Thursday, 23 January 2014

वाचता वाचता येणारी झोप ही सर्वोत्तम असते, हे खरेच; पण झोपच
उडविणारे पुस्तक उत्तम असते, हेही तितकेच खरे. संवेदनशील मन असणार्‍या
माणसाची झोप निश्चित उडेल असे हे पुस्तक आहे. लेखक विक्रम विनय भावे
हा एक संसारी मराठी िंहदु तरुण आहे. ठाणे येथील गडकरी रंगायतन
नाट्यगृहाजवळ झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी त्यास अटक झाली. त्या
प्रकरणात त्याला मुंबई सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली. या
कारागृहातील जीवनात त्याचा परिचय २००६ साली व २००८ साली
मालेगावात झालेल्या बाँबस्फोटातील मुसलमान व हिंदु आरोपींशी झाला.
मनाची संवेदनशीलता टीकून राहिल्याने विक्रम भावे यांनी या दोन्ही
प्रकरणांतील आरोपींशी मोकळेपणाने संवाद साधला, त्यांची दु:खे जाणून
घेतली. त्यांच्या खटल्याविषयीही विक्रम भावे यांना बरीच माहिती या चर्चेतून
समजली. या चर्चेतून या प्रकरणांतील आरोपी निर्दोष आहेत, असे विक्रम भावे
यास वाटले.

दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींना दिलेली वागणूक, सुधकार
चतुर्वेदी या आरोपीच्या नाशिक येथील घरात पोलीसांनी खोटे पुरावे तयार
करणे, साध्वी प्रज्ञा सारख्या हिंदु साध्वीला पोलिसांनी त्रास देणे, अशा अनेक
गोष्टी या चर्चेतून समजल्या.
सुधाकर चतुर्वेदी यांना दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी इंडिया
बूल कंपनीच्या खाजगी विमानाने मध्यप्रदेश येथे नेणे. तेथे समीर कुलकर्णी
यांना जाळ्यात अडकवून ताब्यात घेणे व त्याच खाजगी विमानाने पुन्हा
मुंबईला येणे. हे फार धक्कादायक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहितीच्या
अधिकारात या गोष्टीची तारीखवार माहिती मागविली असता, दहशतवाद
विरोधी पथकाच्या पोलिसांची नावे त्या दिवशी खाजगी विमानाने प्रवास
केलेल्या व्यक्तींच्या यादीत आहेत, असे विमान प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत
स्पष्ट झाले आहे.
मालेगाव २००६ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणातील आरोपपत्रात अनेक
आरोपींपैकी एक ‘मुझम्मील’ नावाचा आरोपी फरार दाखविला आहे. महत्त्वाची
गोष्ट म्हणजे हा मुझम्मील पाकिस्तानचा नागरिक आहे. त्याही पेक्षा
धक्कादायक गोष्ट ही की, सन २००९ साली हेडलीने अमेरिकन तपास
यंत्रणेपुढे दिलेल्या कबूली जबाबात त्याने स्पष्ट सांगितले होते की, मुझम्मील हा
दहशतवादी असून तो इशरत जहाँ या मुलीला अतिरेकी कारवाया करण्याचे
आदेश देत होता. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या
दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमार्इंड मध्ये हा मुझम्मिल होता.
या दोन्ही प्रकरणांतील तपासाविषयी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुन्हा तपास
करून काही गोष्टी न्यायालयात नोंद केल्या आहेत. त्यातील बर्‍याच गोष्टी
२००६ सालात मालेगाव येथे झालेल्या बाँबस्फोटातील आरोपी निर्दोष
असल्याचे सांगतात. याचा सरळ अर्थ असा निघतो की, दहशतवाद विरोधी
पथकाने हा तपासच खोटा केला का ? मालेगाव २००६ प्रकरणातील काही
आरोपी प्रत्यक्ष स्फोटाच्या वेळी मालेगावापासून शेकडो किलोमिटर दूर
असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने नोंदवले आहे. मात्र २००८ साली मालेगावात
झालेल्या स्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी हजार किलोमिटर लांब
असूनही त्याची दखल मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा घेतांना दिसत नाहीत.
२००८ साली मालेगावात झालेल्या स्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी
याला पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी अटक केली. मात्र त्याची ब्रेन मॅपींग
चाचणी ११ नोव्हेंबर २००८ रोजी म्हणजे अटकेच्या ९ दिवस आधीच केली
गेली आहे. आणि ही गोष्ट माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
मध्यप्रदेशातील इंदोर येथून दिलीप पाटीदार नावाच्या व्यक्तीला
दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याच्या घरून चौकशीसाठी म्हणून
२००८ साली उचलून आणले होते; पण आजच्या तिथीपर्यंत हा पाटीदार घरी
परतला नाही व या प्रकरणात त्यास अटकही केलेली नाही. मग २००८ पासून
आजपावेतो पाटीदार गेला कुठे ? दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी
त्याचा एन्काऊंटर केला का ? त्याच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतल्यावर
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्राच्या
दहशतवाद विरोधी पथकावर खटला दाखल करण्यास सांगितले; पण महाराष्ट्र
शासनाने मात्र आज पर्यंत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या पत्राला साधे उत्तरही
दिलेले नाही.
पुस्तक वाचतांना, या सगळ्या प्रकाराला म्हणावे तरी काय ? शासनाला
यातून काय साधायचे आहे ? दहशतवाद विरोधी पथक हे दहशतवादी पथक
आहे कि काय ? अशा अनेक प्रश्नांची जंत्री वाचकाच्या डोक्यात सतत फिरत
रहाते.
कोणत्याही प्रकाच्या मतपेटीसाठी सत्ता किती खालच्या थराला जाऊ
शकते याचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे करणारे हे पुस्तक आहे. ओघवती
लेखनशैली व थोडा साहित्यीक स्पर्श असलेली भाषा असल्याने पुस्तक
वाचनास सुरुवात केल्यावर आपोआपच वाचनाला एक गती प्राप्त होते.
पुस्तक वाचून वास्तव समोर येते आणि वाचकाचे डोके सुन्न होते.
महानाट्य म्हणजे काय असते, याची जाणीव वाचकाला हे पुस्तक वाचून होते.
पुस्तक वाचून संपल्यावर वाचकाच्या मनात एकच प्रश्न फिरत रहातो की,
‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’, ‘दहशतवाद विरोधी पथक’, ‘गुन्हे अन्वेषण विभाग’,
‘गुन्हे शाखा’, या सगळ्या तपास यंत्रणा इतक्या धादांत खोटे पुरावे उभे करीत
असतील, तर भविष्यात लोकशाही ही लोकशाही राहिल का ? हे सर्व का ?


No comments:

Post a Comment