Wednesday, 9 July 2014

दाभोलकरांच्या हत्येचे अन्वेषण काँग्रेसच्या पोपटाकडे !

हिंदूंनो, सावधान !
श्री. विक्रम भावे
         'डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजे सी.बी.आय.कडे सोपवले आहे. त्याप्रमाणे सी.बी.आय.ने अज्ञाताच्या विरोधात गुन्हाही दाखल केल्याचे वृत्त वाचनात आले. सी.बी.आय. म्हणजे काँग्रेसचे पोपट आहे, हे जगजाहीर आहे. अशा यंत्रणेकडून कशा प्रकारचे अन्वेषण होईल, याची कल्पना येते. - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
काँग्रेसच्या हस्तकांच्या माध्यमातून त्रासाची शक्यता ! 
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाले असले, तरी तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने देशावर राज्य केले आहे.
या साठ वर्षांच्या काळात काँग्रेसने पेरलेले विष बरेच खोलवर झिरपलेले आहे. अनेक शासकीय कार्यालयांत आणि अन्वेषण यंत्रणांत काँग्रेसचे दलाल त्यांची स्थाने पक्की करून बसलेले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसने तिची माणसे मुद्दाम घुसवलेलीही आहेत. त्यांचा वापर करून काँग्रेस सत्ताधारी भाजपला त्रास देण्याचा प्रयत्न भविष्यात करील. मोदी त्याला पुरून उरतील, अशी आशा आहे.
काँग्रेसचे श्वात अजूनही आतून काँग्रेसलाच साहाय्य करण्याची शक्यता !  
आजवर देशात अनेक घटना घडल्या, ज्यात कोण्या नेत्याने काँग्रेसच्या विरोधात बंड केल्यास त्या दिवशीचा सूर्य मावळण्याच्या आत सी.बी.आय. नावाचे काँग्रेसच्या दावणीला बांधलेले श्वानपथक त्या नेत्याच्या घरी धाड मारण्यासाठी पोहोचत असे. त्यावरून सी.बी.आय. म्हणजे 'सरकारचा पोपट', अशी टीकाही झाली होती. सत्तेचा माज चढलेल्या काँग्रेसच्या राज्यात ही गोष्ट सर्रासपणे चालत होती. आता ती तशी चालणार नाही; मात्र पूर्वीपासून या खात्यात घुसवण्यात आलेले काँग्रेसचे श्वान अजूनही आतून काँग्रेसलाच साहाय्य करतील अशी शंका येते. त्याचे कारणही तसेच आहे. आदर्शसारख्या घोटाळ्यात काही सनदी अधिकार्‍यांचीही नावे आली. अशा सनदी अधिकार्‍यांवर काँग्रेसने दबाव टाकला एवढेच त्यामागे कारण नाही. 'खा आणि खाऊद्या' हे काँग्रेसचे तत्त्व तेथे वापरले गेले आहे. या अधिकार्‍यांनीही अशा बर्‍यांच घोटाळ्यांत स्वत:चेही पोट भरले आहे आणि काँग्रेसलाही पोट भरू दिले आहे. म्हणजे काँग्रेसच्या घोटाळ्यांत या अधिकार्‍यांचेही हात अडकल्याने स्वत:ला वाचवण्यासाठी हे अधिकारी आतून काँग्रेसलाच साहाय्य करतील, अशी दाट शंका येते.
हिंदुत्ववाद्यांच्या माहितीचा अपवापर होण्याची शक्यता !
  दाभोलकरांच्या हत्येच्या अन्वेषणात महाराष्ट्रातील पोलीस तोंडावर पडले (कि राज्यकर्त्यांनी पोलिसांना तोंडावर पाडले ?) त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण आता सी.बी.आय.कडे म्हणजे काँग्रेसच्या पोपटाकडे सोपवण्यात आला आहे. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर काही घंट्यांतच 'सनातन संस्था' आणि 'हिंदु जनजागृती समिती' यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या पोलिसांनी अन्वेषण केले आहे. या अन्वेषणाच्या नावाखाली सनातनच्या सहस्रो साधकांची आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची छायाचित्रे, घरचे पत्ते, दूरभाष क्रमांक, भ्रमणभाष क्रमांक, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्रे, वाहन चालवण्याचे परवाने, यांच्या छायांकित प्रती यांचे संकलन पोलिसांनी केले आहे. त्यातून काहीही साध्य झाले नाही; पण आता काँग्रेसच्या पोपटाकडे अन्वेषण आल्याने आजवर संकलीत झालेल्या हिंदुत्ववद्यांच्या माहितीचा अपवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा !
त्यामुळे काँग्रेसच्या पोपटाकरवी या गोष्टीचे पुन्हा अन्वेषण केले जात असतांना वरील गोष्टी पुन्हा घडत असल्यास त्या गोष्टीची जाणीव या पोपटाला हिंदूंनी त्या त्या वेळी करून द्यावी. आजवरच्या उदाहरणांवरून सी.बी.आय. ही अन्वेषण यंत्रणा विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही, असे हिंदूंचे स्पष्ट मत झाले आहे. त्यामुळे ज्या गोष्टींविषयी पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी अन्वेषण केले आहे, त्याच त्याच गोष्टींसाठी हिंदूंनी त्यांचा अमूल्य वेळ देण्याची आवश्यकता नाही; मात्र अन्वेषणाच्या नावाखाली विनाकारण हिंंदूंना त्रास देण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी हिंदूंनी या वेळी सतर्क रहावे.
हिंदूंनी काँग्रेस आणि त्यांच्या दारातील पोपट अन् श्वानपथकाला घाबरण्याची आवश्यकता नाही !
आझाद मैदान हिंसाचाराच्या वेळी ५० सहस्र मुसलमानांनी दंगल केली. हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीस्तंभाला लाथ मारून देशद्रोह केला, शासकीय मालमत्तेची हानी केली, माध्यमांच्या गाड्या जाळल्या, अनेक महिला पोलिसांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली, तरीही फक्त ५७ मुसलमानांना अटक केली. त्यातीलही १०-१२ जणांच्या विरोधात काही पुरावे नसल्याने त्यांच्यावरील खटलेही मागे घेण्यात आले; मात्र शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांची इतकी घोर विटंबना होऊनसुद्धा ती करणार्‍यांच्या विरोधात एक चकार शब्द काढण्याचे धैर्य नसलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्या हिंदूंना मात्र शेकड्यांच्या संख्येने अटक केली आहे.
सच्चर सारखे दलाल पोसून धर्मांधांसाठी शिफारशी करणे, जातीय लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयकासारखी घटनाद्रोही विधेयके आणण्याचा प्रयत्न करणे, अल्-कैदा, लष्कर-ए-तोयबा सारख्या पाकिस्तानी जिहादी संघटनांची संकेतस्थळे चालू ठेवून हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर बंदी आणणे, ही जातीयवादी काँग्रेसची आणि त्यांच्या लाचार पोलिसांची नीती आहे; मात्र यापुढे हिंदूंनी काँग्रेस आणि त्यांच्या दारातील पोपट अन् श्वाानपथकाला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण हिंदु मतदार काय करू शकतो, हे समस्त जगाने या वेळी पाहिले आहे. विधानसभा तोंडावर आहे. त्यामुळे विनाकारण हिंदूंच्या वाटेला जाल, तर विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसला इतिहासाच्या पुस्तकात बसावे लागेल.

No comments:

Post a Comment