Wednesday, 9 July 2014

खलीफाचे साम्राज्य : तिसर्‍या महायुद्धाकडील वाटचालीतील मैलाचा दगड

श्री. विक्रम भावे
इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी इराक आणि सीरियाचा काही भाग जिंकून त्याला खलीफाचे राज्य घोषित केले आहे. इराक नंतरचे लक्ष्य भारत असल्याची वृत्ते पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत.
१. सुन्नी आतंकवाद्यांनी जिंकलेला प्रदेश 
खलीफाचे राज्य म्हणून घोषित !
इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी गेले काही दिवस हिंसाचार केला आणि इराक अन् सीरिया या दोन्ही देशांचा काही भाग जिंकून घेतला, असे त्यांचे म्हणणे आहे. हा जिंकलेला प्रदेश 'खलीफाचे साम्राज्य' म्हणून त्यांनी घोषित करून अबु बक्र बगदादी हा पहिला खलीफा असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे.
दोन्ही देशांचा जिंकलेला प्रदेश मिळून नवीन 'इस्लामिक स्टेट', असे त्याचे नामकरण केले आहे. मुसलमान नागरिकांनी लोकशाही किंवा पाश्चिमात्य कल्पनांचा निषेध करून नव्या खलीफाचे नेतृत्व मान्य करावे, अशी घोषणाही या 'इस्लामिक स्टेट'ने ऑनलाईन केली आहे. रमजानच्या पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. खलीफाचे राज्य इस्लामी कायद्यानुसार चालेल, असे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच नवीन खलीफाच्या राज्यात जुन्या अमिराती, संघटना, राज्ये, समूह आणि त्यांचे सैनिक हे काहीही अस्तित्वात रहाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
२. भारताचे भवितव्य काय ? 
सुन्नी बंडखोरांनी इराकमध्ये जसे हत्यासत्र केले, तसे भारतात त्यातही गुजरातमध्ये केले जाणार, अशी वृत्ते त्याच वेळी वाहिन्यांवर येत होती. या वृत्ताची सत्यासत्यता पडताळण्यात किती वेळ घालवायचा, हे राज्यकर्त्यांनी आताच ठरवले पाहिजे. २६/११ ला झालेल्या आक्रमणात १० आतंकवादी उभ्या महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला ६० घंटे पुरून उरले. त्यामुळे इराकसारखे हत्यासत्र भारतात घडले, तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी. २६/११ तील आतंकवादी समुद्रमार्गे आले, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे. तरीही महाराष्ट्राचा सागरी किनारा अजून सुरक्षित केला गेलेला नाही. कसाब आणि त्याच्या सहकार्‍याना मुंबईतील रस्ते ठाऊक होते. हे केवळ संकेतस्थळावरील नकाशा पाहून शक्य नाही. २६/११ चे आक्रमण प्रत्यक्षात आणण्याकरता भारतातील कोण देशद्रोही राबत होते, त्याचा तपासच केला गेला नाही. २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी प्रत्येकी ३० किलो आरडीएक्स् असलेले ८ बाँब पोलिसांनी हस्तगत केले होते. खटल्याअंती ते आरडीएक्स् नष्ट केले गेले असावे. (अशी आशा आहे.) पण त्या वेळी अशी वृत्ते येत होती की, कसाब आणि त्याच्या साथीदारांनी असे १० बाँब वेगवेगळ्या जागी पेरले होते. जर हे खरे आहे, तर आणखी २ बाँब पोलिसांना मिळालेलेच नाहीत. त्यातील ६० किलो आरडीएक्स् भविष्यात कुठेही वापरले जाऊ शकते. पाकिस्तान आणि बांगलादेशातून क्रिकेटचा सामना पहाण्यासाठी आलेले सहस्रो लोक अजून पाकिस्तानात किंवा बांगलादेशात परत गेलेलेच नाहीत, असे शासनानेच सांगितले होते. त्यांना शोधून काढून हाकलून देण्यासाठी आजवर काहीच प्रयत्न केले गेलेले नाहीत.
३. भारतावरील संभाव्य आक्रमण टाळण्यासाठी कोणावर विश्वास ठेवणार ? 
इराकनंतर भारतावर अशा प्रकारचे आक्रमण करण्याची योजना असेल, तर भारताला किती महागात पडेल ? राष्ट्र रक्षणासाठी आमचे सैनिक तळहातावर प्राण घेऊन सदैव सज्ज आहेत; पण त्यांच्या हौतात्म्याला पायदळी तुडवले जात असेल, तर कोण कशाला देशासाठी जीव देईल ? हुतात्मा सैनिकांच्या परिजनांकरता राखीव ठेवलेले भूखंड, फ्लॅट, पेट्रोलपंप, असे जे काही मिळेल ते काँग्रेसींनी गिळायला आरंभ केला आहे. हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीस्तंभास तर एका देशद्रोही मुसलमानाने चक्क लाथ मारली आहे. त्याची छायाचित्रे जगभर पोहोचली आहेत. त्या देशद्रोह्याला रमजानचा महिना संपेपर्यंत अटकच करणार नसल्याची पिचकारी रा.रा. पाटील यांनी मारली. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे कि इस्लामचे असा प्रश्न. पडतो. हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभाला लाथ मारणे, हे घाईगडबडीत झालेले कृत्य नव्हे. भारताचे कायदे, सत्ता, लोकशाही, या गोष्टी आम्ही मानत नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आझाद मैदानात ज्या महिला पोलिसांवर देशद्रोही मुसलमानांनी हात टाकला, ती घाईगडबडीत झालेली कृती नव्हे. हिंदूंच्या माता-भगिनी वर्दीत असल्या, तरी इस्लामच्या दृष्टीने त्या काफर असल्याने त्या भोगवस्तू आहेत, हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. भारतात राहून पाकिस्तानला निष्ठा वाहिलेले देशद्रोही मुसलमान आणि देशद्रोह्यांना रमजान होईपर्यंत अटकच करणार नाही, अशी भूमिका घेऊन कायदाद्रोह आणि घटनाद्रोह करणारे निलाजरे आणि दुबळे लोक सत्तेत असतील, तर संभाव्य आक्रमण टाळण्याकरता कोणावर विश्वास ठेवावा ?
४. जगाच्या तिसर्‍या महायुद्धाकडील वाटचालीतील मैलाचा दगड !
'हिंदू स्वराज्य : आगामी काळातील वास्तव', या नावाचे बलराज मधोक यांचे एक पुस्तक आहे. शेकडो उदाहरणे देऊन त्यांनी हे सिद्ध केले आहे की, इस्लाम हा धर्म नसून ती जग व्यापू पहाणारी राजकीय चळवळ आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळीही इंग्रजांना हाकलून देऊन भारतावर तुर्क्यांच्या खलीफाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी बनावट महात्मे घाईवर आले होते. म्हणजे जगावर खलीफाचे राज्य आणण्याची मनिषा प्रत्येक मुसलमान फार पूर्वीपासून बाळगून आहे. आपणा सर्वांना ठाऊक आहे की, जागतिक राजकारण हे तेलसंपन्न राष्ट्रांच्या भोवतीच फिरत असते. तशात तेलसंपन्न राष्ट्रांवर इस्लामचा प्रभाव आहे. त्यामुळे भविष्यात भारतात इराकसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास भारताच्या बाजूने उभे रहाण्याचे धैर्य इतर देश दाखवणार नाहीत. त्यामुळे साहजिकच भारत एकटा पडेल. ही संधी साधून चीन आणि पाकिस्तान भारताचे लचके तोडण्याचे प्रयत्न चालू करतील. त्यांना प्रतिकार करतांना युद्ध चालू झाले, तर आपोआपच इस्लामी राष्ट्रे एकवटतील आणि तिसर्‍या महायुद्धास तोंड फुटेल. अण्वस्त्रांच्या युगात तिसर्‍या महायुद्धाचा परिणाम काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही; पण इराकमध्ये घडलेली घटना ही जगाच्या तिसर्‍या महायुद्धाकडील वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे.
- श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

No comments:

Post a Comment