या वेळी तरी हिंदूंची निवड चुकू नये !
काही दिवसांपूर्वी देशाचे अती म्हातारे पंतप्रधान मनमोहन सिंह (?) यांनी तोंड उघडले. बेरोजगारी, महागाई अशा समस्या सोडविण्यास आम्ही कमी पडलो, अशी प्रांजळ कबूली देण्याचे नाटक त्यांनी केले. त्याच वेळी मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर देश बरबाद होईल, अशी टीकाही त्यांनी मोंदींवर केली. मोदींवर टीका करतांनाच त्यांनी राहूल गांधींची देशाचा भावी पंतप्रधान म्हणून जाहीरातही करून घेतली.......
दूरगामी परिणाम, एक उदाहरण : एखादी गोष्टी घडल्यावर समोर दिसणारे प्रत्यक्ष दृश्य म्हणजे ती घटना असे मानणे चुकीचे आहे. त्या घटनेचे सर्वांगीण दूरगामी परिणामही विचारात घ्यावे लागतात. अल-वैâदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिच्या ‘ट्वीन टॉवर्स’वर आक्रमण करून ते पाडले. त्यात हजारो अमेरिकी नागरिकांचे बळी गेले. पडलेल्या इमारतीचा ढीगारा आणि धूळ व धूर. हे जरी प्रत्यक्ष दिसणारे दृश्य असले तरी त्याचे न दिसणारे परिणाम त्याहून भयंकर होते. या आक्रमणात मारल्या गेलेल्या लोकांची अनेक मुले (जी देशाची भावी पीढी आहे.) अनाथ झाली, अमेरिकेचे अनेक नागरिक सतत असुरक्षिततेच्या भावनेत आजही जगत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शेअर्सची किंमत घसरली, वाहतूक आणि प्रवासी विमान कंपन्यांना १ लक्ष ७० हजार कर्मचार्यांना कामावरून कमी करावे लागले. एका प्रख्यात हॉटेल कंपनीच्या २० हजार कर्मचार्यांना कामावरून कमी करावे लागले. हे त्या घटनेचे दूरगामी परिणाम आहेत.