Friday, 8 January 2016

सबनीस जिंकले, रसिक हरले!!


अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये.
तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती. त्यावेळी अभिव्य्कती स्वातंत्र्याचा एरवी गजर करणारी मंडळी थंडच होती. शरद पवार आणि विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेत होते. पण यादवांच्या समर्थनार्थ सरकारने काहीही केले नाही. बघ्याची भूमिक घेतली असे म्हटले तर वावगे ठरू नये. यादव काही महाबळेश्वरच्या त्या संमेलनात पोचलेच नाहीत. अध्यक्षाविना पार पडलेले ते एकमेव संमेलन असावे.

Saturday, 2 January 2016

नमस्कार !
मोदींनी पाकिस्तानला अचानक भेट दिली. राजकिय सामाजिक आणि मिडियाच्या वर्तुळात जरा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात काही घडो न घडो पण निखील वागळेंच्या चॅनलला खाऊ मिळाला आणि त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली एवढे नक्की