आभार - दाभोलकरी चळवळ्यांचे, राष्ट्रवाद्यांचे आणि माध्यमांचेही !
दाभोलकरांचे खुनी पकडले गेल्यावर माध्यमांत स्मशान शांतता : दिनांक २० जानेवारीच्या आसपास डॉ. नरेंद्र दाभोलकर (वैâलासवासी म्हणावे तर अंनिस वाल्यांच्या भावना दुखावतील आणि पैगंबरवासी म्हणावे तर मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून कुठलाच ‘वासी’ म्हटले नाही.) यांच्या मारेकर्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे कळले. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन आरोपींना त्या प्रकरणात अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त वाचनात आले.
दाभोलकर मेल्यावर ज्या पद्धतीने माध्यमांनी स्मशानी बोंब मारली आणि सनातवर आरोप केले, त्या तुलनेत आता मारेकरी पकडले गेल्यावर मात्र माध्यमांत स्मशान शांतता पसरलेली दिसते. स्वत:ला पत्रकार समजणार्या बोलघेवड्यांच्या दातखीळ्या बसल्या आहेत.
पोलिसांची गाळण उडावी, असे बॅलेस्टीक रिपोर्टमध्ये काय आहे ? : डिसेंबर मासातील एका रविवारी दैनिक महाराष्ट्र टाईम्स नावाच्या वृत्तपत्राच्या रविवार विशेष पुरवणीत दाभोलकर खूनासंदर्भात एक लेखवजा वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यातील तपशीलातून हे स्पष्ट झाले होते की, दाभोलकरांच्या शरीरात मिळालेली गोळी ज्या पिस्तुलातून झाडली गेली होती, ते पिस्तुल पोलिसांच्या हाती लागले होते. ते पिस्तुल ज्या इसमाकडून पोलिसांना प्राप्त झाले, तो इसमही पोलिसांच्या ताब्यात होता. याचा अर्थ बर्याच अंशी तपास पूर्ण झाल्यासारखेच दिसत होते.
मात्र त्या लेखातील एक गोष्ट थोडी वेगळी होती. ती अशी की, दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी मुंब्रा पोलिसांनी ठाण्यातून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांतील एक जण हा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा ‘आर्म डिलर’ निघाला. त्याच्याकडून ४७ पिस्तुले मिळाली. ती बॅलेस्टीक टेस्ट साठी पोलिसांनी पाठविली. त्याच वेळी पुणे पोलिसांनीही दाभोलकरांच्या शरीरातील गोळ्या बॅलेस्टीक टेस्टसाठी पाठविल्या होत्या. या ४७ पिस्तुलांपैकी एका पिस्तुलातून दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याचे बॅलेस्टीक रिपोर्टमधून पुढे आले. हा
रिपोर्ट ए.टी.एस्.ने पुणे पोलिसांकडे दिला. तो रिपोर्ट पाहून अनेकांची गाळण उडाली आणि अनेक पोलीस अधिकारी रजेवर गेले. या सगळ्या प्रकरणाची सूत्रे मुंबईतून हालत होती. आणि ज्यांची नावे या हत्येप्रकरणी समोर आली, त्यांना त्याच गुन्ह्यात अटक करावी कि अन्य गुन्ह्यात अटक करावी, याविषयी चर्चाही झाल्या होत्या.
एकूण प्रकरणच गूढ व संशय निर्माण करणारे : एकूण लेखातील सूत्रे, मनीष नागोरी याला दोन मासांपूर्वीच झालेली अटक, दाभोलकरांची हत्या ज्या पिस्तुलाने झाली, ते नागोरीकडे मिळणे, बॅलेस्टिक रिपोर्ट आल्यावर पोलीस अधिकार्यांनी रजेवर जाणे, अशी आहेत. वेळोवेळी घडलेल्या घटना, आणि महाराष्ट्र टाईम्सने छापलेला लेख यांचा एकत्रितपणे अभ्यास करून सूक्ष्म विचार केल्यास काही गूढ, भयानक गोष्टी आपल्या समोर स्पष्ट होतात. ज्यांना सूक्ष्म राजकीय दृष्टी आहे व पोलीसांची तपासाची मोडस ऑपरेंडी ज्यांना काही अंशी माहीत आहे, त्यांना त्यातील भयानकता जाणवू शकते.
प्रचंड क्षमता असलेले पोलीस पाच मासांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी पकडू शकत नाहीत, नागोरी दोन मासांपासून पोलिसांच्या ताब्यात असूनही पोलीस त्याच्याकडून सत्य वदवू शकत नाहीत, विधान सभेच्या अधिवेशनात दाभोलकरांच्या हत्येचा विषयच कोणी काढीत नाही, बॅलेस्टीक रिपोर्ट आल्यावर पोलीसच रजेवर जातात, या सगळ्या गोष्टी गूढ आणि संशय निर्माण करणार्या आहेत.
आमच्या मागे लागून काय हाती आले ? : दाभोलकरांच्या खूनासंदर्भात माझ्याबद्दल चौकशी करण्यासाठी पोलीस कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात गेले होते. त्या दरम्यान कोल्हापुरातील वृत्तपत्रांत ‘तपासाचे धागेदोरे पश्चिम महाराष्ट्रातील कारागृहापर्यंत’, ‘खुनाचा कट कारागृहात शिजल्याचे निष्पन्न’, अशी वृत्ते छापून आली होती. त्याच वेळी चीपळूण, रत्नागिरी येथील सनातनचे साधक हेमंत चाळके यांची पोलिसांनी ५-६ वेळा चौकशी केली. तेथील वृत्तपत्रांतही त्यासंबंधी वृत्ते छापून आली. तशी वृत्ते छापून संबंधीत लोक फोनवर कुणाशी काही बोलतात का ? किंंवा काही संशयास्पद हालचाली होतात का, हे पहाण्यासाठी पोलीस अशी वृत्ते देत असावेत. अर्थात आमच्यामागे लागून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
पोलिसांची गाळण उडावी असे मारेकरी कोण लागून गेले : प्रश्न असा की, आमच्या मागे लागून पोलिसांना खुनाचा तपास करायचा होता कि तपासात वेळ काढायचा होता ? नागोरीने न्यायालयास सांगितले की, दोन मासांपासून आम्ही पोलिसांच्या ताब्यात आहोत. दोन मासांत पोलीस नागोरीकडून सत्य वदवून घेऊ शकले नाहीत, हे मनास पटते का ? बॅलेस्टीक रिपोर्ट आल्यावर पोलिसांची गाळण उडून ते रजेवर जातात, याचा अर्थ काय ? आजवर अनेक लोकांच्या हत्या झाल्या. इंदिरा गांधींच्या मारेकर्यांची नावे कळल्यावर पोलिसांची गाळण उडाली नाही, पंडीत नथूराम गोडसेंचे नाव गांधीहत्येत आल्यावर पोलिसांची गाळण उडाली नाही, दत्ता सामंतांचे मारेकरी पकडले गेल्यावर पोलिसांची गाळण उडाली नाही, मग दाभोलकरांच्या मारेकर्यांकडील पिस्तुलाचे रिपोर्ट आल्यावर व त्यातील काही गोष्टी कळल्यावर पोलिसांची गाळण उडावी आणि ते रजेवर
जावेत, असे त्यांच्यात काय आहे ? दाभोलकरांचे मारेकरी सतवंतसिंग आणि बियांतसिंग यांच्यापेक्षा मोठे कुणी आहेत का ? दाभोलकरांचे मारेकरी पंडीत नथुराम गोडसे यांच्यापेक्षा मोठे कुणी देशभक्त आहे का ?
दाभोलकरांच्या मारेकर्यांचा करविता कोण, हे पोलीसांना माहिती होऊनही ते सांगू शकणार नाहीत. ज्याच्या नावानेच पोलिसांची गाळण उडाली, त्याचे नाव या हत्येच्या खटल्यात कसे येणार ? त्यामुळे सहाजीकच आम्हा सनातनच्या साधकांना या हत्येच्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न पोलीस अजूनही करीत आहेत.
सनातनची क्षमा मागण्यासाठी आवश्यक धैय आणि मनाचा मोठेपणा राष्ट्रवाद्यांकडे आणि वागळेसारख्या नाझीवाद्यांकडे नाही : आज दाभोलकरांचे खुनी पकडले गेले आहेत. दाभोलकर मेल्यावर आमच्यावर आरोप करण्याची स्पर्धा माध्यमांत आणि राजकारण्यांत लागली होती. दाभोलकरांच्या हत्येशी सनातनचा दूरदूरचाही संबंध नाही, हे आज स्पष्ट झाले आहे. आम्ही निर्दोष असूनही आमच्यावर (सनातनवर) खोटे आरोप केले म्हणून आमची क्षमा मागण्याचे धैर्य राष्ट्रवाद्यांपासून निखील वागळ्यांसारख्या नाझीवाद्यांपर्यंत कुणातही नाही. अर्थात क्षमा मागण्यासाठी प्रचंड धैर्य लागते, फार मोठे मन असावे लागते, ते धैर्य आणि तो मनाचा मोठेपणा राष्ट्रवाद्यांपासून माध्यमांतील नाझीवाद्यांपर्यंत कुणाकडेही नाही.
आम्ही आभारी आहोत : तरीही या सर्वांचे आभार मानावेत, एवढा मनाचा मोठेपणा आमच्याकडे (सनातनकडे) आहे. हे आभार अशासाठी की, दाभोलकर मेल्यावर सनातनवर खोटे आरोप करून सनातनची कुप्रसिद्धी करण्याचा या लोकांनी आटोकाट प्रयत्न केला; पण आज पुन्हा एकदा सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले. समाजाचा, हिंदूंचा, सनातनच्या हीतचिंतकांचा सनातनवरील विश्वास आणि राजकारणी व माध्यमांवरील अविश्वास दृढ झाला. जगभरात सनातनचे नाव पोचले आणि ‘सनातन’ नावाचे बावनकशी सोने पुन्हा एकदा
झळाळून निघाले. त्याबद्दल आभार.
- विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.
No comments:
Post a Comment