Monday, 30 November 2015

हे साहित्यिक कि निधर्म्यांची प्यादी ?

श्री. विक्रम भावे
     गेल्या काही दिवसांपासून अनेक पुरोगामी साहित्यिक आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते येत आहेत. त्यात आता संशोधकांनीही पुरस्कारवापसीची फॅशन अंगीकारली असल्याचे समजते. आजवर कित्येक अणू शस्त्रज्ञांचे गूढ मृत्यू झाले; पण संशोधकांना लोकशाही आणि देशहित धोक्यात आल्यासारखे कधीच वाटले नाही ?
१. पुरस्कारवापसी म्हणजे प्रसिद्धीची भाबडी आशा
     देशातील लोकशाही धोक्यात असून त्याचा निषेध करण्यासाठी काही साहित्यिक आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते गेले काही दिवस वाचनात येत आहेत. अर्थात् ही वृत्ते तेवढी वाचनात आली; पण खरंच पुरस्कार परत केल्याचे विश्‍वसनीय वृत्त अजूनही वाचायला मिळालेले नाही. अर्थात् पुरस्कारप्राप्तीच्या वेळी जी प्रसिद्धी मिळाली, तशी परत न मिळाल्याने निदान पुरस्कार परत करण्याच्या नावाखाली तरी प्रसिद्धी मिळेल, अशी भाबडी आशाही असावी. पुरस्कारातील प्रमाणपत्र परत केले; म्हणजे पुरस्कार परत केला, असे म्हणता येत नाही. स्मृतीचिन्ह, मानधन (शाल विरून गेली आणि नारळ साहित्यिकांनी खाल्ला असेल, असे गृहित धरू) या सर्व गोष्टीही परत करण्याची साहित्यिकांची सिद्धता आहे का ? तसे नसेल; तर मात्र हा प्रसिद्धीचा स्टंटच म्हटला पाहिजे.

Thursday, 5 February 2015

प्रॉक्सी वॉर : पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध आणि आंधळे भारतीय राज्यकर्ते !

 श्री. विक्रम भावे
भारताच्या गुप्तचर विभागात काम करणार्‍या एका अधिकार्‍याच्या भाषणात काही सूत्रे आली. भारताशी समोरासमोर टक्कर देणे कदापि शक्य नसल्याने पाकिस्तानने (म्हणजे आय.एस्.आय.ने) भारताविरुद्ध जवळजवळ २० वर्षांपूर्वीच एक छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) आरंभले आहे; मात्र आंधळ्या भारतीय राज्यकर्त्यांना त्यांची गंधवार्ताही नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. भारताच्या गुप्तचर यंत्रणांना या सर्व गोष्टींची माहिती असते; परंतु त्यांनी दिलेल्या माहितीचा आजवरच्या राज्यकर्त्यांनी जातीय राजकारणासाठी वापर केला. वेळ प्रसंगी गुप्तचर यंत्रणांना तोंडावर पाडण्याचे काम आजवरच्या निधर्मी राज्यकर्त्यांनी केले आहे. आता भारतात सत्तापालट झाला आहे. भाजप शासन या गोष्टी जाणून त्यावर शाश्‍वत तोडगा काढेल अशी आशा आहे
संकलक - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद