समाजवाद्यांमधील नव-पॅâसिस्ट
मुंबईच्या फोर्ट परिसरात फूटपाथवर मांडून ठेवलेली जुनी पुस्तके आणि नियतकालीके चाळून एखादे छानसे पुस्तक मिळवण्यासाठी हिंडतांना अवचितपणे कॉम्रेड गोविंद पानसरे अमृत महोत्सव गौरविका हाती लागली. इतर गौरविकांप्रमाणे या गौरविकेचे स्वरूप रटाळ आणि एकसुरी वाटले नाही. बर्याच परिचित आणि नामवंतांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कार्याविषयी गोडगोड आणि छानछान लिहिले आहे. मजकूर रंजक तर आहेच पण किस्सेही बरेच आहेत. एका झपाट्यात गौरविका वाचून काढली; पण मध्येच सुग्रास जेवण जेवतांना दाताखाली कच्कन खडा यावा, तसे झाले. स्वत: पानसरे यांनी ‘मी एक कार्यकर्ता’, या शिर्षकाखाली श्री. शशिकांत चौधरी यांनी शब्दांकित केलेले आत्मकथन दिले आहे. कोल्हापूरात काँग्रेसच्या सभा उधळतांना सभा रंगात आल्यानंतर बेडक्या पकडून सभेत फेकायच्या, गाढवाच्या शेपटीला मोकळा डबा बांधून गाढव सभेत घुसवायचे, यासारखे ‘कर्तुत्व’ पानसरे अभिमानाने सांगतात. टोमॅटो, अंडी फेकणे हे तर नेहमी चालू असायचेच, असेही मान्य करतात. कोल्हापूरला तर्वâतीर्थ लक्ष्मणशस्त्री जोशी यांच्या कॉमर्स कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सभेत मेलेला साप तर्वâतीर्थांच्या गळ्यात घालून व नंतर सभा कशी उधळली, हे देखील पानसरे रंगवून सांगतात.
हुकुमशाही आणि पॅâसिझमच्या विरोधात नारे देणार्या महाराष्ट्र देशातील समाजवाद्यांचे खरे रूप कधीतरी पानसरे सारख्यांच्या रूपाने प्रकट होते ते असे.
दूरचित्रवाहिन्यांवर गांधीवाद आणि समाजवादावर पोटतिडीकीने बोलणारे भलेभले विचारवंत श्री. पु.भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले साहित्य संमेलन उधळण्यात आघाडीवर होते. सहिष्णु महाराष्ट्रातील ही सर्वाधीक लज्जास्पद घटना होती. भांडारकर संस्थेवर जो हल्ला झाला, त्याची बीजे या समाजवाद्यांनीच रोवली होती, असे म्हटले तर चूक काय ?
इतिहासाच्या विकृतीकरणाचा आरोप तथाकथीत उजव्या पक्षांवर करणार्या एकूणएक डाव्या विचारवंतांचा इतिहासाच्या पुनर्लेखनाला पाठींबा असतो. मात्र अगदी गेल्या काही दशकातही घडून गेलेल्या व अद्याप स्मृतीत असलेल्या घटनांचाही अनुल्लेखाने विसर पाडण्याची यांनी जणू सुपारी घेतली आहे काय, अशी शंका येते. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बोटचेपी भूमिका घेतली, त्यांनाच संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणल्याबद्दल गौरविण्यात हे समाजवादी आघाडीवर असतात. महाराष्ट्राच्या आधूनिक ‘जाणत्या राजा’कडे व्यक्तीगत कामांसाठी यांना जावे लागते, हे यामागचे गुपीत असावे काय ?
अण्णा हजारे माहितीच्या अधिकारासाठी लढले. सिटीझेन चार्टर या त्यांच्या मागणीत शासनाने जनतेच्या निवेदनांवर कालबद्ध कारवाई करणे हा वेंâद्रीभूत मुद्दा होता. गंमत अशी की, अण्णांच्या संघटनेला कितीही पत्रे
अगर इ-मेल पाठविले, तरी त्याची साधी पोचसुद्धा कधी येत नाही, असे बरेच कार्यकर्ते आणि संघटना उघडपणे बोलून दाखवितात. बड्या नेत्यांकडून आलेल्या निरोपांनाच अण्णा प्रतिसाद देतात, असा समज होत चालला आहे हेही घातक आहे. या समाजवाद्यांच्याच मार्गाने अण्णाही जाणार नाहीत ना ? अशी भिती वाटते.
- विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.
No comments:
Post a Comment