाद साधता आला.
त्यांच्याशी चर्चा झाल्या. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून बर्‍याच भयंकर गोष्टी
समजल्या. कारागृहातून बाहेर अल्यावर माझ्या अधिवक्त्यांकडून मी आवश्यक
ती कागदपत्रे घेतली व त्यांचा अभ्यास केला आणि एक भयंकर कारस्थान
माझ्या डाळ्यांसमोर उभे राहिले. हे शासकीय कारस्थान पुस्तक रूपाने
समाजासोर यावे, असे तीव्रतेने वाटल्याने त्यावर पुस्तक लिहिण्याचे ठरवले.

अधिवक्त्यांनी सर्वतोपरी साहाय्य करणे : माझे अधिवक्ते आणि हिंदु विधिज्ञ
परिषदेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय श्री. संजिव पुनाळेकर यांना  मी माझा
पुस्तक लिहिण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्यांनीही त्यास सकारात्मक
प्रतिसाद दिला आणि त्यासाठी वाटेल ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी
मला दिले. त्याप्रमाणे त्यांनी मला सर्वातोपरी साहाय्यही केले.

पूर्वायुष्यात साधा लेखही लिहिला नसतांना देवानेच प्रेरणा दिल्याने पुस्तकाचे
टंकलेखन व प्रकरणांची मांडणी दहा दिवसांत पूर्ण होणे
यापूवीa मी माझ्या
अनुभूती किंवा कधीकाळी दैनिक सनातन प्रभातमध्ये  एखादा स्तंभलेख
यापलिकडे काहीच लिखाण केले नव्हते. पण एक अखंड पुस्तक माझ्याच्याने
कसे पूर्ण होईल, हा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. देवानेच ही
पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली होती. प्रत्यक्षात पुस्तक लिहिण्यास सुरुवात
केल्यावरही मला कोणत्याही मुद्द्यासाठी विचार करीत बसावे लागले नाही.
एकदा टंकलेखनाला बसले की, कित्येक पाने पूर्ण करूनच मी उठत असे.
त्यामुळे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा देवाने दिली त्या क्षणापासून १५ दिवसांत
माझ्याकडून टंकलेखन व प्रकरणांची मांडणी हे पूर्ण झाले होते. पुढील दोन
दिवसांत माझ्या अधिवक्त्यांनी त्यांची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून माझे
पुस्तक कायद्याच्या दृष्टीने तपासून पूर्ण केले.

तांत्रिक अडचणी आल्यावर श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना होणे, श्रीकृष्णाने
काही गोष्टी सुचवणे व तसे घडून तांत्रिक अडचणी दूर होणे :
पुस्तकाचा
मजकूर आधी कागदावर लिहित न बसता मी थेट संकणकातच टंकलिखीत
केला होता. त्यामुळे त्याची पृष्ठरचना व इतर गोष्टी व्यावसायिक लोकांकडून
करून घ्यावयाच्या होत्या. त्यासाठी ज्या प्रकाशन संस्थेने मदत केली, त्यांच्या
संगणकात माझी संगणकीय धारिका उघडत नव्हती. त्यामुळे पुन्हा सगळा
मजकूर त्यांच्या संगणकात टंकलिखीत करावा लागणार व त्यासाठी आणखी
वेळ लागणार अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा श्रीकृष्णाला खूप आर्ततेने प्रार्थना
झाली आणि श्रीकृष्णाने काही गोष्टी सुचवल्या. त्याप्रमाणे घडतही गेले आणि
माझी संगणकीय धारिका त्या प्रकाशन संस्थेच्या संगणात उघडता आली.
त्यानंतर एकाच दिवसात त्या प्रकाशन संस्थेच्या लोकांनी पुस्तकाची पृष्ठरचना
करून त्यातील व्याकरणाच्या सुधारणा पूर्ण केल्या.

मुखपृष्ठ संकल्पना भावनेच्या स्तरावर करण्याऐवजी बुद्धीच्या स्तरावर
करायला हवी, हे शिकायला मिळणे :
पुस्तकाच्या नावाप्रमाणे त्यातील सार
सांगणारे मुखपृष्ठ हवे असते. त्यासाठी मी बराच विचार करीत होतो. अनेकांचे
त्यासाठी साहाय्यही घेतले. अनेकांनी त्यांच्या कल्पना मला सांगितल्या.
त्याप्रमाणे माझ्या व अनेकांनी सुचविलेल्या अशा संगळ्या संकल्पना मी त्या
प्रकाशन संस्थेच्या अधिकारी व चित्रकारांना सांगितल्या. त्यावर त्यांनी दिलेला
दृष्टीकोन फार चांगला व शिकण्यासारखा होता. त्यांनी मला सांगितले की,
‘तुम्हाला जर नुसती सनसनाटी निर्माण करायची असेल, तर वाटेल ते
प्रतिकात्मक मुखपृष्ठ आपण बनवू शकतो; पण जर तुम्हाला हा विषय
लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर कसलीही प्रतिके मुखपृष्ठावर घेऊ नका.’
मला ती गोष्ट पटली कारण माझ्या मुखपृष्ठ संकल्पना भावनेच्या स्तरावर
होत्या व त्यांनी सांगितलेला मुद्दा बुद्धीच्या आधारावर होता. भावनेच्या
स्तरापेक्षा बुद्धीच्या स्तरावरील निर्णय योग्य असतो. माझी चूक माझ्या लक्षात
आली. मग मी त्यांनाच मुखपृष्ठ बनविण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्यांनी
दोन दिवसांत अत्यंत सुंदर मुखपृष्ठ बनविले. माझ्यासह सर्वांना ते आवडलेही
आणि तेच मुखपृष्ष्ठ वापरण्याचे निश्चितही झाले.

हिमानीताई सावरकर यांनी तळमळीने विशेष लक्ष घालणे : हे पुस्तक, म्हणजे
त्यातील विषय लवकरात लवकर समाजात जावा, याची मला जीतकी तळमळ
होती, त्याहून अधिक तमळम आदरणीय हिमानीताई सावरकर यांना होती.
पुस्तकाची मूळ संगणकीय धारिका त्यांनी वाचली व त्यांनीच त्यांच्या
ओळखीच्या प्रकाशन संस्थेला साहाय्य करण्याची विनंती केली. आदरणीय
हिमानीताई यांच्या शब्दाला मान देऊन त्या प्रकाशन संस्थेनेही प्रथम प्राधान्याने
हे पुस्तक पूर्ण करून दिले. पुस्तकाचे धारिका वाचल्यापासून ते मुद्रित होऊन
येईपर्यंत आदरणीय हिमानीताई प्रत्येक टप्प्याला विशेष लक्ष देत होत्या. या
पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही त्यांनीच आयोजित केला. त्यासाठी आवश्यक ती
पूर्वतयारीही आदरणीय हिमानीताई व त्यांच्या प्रेमळ कार्यकत्र्यांनी केली. या
सर्वांच्या प्रयत्नांमुळे माझे आयुष्यातील पहिलेवहिले पुस्तक १ सप्टेंबर २०१३
रोजी पुणे येथे प्रकाशित झाले.

संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले त्याप्रमाणे श्रीकृष्णानेच हे पुस्तक
लिहून घेतले असे जाणवणे : या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की,
संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, तसे श्रीकृष्णाने माझ्या सारख्या
सामान्य माणसाकडून एका मासात पुस्तक लिहून घेतले व ते मुद्रित होऊन
समाजात पोहोचेल, याचीही व्यवस्था त्यानेच करून ठेवली होती. हा सर्व
घटनाक्रम मी त्रयस्थपणे पाहू शकत होतो. केवढी ही देवाची कृपा !
                    विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.

No comments:

Post a Comment