अधिवक्ते संजिव पुनाळेकर यांच्यासह सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
अधिवक्ते श्री. संजिव पुनाळेकर हे हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आहेत. मी त्यांच्यासह हिंदु
विधिज्ञ परिषदेच्या कार्यालयात त्यांचा साहाय्यक म्हणून सेवा करतो. त्यांच्यासह सेवा करतांना
त्यांची काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. प्रत्येकालाच त्यातून बोध घेण्यासारखे काहीतरी आहेच. ती
गुणवैशिष्ट्ये येथे देत आहेत. आम्ही सर्व सहसाधक त्यांना ‘सर’ असे संबोधन लावतो. इथेही त्यांचा
‘सर’ असाच उल्लेख केला आहे.
१. अत्यंत नम्र असणे : सर वकिलीच्या पेशात असूनही अत्यंत नम्र आहेत. त्यांचे बालपण फारच
गरीबीत गेले आहे. आता ते सधन असले, तरी ती परिस्थीती ते विसरलेले नाहीत. त्यामुळे
प्रत्येकाशीच ते नम्रपणे बोलतात. सरांच्या कार्यालयात येणार्या प्रत्येकाला ते आहो-जाहो म्हणून
आदरानेच बोलतात. सरांना कधी रागाच्या भरात कुणाचा एकेरी उल्लेख करतांना मी पाहिलेले नाही.
सनातनचा साधक, मग तो वयाने लहान असला, तरी त्याच्याशी सर आदरानेच बोलतात.
२. अत्यंत प्रेमळ असणे : सर अत्यंत प्रेमळ आहेत. सरांचे (हिंदु विधिज्ञ परिषदेचे) कार्यालय ज्या
इमारतीत आहे, त्या इमारतीचे जीने फार उंच, अवघड आणि थोडे धोकादायक आहेत. त्यामुळे सर
कार्यालयात येणार्या प्रत्येकाला निरोप देतांना ‘जीना जपून उतरा’, असे आवश्य सांगतात. दिवसभरात
येणार्या प्रत्येकालाच असे सांगतांना ते कधीच कंटाळत नाहीत.
सरांच्या घरी कुणी साधक गेले, तर एखादे संत घरी यावे तसे सरांना होते. त्या
साधकासाठी काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन जाते. त्यांच्या नम्र प्रेमाखाली माणूस
अगदी दबूनच जातो.
३. अत्यंत प्रामाणिक असणे : सर आता वकिलीची नवी कामे घेत नसले, तरी पूर्वीची सुरू असलेली
कामे त्यांना पूर्ण करावी लागतात. त्या कामात ते अत्यंत प्रामाणिक आहेत. बारीक-सारिक गोष्टीत
हजारो रुपये उकळणारे अधिवक्ते मी पाहिले आहेत; पण छोट्या-मोठ्या कामाचे पैसे आशिलांनी दिले
तरी सर घेत नाहीत. ते सरळ सांगतात की, पैसे घेण्यासारखे मी यात काही केले नाही. मी फक्त
तुम्हाला सल्ला दिला आहे.
४. बारिक निरीक्षण : सरांकडे अनेक नवनवीन हिंदुत्ववादी वकील तसेच हिंदुत्ववादी व्यक्ती
भेटण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. या सर्वांशी बोलतांना सर त्यांचे बारिक
नरिक्षणही करीत असतात. यामध्ये सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे पाहून स्पंदनशास्त्राप्रमाणे काही वाटते
का ते पहातात. त्याचा एखादा विशेष गुण दिसला तरी ते टीपतात. त्याचा दोष आढळला तरी ते तो
लक्षात घेतात.
५. प्रचंड गती : सरांच्या प्रत्येक गोष्टीची गती ठरलेली असते. त्यांनी हातात घेतलेले काम / सेवा
ठराविक गतीने पुढे जात असते. ती गती कधी कमी होत नाही. जे काम हातात घेतले ते हातावेगळे
करूनच बाजूला ठेवले जाते. सरांनी एकदा पूर्ण केलेले ड्राफ्टींग किंवा काही मजकूर इतके अभ्यासपूर्ण
केले जाते की त्यात पुन्हा बदल करावा लागत नाही. सरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सरांनी एखादे
ड्राफ्टींग किंवा नोटीस किंवा तत्सम काही करावयास घेतले की ते एकटाकी पूर्ण होते. थोडे आज केले
उरलेले उद्या केले असे कधीच होत नाही.
६. धाडसी स्वभाव : अनेकदा धर्मकार्यात काही निर्णय घेतांना मी अनेकांना तासन् तास विचार
करीत बसलेले पाहिले आहे; पण सरांच्या समोर विषय आला की, क्षणाचाही विलंब न लावता,
त्यांच्याजवळ उत्तर तयार असते. त्यांचा निर्णय जलद आणि धाडसीही असतो. प्रत्येक वेळी
धर्मद्रोह्यांनी आधी धर्मावर हल्ला करायचा आणि नंतर धर्मप्रेमींनी तो रोखण्यासाठी धावपळ करायची.
ही गोष्ट सरांना आवडत व पटतही नाही. त्यांचा विचार हा असतो की, धर्मद्रोह्याला धर्मावर हल्ला
करायची संधीच का द्यावी ? परिस्थिती उलट हवी. धर्मप्रेमींनी अधर्मावर केलेला हल्ला रोखत
बसण्याची पाळी धर्मद्रोह्यांवर यायला हवी.
७. अत्यंत अनासक्त : सरांचे सर्वात मोठे गुणवैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत अनासक्त आहेत.
आर्थिकदृष्ट्या ते अत्यंत सधन आहेत; पण त्या गोष्टीचा रुबाब कधी त्यांच्या वर्तनात दिसत नाही. मी
त्यांना जवळ जवळ ५-६ वर्षांपासून ओळखतो. पण त्यांना पांढर्या रंगाव्यतिरीक्त अन्य रंगाचा शर्ट
घातल्याचे मी ५-६ वर्षांत एकदाच पाहिले आहे. एरवी कायम पांढरा शर्ट आणि काळी पँट हा त्यांचा
ठरलेला पोशाख आहे. सरांच्या अंगावर इतर बाजारी वकिलांसारखे दागिने कधीच दिसणार नाहीत.
सरांच्या अंगावर एकही दागिना नसतो. कुठलाच दागिना न वापरण्याविषयी त्यांनी शपथ घेतली
असल्याचे त्यांच्याच बोलण्यातून मला समजले.
मला वाटते सरांचे हे गुण म्हणजे त्यांचे अमुल्य असे दागीनेच आहेत. त्यामुळे अशा अनेक
गुणांनी युक्त असलेल्या संजिवसरांना सोन्या-चांदीचा मायेतील दागिना घालायची आवश्यकता ती
काय ?
विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.

No comments:
Post a Comment