काँग्रेस म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजे काँग्रेस!
![]() |
| श्री. विक्रम विनय भावे |
काँग्रेस
म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजे काँग्रेस, हे समीकरणच झाले आहे. देशाच्या
जनतेला जे दिसते, त्या गोष्टी हिंदुत्ववादी उघडपणे बोलतात; पण काँग्रेसी
लोकांना ते उघडपणे बोलता येत नाही. मग त्यांच्या मनातील सल कशी बाहेर पडते,
त्याचे उदाहरण म्हणजे हा लेख आहे. - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु
विधीज्ञ परिषद, मुंबई.
हिंदूंना आणि हिंदूंच्या नेत्यांना नावे ठेवणे,
हे काँग्रेसींच्या जीवनाचे ध्येय !
हे काँग्रेसींच्या जीवनाचे ध्येय !
२४
मार्चच्या दैनिक लोकमतमध्ये राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार आणि लोकमतचे
संपादक विजय दर्डा यांचा लेख वाचला. मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे
मोदी, असे समीकरण मांडण्याचा प्रयत्न दर्डा यांनी त्यांच्या लेखात केला
आहे. या लेखाचा मूळ उद्देश मोदी यांना नावे ठेवणे, हाच आहे. अर्थात्च एक
कट्टर काँग्रेसी नेता हिंदूंना आणि त्यांच्या नेत्यांना शिव्या देणे, हे
स्वत:च्या जन्माचे ध्येय मानत असतो. मानोत बापुडे !
म. गांधींनी चुका केल्या, हे सत्य हिंदुत्ववादी उघडपणे
बोलतात; मात्र काँग्रेसी चार-चौघांत सत्य बोलण्यास भितात !
बोलतात; मात्र काँग्रेसी चार-चौघांत सत्य बोलण्यास भितात !
सदर
लेखातील पहिल्या काही ओळी वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, मोदीच
काय ? गांधींवर आणि त्यांच्या पुढील पिढ्यांवर आम्ही हिंदुत्ववादीही टीका
करत असतो. गांधींना महात्मा वगैरे मानत नाही, असे आम्ही जाहीरपणे सांगतो.
इतकेच काय; पण मोहनदास गांधी हे भारताचे राष्ट्रपिता नसून पाकचे
राष्ट्रपिता आहेत, असेही आम्ही हिंदुत्ववादी जाहीर सभांतून सांगतो.
मोहनदासांनी चुका केल्या, तसेच ते आडमुठे अन् हट्टी होते, हे
सूर्यप्रकाशाइतके सत्य आम्ही हिंदुत्ववादी उघडपणे बोलतो. तथापी स्वत:ला
गांधी घराण्याचे निस्सीम भक्त म्हणवणार्या अनेक
काँग्रेसींनाही तेच वाटते. केवळ ते काँग्रेसी चार-चौघांत सत्य बोलण्यास
भीतात इतकेच ! पण त्यांच्या मनातील ही सल कधीतरी बाहेर पडतेच. त्याचे उत्तम
उदाहरण म्हणजे दर्डा साहेबांचा हा लेख आहे.
काँग्रेसमधील कोणत्याही गांधीने घेतलेल्या निर्णयाला काँग्रेसींना आव्हान देता न येणे !
मोदींवर
टीका करतांना दर्डा म्हणतात, मोदींना भाजपमध्ये गांधी परिवारासारखा प्रभाव
आणि अधिकार हवा आहे. त्यांच्या कोणत्याही निर्णयाला पक्षात कोणीही आव्हान
देऊ नये, तसेच त्यांची कोणतीही इच्छा डावलली जाऊ नये, असे मोदींना वाटते.
याचा सरळ अर्थ हाच होतो की, गांधी आणि त्यांच्या पुढील पिढ्या काँग्रेस
पक्षाचे सर्वाधिकार आपल्या हातात घेऊन बसले आहेत. काँग्रेसमधील कोणत्याही
गांधीने घेतलेल्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ नये, असा काँग्रेसमध्ये नियम
आहे. याला परंपराही आहे. सुभाषबाबू (नेताजी सुभाषचंद्र बोस) काँग्रेसचे
अध्यक्ष होणार, हे कळल्यावर मोहनदासांनी काँग्रेस कशी वाकवली, हे उभ्या
भारताला माहीत आहे.
म. गांधी आडमुठेपणाने वागले आणि त्यांच्या पुढील पिढ्याही तशाच वागत
आहेत, ही सल काँग्रेसींच्या मनात असणे !
फाळणीच्या
वेळीही याच मोहनदास गांधींनी हिंदूंना फसवून पाकला ५५ कोटी रुपये (आताचे
१४ सहस्र कोटी रुपये) देण्यास भाग पाडून काँग्रेस कशी वाकवली, हे आजही उभा
देश जाणतो. आजही मनमोहन यांनी बनवलेला मसूदा फाडून स्वत:ला हवा तसा तो
करायला लावून राहुल यांनीही मोहनदासांची आठवण करून दिलीच की ! थोडक्यात काय
? तर मोदी हे गांधी परिवारासारखे वागू पहात आहेत किंवा त्यांना तसे
वागण्याची इच्छा आहे, असा आरोप दर्डाजी करत असले, तरी मोहनदास गांधी
आडमुठेपणाने वागले आणि त्यांच्या पुढील पिढ्याही तशाच वागत आहेत, या
गोष्टीची सल दर्डाजींच्या मनात आहेच. त्यामुळे मोदींवर टीका करतांना
अनाहूतपणे दर्डाजींकडून ती सल व्यक्त झाली.
कोणतेही मंत्रीपद नसतांना शासकीय विज्ञापनांत पंतप्रधानांच्या बरोबरीने
सोनियांचे छायाचित्र लागणे !
दर्डाजी
त्यांच्या लेखात म्हणतात, मोदींचा उच्चरवाने प्रचार चालू आहे. माध्यमे
त्याला साथ देत आहेत. त्यांचा प्रतिकार करणारी काँग्रेसची प्रचारयंत्रणा
अत्यंत दुबळी आहे. दर्डांचे हे विधान म्हणजे काँग्रेसी माणूस किती खोटे
बोलू शकतो, याचे उदाहरण आहे. गेल्या अनेक मासांपासून शासनाच्या वेगवेगळ्या
खात्यांनी केलेल्या आणि न केलेल्यासुद्धा कामांची विज्ञापने
वर्तमानपत्रांतून आणि फलक टांगून केली जात आहेत. त्या सर्व विज्ञापनांत
पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या बरोबरीने सोनिया आणि राहुल यांचीही
छायाचित्रे आहेत. शासनात कोणतेही मंत्रीपद नसतांना शासकीय विज्ञापनांत
पंतप्रधानांच्या बरोबरीने सोनियांचे छायाचित्र लागू शकते, यावरून
काँग्रेसची प्रचारयंत्रणा दुबळी आहे, अशी थाप दर्डाजी दिवसाढवळ्या मारतात,
याला काय म्हणावे ?
समाजाला अहिंसेची इंजेक्शने देऊन नपुंसक करणारी काँग्रेस म्हणते,
लोकमत जागृत करण्याची आवश्यकता !
आपल्यासारख्या
लोकशाही देशात लोकमत जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे दर्डाजी लेखात
शेवटी म्हणाले आहेत. (हे दैनिक लोकमतचे विज्ञापन तर नव्हे ना ?) या एका
वाक्यातच काँग्रेसींनी मोदी यांची किती धास्ती घेतली आहे, हे दिसून येते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतावर सर्वाधिक काळ काँग्रेसनेच सत्ता
केली (गाजवली); पण आता मोदी नावाच्या चक्रीवादळामुळे काँग्रेसच्या होडीची
शिडे फाटू लागल्याने लोकमत जागृत करायला हवे, असा साक्षात्कार दर्डाजींना
झाला आहे. याचा अर्थच असा की, ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने देशावर
सत्ता केली; पण काँग्रेसने लोकमत जागृत होऊ दिले नाही. काँग्रेसने
जाणूनबुजून लोकमत झोपवून ठेवले. अहिंसेची इंजेक्शने टोचून टोचून काँग्रेसने
भारतीय समाजाला नपुंसक बनवले. आता हेच काँग्रेसी म्हणतात की, जनमत जागृत
होण्याची आवश्यकता आहे !
१६ मे या दिवशी काँग्रेसचे होडके तळ गाठील !
एकूणच
अनेक नेत्यांची भाषणे आणि वार्तालाप ऐकला, तर त्यांचा सूर आम्हाला निवडून
द्या, असे म्हणण्याऐवजी मोदी नको रे बाबा, असा असतो. मोदींच्या धास्तीने या
काँग्रेसींना एवढे पछाडले आहे की, स्वत:च्या पक्षाचा प्रचार करण्याऐवजी ते
आपोआप मोदींचाच प्रचार करत आहेत. असो घोडे-मैदान जवळ आहे. काँग्रेसी घोडी
कितीही खिंकाळली, तरी मोदींच्या डरकाळीत त्या खिंकाळ्या विरून जातील.
काँग्रेसच्या होडीचे शिड फाटलेले आहेच. आता १६ मे या दिवशी काँग्रेसच्या
होडक्याला मोठा दणका बसून ते कायमचे रसातळाला जाईल !

No comments:
Post a Comment