‘मालेगाव बाँबस्फोटांमागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे परिणाम व
पुस्तकाबद्दल समाजातून आलेल्या प्रतिक्रिया
दिनांक १ सप्टेंबर २०१३ रोजी विक्रम भावे यांचे ‘मालेगाव
बाँबस्फोटामागील अदृश्य हात हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रकाशनानंतर
या पुस्तकांबाबत माझ्या वकील मित्रांमध्ये आणि समाजातील अन्य
स्तरांवर उमटलेले प्रतिसाद लक्षणीय आहेत. ते सर्वांसमोर मांडावेत
म्हणून हा लेखप्रपंच.
१. मालेगाव बाँबस्फोट २००८ बाबत आतापर्यंतची अत्यंत गंभीर बाब
अशी होती की, जे झाले ते लोकांपर्यंत पोचण्याऐवजी जे सत्ताधारी
आणि प्रसारमाध्यमांना अनुकूल आहे तेच लोकांपर्यंत पोचत होते.
हिंदुत्ववादी, मग तो राजकीय असो, सावरकरी अथवा संघीय
विचारांचा असो अथवा अन्य कोणताही, या प्रत्येकाच्या मनावरची
‘मालेगाव २००८‘ ही एक भळभळती आणि ठसठसती जखम आहे
आणि स्वत:लाच पडलेले परंतू कोणाकडेही न विचारता येण्याजोगे
अनेक प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरे प्रसारमाध्यमांनी आधीच दिलेली
आहेत. ही वस्तुस्थिती कोणी उघडपणे मान्य करतो, कोणी लपवतो.
फरक असतील तर अशा प्रतिक्रीयेमधीलच. हे गेल्या ४ वर्षांत देशातील
अनेक मान्यवरांना, वकीलांना भेटतांना लक्षात येत होते आणि यावर
उपाय काय ? हा प्रश्नही तसाच अनुत्तरीत आहे, हेही कळत होते. श्री
विक्रम भावे यांनी ही हिंदु समाजमनाची समस्या नेमकी जाणली आणि
त्यावर हळुवारपणे फुंकर घालत सत्यस्थिती परखडपणे आणि स्वत:चे
अस्तित्व पुन्हा पणाला लावून हिंदुंसमोर आणली.
हे पुस्तक म्हणजे केवळ एक कहाणी नाही, हिंदु समाजमनाला
पडलेल्या अनेक ‘का? कसे काय?’ यांना असलेले एक उत्तर आहे, एक
औषध आहे. हिंदुत्ववादी विचारवंत बनण्याच्या प्रक्रियेची आणि हिंदु
विचारमंथनाची पुढची जाणीव आहे.
२. ज्या वकीलांनी हे पुस्तक वाचले त्यांच्या प्रतिक्रिया प्रातिनिधीक
स्वरुपात अशा होत्या,
पोलीसांची मानसिकता कशी असते ते कळाले.
वाचता-वाचता येणारी झोप ही सर्वोत्तम असते हे तर खरेच; पण
झोपच उडवणारे पुस्तक म्हणजेच उत्तम पुस्तक हेही तितकेच खरे! . .
. . गेल्या आठवड्यात मी हे पुस्तक पूर्ण केल्याच्या रात्री शांत झोपू
शकलो नाही. आणि तेव्हाच निश्चित केले की आपल्या वाचकांपर्यंत,
विचार करणार्या लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवायचे. या पुस्तकात असे
अनेक पैलू आले आहेत ज्या सर्वाचीच नोंद मी इथे करणार नाही. पण
हे पुस्तक सर्व विचार करणार्या, चिंता करणार्या सुजाण नागरिकांनी
वाचायला हवे. शरद पवारांनी पुण्यातील भाषणात दहशतवादाचे
उघडपणे केलेले समर्थन, इफ्तार पाट्र्या झोडणारे आपले नेते, हज
अनुदान बंद करा असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही नवीन
हज हाऊसेस बांधणारे सरकार, मदरशांवर कोट्यवधींची खैरात
उधळणारे दळभद्री राज्यकारभारी, भाषणांनी हिंदू आणि मुस्लिम
जनतेला चिथावणी देणारे हिंदू आणि मुस्लिम ‘स्वयंघोषित’ नेते हे असे
सर्वजण अजूनही अदृश्य राहू शकतील ? अस्वस्थ करणारे प्रश्न...
लोकांना हे षडयंत्र एक दिवस कळेल आणि ते मोठ्या संख्येने
मतदानाला उतरून जुलमी राजवट उखडून टाकतील हा विश्वास वाटतो.
तोपर्यंत आपण जनजागृती करतच राहायची.‘
इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या आणि त्यानंतर अनेक चर्चा घडलेल्या
एका लेखातला हा भाग आहे. हा लेख लिहिला प्रथितयश आणि
हिंदुत्वाशी तीन पिढ्या जोडल्या गेलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील
अधिवक्ता श्री. विक्रम वालावलकर यांनी. त्यांची भावना इतकी
प्रामाणिक होती की केवळ हा लेख लिहून ते थांबले नाहीत, तर जिथे
जिथे आणि जसे जसे हे पुस्तक पोचवता येईल तिथपर्यंत हे पुस्तक
त्यांनी स्वत:ला तसदी देऊन पोचवले.
ज्यांची ओळख करुन देणं इथे अप्रस्तुत आहे अशा काही वकीलांनीतर
पुस्तक मिळाल्यानंतर केवळ स्वत: वाचले नाही तर त्यांच्या
ओळखीतल्या अनेकांपर्यंत ते पुस्तक स्वत: पोचवले, जेव्हा उच्च
न्यायालयात भेट झाली तेव्हा भरभरून या पुस्तकाबाबत त्यांनी
सांगितले.
स्वत: भावे यांना पुस्तक वाचून ज्यांनी फोन केले त्यांच्या प्रतिक्रिया
काही वेगळ्या नव्हत्या. संघाचे वयोवृद्ध स्वयंसेवक तर आपल्या
शाखेत या पुस्तकाचे जाहिर वाचन भरवू लागल्याचे या स्वयंसेवकांनी
भावेंना सांगितले, तर ज्येष्ठ सावरकरवादी विचारवंत आणि ‘दादुमियाँ’
या टोपणनावाने लिखाण करणारे डॉ. दा.वि. नेने यांनीतर
सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ या ग्रंथानंतर मला हे पुस्तक तितके
भावले’, अशी प्रतिक्रिया दिली.
एका पत्रकारांनेही हे पुस्तक वाचुन आपले डोळे उघडल्याचे मान्य करत
आणि खरेतर असे लिखाण आणि अभ्यास एखाद्या पत्रकाराने करायला
पाहिजे होते अशी खंतही व्यक्त केली.
हे लेख कौतुक सांगणारा नव्हे तर दाहकतेची जाणीव करुन देणारा
आहे.
पुस्तकाचा समाजावर होणारा परिणाम अशा आणि या पद्धतीच्या
कौतुकातच थांबत नाही. या पुस्तकाचे परिक्षण ‘नवा काळ’ या
मुंबईतील प्रथितयश दैनिकाने जवळजवळ पाऊण पान छापले. त्यामुळे
आपली काळी कर्तृत्वे बाहेर पडल्यामुळे दुखावलेल्या पोलीसांनी कोणते
टोक गाठले ?
दैनिक नवाकाळमध्ये हे प्रकरण छापून आल्यावर त्याच दिवशी
सायंकाळी सनातनच्या पनवेल येथील आश्रमात चार-पाच जण आले.
सर्वप्रथम त्यांनी विक्रम भावे कुठे आहे, अशी विचारणा केली.
आश्रमातील साधकांनी त्यांना ओळख विचारल्यावर त्यांनी ते स्वत: पुणे
येथील गुन्हेशाखेचे पोलीस असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांची गाडी
आश्रमाच्या फाटकाच्या बाहेर उभी केली होती.
आश्रमात या तथाकथीत पोलिसांचे वागणे-बोलणे
उद्दामपणाचे होते. त्यात अधिकारांचा माज जाणवत होता. त्यांच्यापैकी
एकाने तर स्वत:जवळचे पिस्तूल काढून एका साधकाला दाखविले आणि
‘‘आम्हाला याचा वापर करता येतो’’, अशी अप्रत्यक्ष धमकीही दिली.
चौकशीची ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याने आश्रमाच्या
व्यवस्थापकांनी जवळच्या पोलीस स्थानकात या गोष्टीची तक्रार केली.
या पुस्तकातील एक प्रकरण वर्तमानपत्रात छापून आल्यावर हे सर्व
घडले. ते भामटे जर खरेच पोलीस असतील, तर या लेखातील सत्यता
झोंबल्यामुळे व त्या सत्याची धग सहन न झाल्याने रागाच्या भरात
त्यांनी ही चूक केली असे म्हणता येईल. पण जर ते खरे पोलीस
नसतील तर अन्य कोणीतरी पुस्तकाच्या लेखकाला शोधत यावे आणि
एका आश्रमातील अनुयायांना स्वत:जवळीत शस्त्र दाखवून
अप्रत्यक्षरित्या धमकी देणे, ही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब
आहे.
विक्रम भावे याच्याविषयी पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी
करणे : डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर विक्रम भावे याच्यावर संशय
घेऊन पोलीस पश्चिम महाराष्ट्रातील एका कारागृहात तपासासाठी गेले.
विक्रम भावे कुठल्या बराकीत रहात होता ? तो दिवसभर काय करित
होता ? तो कुणाकुणाशी व काय बोलत असे ? काय खात असे ?
काय वाचत असे ? काम काय करित असे ? या सगळ्या गोष्टींची
चौकशी तेथे जाऊन पोलिसांनी केली. इतकेच काय विक्रम भावे याच्या
शेजारीच असणारा बंदी वैâलाश ठाकूर याचीही पोलिसांनी चौकशी
केली. त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस बिहारमधील त्याच्या
घरापर्यंत जाऊन आले. तशी वृत्तेही कोल्हापूरातील वर्तमानपत्रात छापून
आली. विक्रम भावे याने हे पुस्तक लिहिले म्हणून त्याला
दाभोलकरांच्या खुनाच्या खटल्यात गोवण्याचा तर प्रयत्न पोलीस करीत
नाहीत ना ?
हे तेच पुण्याचे पोलीस आहेत की ज्यांच्या नाकाखाली जर्मन
बेकरी स्फोट घडला, नंतरही साखळी स्फोट घडले परंतू त्या प्रकरणांचा
छडा लावला देहली पोलीस आणि जयपुर पोलीसांनी. या स्फोटांनंतरचा
पुरावा गोळा करण्याऐवजी नष्ट करण्यास पुणे पोलीसांनी हातभार
लावला अशी खरी परिस्थिती परंतू भावे यांच्या बाबतीत पोलीसांनी
मनापासून मेहनत घेतली आहे, असे दिसते.
विक्रम भावे याचे भ्रमणभाष तपशील पोलिसांनी तपासणे व विक्रम
भावे याने ज्यांना भ्रमणभाष केले त्यांची चौकशी करणे : विक्रम भावे
या पुस्तकाचा आणखी एक परिणाम म्हणजे विक्रम भावे याचा
भ्रमणभाष पोलिसांनी कायमच मुद्रणासाठी (रेकॉर्डींगवर) ठेवला आहे.
विक्रम भावे कुणाकुणाशी बोलतो ? काय बोलतो ? का बोलतो ?
यावरच पोलीस लक्ष ठेवून असतात, असे लक्षात आले.
कारण विक्रम भावे याने ज्या ज्या लोकांना भ्रमणभाष केले होते,
त्यातील काही जणांनी प्रत्यक्ष भेटून सांगितले की, ‘विक्रमचा भ्रमणभाष
मला आला होता. त्यानंतर पोलीस माझ्या घरी येऊन माझी चौकशी
करून गेले.’ मुंबईतील एका अधिवक्त्याला काही वैयक्तीक कामासाठी
विक्रम भावे यांनी भ्रमणभाष केला होता. त्या अधिवक्त्यानेही प्रत्यक्ष
भेटीत विक्रम भावे याला सांगितले की, ‘तुझा फोन येऊन गेल्यावर
पोलीस माझी चौकशी करण्यासाठी माझ्या घरी आले होते.’
दाभोलकरांच्या खुनाशी विक्रम भावे याचा संबंध तपासणे हा हेतु
यामागे आहे कि खुनाशी विक्रम भावे याचा संबंध जोडणे हा हेतु
पोलिसांचा आहे ?
मी स्वत: याला विचारस्वातंत्र्याची दडपशाही करण्याचा पोलीसांचा
प्रयत्न असे समजतो. पोलीसांनी असे करण्याचे कारण म्हणजे या
पुस्तकातील सत्य समाजात पोचल्यास काय होईल हे त्यांना कळालेले
आहे. त्यामुळेच खरेतर हे पुस्तक आज समाजातील प्रत्येक
हिंदुत्ववाद्याला पोचण्याची नितांत गरज आहे.
हिंदु समाजाच्या ‘मालेगाव २००८‘ च्या भळभळत्या जखमेवर
आपण काही औषध लावणार आहोत का ? आपली ही किमान
जबाबदारी नाही का ?
- अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, मुंबई
अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद

No comments:
Post a Comment