Thursday, 23 January 2014

प्रसवकळा : हिंदुराष्ट्र जन्माच्या

    हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्था कार्यरत आहे. त्यासाठी
दैनिक सनातन प्रभात हे प्रखर धर्माभिमानी वृत्तपत्रही सुरू आहे.
त्यातून धर्मावर नीत्य होणार्‍या आघांविषयी हिंदूंना माहिती मिळत
असते. ती वाचून अनेकांची हृदये हेलावतात. काहींची हे सगळे वाचून
चीड येऊन घुसमट होते, तर काहीजण हतबलतेच्या जाणीवेतून
निराशही होत असतील. पण समाजात घडणार्‍या या गोष्टींकडे
सकारात्मकतेनेच पहायला हवे.


    काँग्रेसवाले आज देशात जे काही करीत आहेत, त्याने
हिंदुराष्ट्राची स्थापना आणखी निश्चित होत आहे. त्यामुळे काँग्रेसींची
आताची कृत्ये जरी आपणा हिंदूंना क्लेषदायक असली, तरी त्या
हिंदुराष्ट्र जन्माच्या प्रसवकळा आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

१. सनातन संस्थेवर आरोप व बंदीचे सावट : ठाण्याच्या गडकरी
रंगायतन या नाट्यगृहात ‘आम्ही पाचपुते’ या नाटकाच्या प्रयोगापूर्वी
वाहनतळात एक स्फोट झाला. त्या प्रकरणात माझ्यासह अन्य पाच
जणांना आरोपी बनविण्यात आले. आमची रवानगी कारागृहात झाली.
मात्र ‘सनातनचा या प्रकरणात हात आहे‘, असे ठासून सांगत पोलिसी
चौकशीचा ससेमीरा सनातनच्या मागे लावण्यात आला. सनातनच्या
विविध आश्रमांत रात्री अपरात्री जाणे, तेथील साधकांची रात्री अपरात्री
चौकशी करणे, वाटेल तेव्हा सनातनच्या साधकांच्या घरी जाणे,
इतकेच नव्हे तर सनातन प्रभात हे दैनिक ज्या ज्या लोकांकडे जाते,
तेथेही जाऊन पोलिसांनी चौकशी केली.
    दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांकडे सातत्याने जाण्याचा
पोलिसांचा हेतू हाच होता की, ‘सनातनचा पेपर वाचला तरी पोलीस
आपल्या घरी चौकशीला येतात’, असे वाटून सनातनचे वाचक तो पेपर
बंद करतील, लोक जाहिराती देणे बंद करतील, हितचिंतक देणग्या देणे
बंद करतील आणि सनातन प्रभातचे नुकसान होईल.
    मात्र पोलिसांनी ज्यांच्या आदेशाने हे सर्व केले, ते यथावकाश
तोंडावर आपटले. या प्रकरणानंतर लगेचच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या
कार्यक्रमाला नेहमीपेक्षा अधिक लोक उपस्थित राहिले, नेहमीपेक्षा
अधिक अर्पण लोकांनी उत्स्फूर्तपणे केले आणि नेहमीपेक्षा अधिक
जाहिराती दैनिक सनातन प्रभातला मिळाल्या. त्या प्रकरणात सनातन
संस्थेला अडकविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अगदी शंभर प्रतिशत फसला.
    या सर्व प्रकरणात सनातनच्या साधकांना अनेक कष्ट सोसावे
लागले. संस्थेवर कधीही बंदी येऊ शकते, असे वातावरण असतांना
त्या तणावाखालीच साधकांना सेवा कराव्या लागत होत्या. सर्वत्र
थोडेसे काळजीचे वातावरण होते; पण या सगळ्यातूनही साधक
सावरले. काही मोलाच्या गोष्टी साधकांना शिकायला मिळाल्या.
अ. संस्थेवर कधीही बंदी आली तर आश्रमातून आहे तसे बाहेर पडून
कुठेतरी साधकाकडे किंवा घरी राहून आपल्याला सेवा, साधना सुरू
ठेवायची आहे, याची जाणीव साधकांच्या मनात पक्की झाली. म्हणजे
कुठेही रहावे लागले तरी तेथे राहून साधनाच करू हा निश्चय
साधकांमध्ये पक्का झाला.
आ. संस्थेवर, आश्रमावर कधीही बंदी आली तरी शांतपणे आश्रमातून
बाहेर पडण्यासाठी साधक स्वत:चे सामान बांधून ठेवूनच सकाळी
सेवेला सुरुवात करीत असत. त्यामुळे क्षणोक्षणी वर्तमान काळात
रहायला साधक शिकले.
इ. ईश्वराचे अधिष्ठान असरणार्‍या, अध्यत्मप्रसार करणार्‍या एका
संस्थेवर बंदी कशी काय येऊ शकते ?, असा विकल्प साधकांच्या
मनाला शिवला देखील नाही. उलट ‘संस्था ईश्वराने निर्माण केली आहे.
त्यामुळे त्याला हवी तेव्हा तो बंदही करील’, हा विचार साधक करीत
होते. म्हणजे साधक ईश्वरेच्छेने जगायला शिकले.
ई. प.पू. डॉक्टर आठवले यांना कधीही अटक होऊ शकते, अशी
परिस्थिती निर्माण झाली (काँग्रेसींनी निर्माण केली) होती. त्या वेळी
अवतारी पुरुष असूनही प.पू. डॉक्टर एका चटईवर झोपणे, उशी न
घेणे, पांघरूण न घेणे, दोनच जोड कपडे वापरणे, थंड पाण्याने आंघोळ
करणे, अशा गोष्टी करून कारागृहात रहाण्याची सवय करीत होते.
मात्र प.पू. डॉक्टरांना अटक कशी काय होऊ शकते ?, असा विकल्प
साधकांच्या मनाला शिवला देखील नाही. उलट ‘प.पू. डॉक्टर म्हणजे
ईश्वराचे सगूण रूप आहे. त्यांना बाधू शकेल, असे या पृथ्वीवर
काहीही नाही. तरीही प.पू. डॉक्टरांना अटक झालीच तर त्यांचीच
लीला आहे’, हा आध्यात्मिक सरावरील विचार साधक करीत होते.
    थोडक्यात जेथे जेथे निधर्मी असूरांनी साधकांना त्रास देण्याचा
प्रयत्न केला, तेथे तेथे त्या त्रासातून चांगलेच काहीतरी जन्माला आहे.
    व्यष्टी आणि समष्टी साधना सुरळीत होण्यासाठी हे निधर्मी
शासन उलथवून धर्माधिष्ठीत हिंदुराष्ट्र स्थापण्याला पर्यायच नाही, ही
धारणा साधकांच्या मनात त्यामुळे दृढ झाली.

२.    प.पू. रामदेवबाबा यांचे आंदोलन चिरडणे : प.पू. रामदेवबाबा
यांनी भारतातील काळा पैसा विदेशी अधिकोशातून परत भारतात
आरण्यासाठी जंतरमंतर येथे केलेले आंदोलन चिरडून टाकण्यात आले.
त्या आंदोलनात तर प.पू. रामदेवबाबा यांना खोट्या मारामार्‍या घडवून
आणून ठार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांच्या भक्तांच्याही
लक्षात आले.
    त्यानंतर प.पू. रामदेव बाबा यांच्या न्यासाच्या मागे सी.बी.आय.
नावाचे सरकारी श्वान मोकळे सोडण्यात आले. सुरुवातीला त्रासदायक
वाटलेल्या या घटनांतून त्यांचे भक्तही बरेच काही शिकले. आता
सी.बी.आय. सारखी शेकडो श्वाने आली तरी त्यांना पुरून उरतील,
असे खंदे भक्त प.पू. रामदेवबाबा यांचेकडे आहेत. हिंदूंसाठीच्या हिंदू
राष्ट्राची आशा त्यांच्या भक्तांच्या मनात पल्लवीत होऊ लागली आहे.
    सुरुवातीला त्रासदायक वाटणार्‍या या घटनांतून शेवटी चांगलेच
जन्माला आले.

३.    प.पू. आसाराम बापूंना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवणे : प.पू.
आसाराम बापू यांच्या विरोधात षड्यंत्र रचून त्यांना बलात्कारासारख्या
हीन गुन्ह्यात गोवण्यात आले. या धक्क्याने प.पू. बापूजींचे भक्त
थोडेसेच गडबडले. मात्र या त्रासातून एक चांगली गोष्ट जन्माला आली.
प.पू. बापूंचे देशभर विखूरलेले भक्त एकत्र आले. चांगल्या समन्वयाची
मोट त्यांनी बांधली आणि एका फटकार्‍यासरशी, ज्या राजस्थानात
कॉग्रेसने प.पू. बापूंना अटक केली, त्याच राजस्थानात काँग्रेसला
वाळवंटातील वाळू खायला भाग पाडले. संघटनाची शक्ती प.पू.
बापूंच्या भक्तांनी अनुभवली. हिंदु धर्माधिष्ठीत हिंदुराष्ट्राची
आवश्यकता प.पू. बापूंच्या भक्तांना तीव्रतेने भासू लागली. सुरुवातीला
त्रासदायक ठरलेल्या या घटनेतून चांगलेच जन्माला आले.

४.    हिंदूंच्या मुळावर उठलेले जादूटोणा विधेयक : नुकतेच महाराष्ट्र
शासनाने पाशवी बहुमताच्या जोरावर जादूटोणा विधेयक विधानसभेत
संमत केले. हिंदूंच्या मुळावर उठलेल्या या कायद्याला हिंदुत्ववादी
संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि आमदार यांनी अनेक ठोसे मारून
मारून मवाळ केले आणि वठणीवर आणले. आता कायदा बराच सौम्य
झाला असे म्हटले जाते; पण आपण चंद्रगुप्त-चाणक्य यांचे अनुयायी
आहोत. चाणक्य म्हणतात की, ऋण, अग्नि आणि शत्रु, हे थोडेजरी
शिल्लक राहिले, तरी ते हळूहळू पुन्हा वाढतात. त्यामुळे हा कायदाच
रहीत होण्यासाठी सर्वांनी झटायला हवे. तरीही हा कायदा तसाच
राहिला, तर भविष्यात या कायद्यामुळे जो काही त्रास हिंदूंना होईल,
त्यातून हिंदू अधिक संघटीत होतील, हिंदुराष्ट्राची आवश्यकता हिंदूना
आणखी तीव्रतेने भासू लागेल.

५.    हिंदुराष्ट्र निर्मितीच्या प्रसवकळा सोसणे हिंदूंना अपरिहार्य :     थो
डक्यात ज्या ज्या गोष्टी हे निधर्मी काँग्रेस शासन हिंदु धर्म आणि
हिंदूंना संपवण्यासाठी करत आहे, त्यातून हिंदूंचे संघटन होत आहे.
‘आता हिंदुराष्ट्राची नितांत आवश्यकता आहे’, ही जाणीव हिंदूंच्या
मनात बळावत चालली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हिंदूंना क्लेषदायक
वाटणारी प्रत्येक गोष्ट हिंदूंचा हिंदुराष्ट्रस्थापनेचा निश्चय दृढ करीत
आहे. म्हणूनच हे सर्व क्लेष म्हणजे हिंदुराष्ट्राच्या जन्मापूर्वीच्या
प्रसवकळा आहेत.
    प्रसवकळा हा नवे मूल जन्माला येण्याच्या प्रक्रियेतील अविभाज्य
भाग आहे. तो टाळताच येत नाही. तसेच हिंदुराष्ट्राच्या जन्माच्या
प्रक्रियेतील या प्रसवकळा हिंदूंना टाळता येणार नाहीत. त्या सोसल्याच
पाहिजेत. त्याशिवाय जन्माला येणार्‍या नव्या हिंदुराष्ट्राचे मूल्य
आपल्याला कळणार नाही व त्याच्याबद्दल ममता, प्रेम निर्माण होणार
नाही.
                    विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.

No comments:

Post a Comment