हिंदू नरिंसहाने काँग्रेसी हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला
गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ अशी माध्यमांची अवस्था : १६ मे या दिवशी भारतातील लोकसभाग निवडणुकीचे निकाल लागले. निवडणुका होण्यापूर्वीच ज्या गोष्टीची शक्यता उघडपणे वर्तविली जात होती, ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. देशभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या अपशकुनी लोकांच्या टोळ्यांचा दारूण पराभव झाला. देशात मोदींचा लाट आहे का, असा प्रश्न माध्यमे बेंबीच्या देठापासून ज्याला-
त्याला विचारून सनसनाटी निर्माण करू पहात होती. काही ठिकाणी माध्यमे शेवटच्या क्षणापर्यंत मोंदींच्या गुजरात मॉडेलवर तोंडसूख घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जसे निवडणुकीचे निकाल लागून मोदी लाटेकडे
जनतेचा कौल दिसू लागला. तसे माध्यमांतील सरड्यांनी दोन्ही काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली होती. मोंदींना स्पष्ट बहुमत मिळाल्यावर जी माध्यमे मोंदींवर काल रात्रीपर्यंत टीका करीत होती, ती मोंदींच्या बाजूने उभी राहून आधीच्या राज्यकत्र्यांना ‘यांना सत्तेचा माज चढला होता’, वगैरे पर्यंत बोलू लागली. माध्यमांच्या या वागण्यावरून खेडेगावकडील एक म्हण आठवते ती म्हणजे ‘गावात जेवणावळ आणि कुत्र्यांची तारांबळ.’ अगदी अशीच अवस्था माध्यमांची झालेली दिसत आहे.
हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून सूड उगविला : निवडणुकीच्या निकालानंतर जे काही समोर आले, त्यावरून हे स्पष्ट झाले की, दोन्हीकाँग्रेसने धर्मनिरपेक्षवाद नावाच्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीला उधाण आणले होते. मात्र दोन्ही काँग्रेस एक गोष्ट विसरले की, हा देश हिंदू बहूल आहे आणि हिंदूंच्या देशात धर्मरिपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंनाच चीरडून मुसलमानांचे लाड केलेले हिंदू खपवून घेणार नाहीत. दोन्ही काँग्रेसने चालविलेले मुसलमानांचे अती लाड न कळण्याइतके देशातील हिंदू मन मेलेले नाही. त्यामुळे आजवर कॉग्रेसने हिंदूंचा जो छळ केला, त्याचा सूड हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून उगवला आहे.
महाराष्ट्राने काँग्रेसवर दया केली : लोकसभेच्या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. आजवर महाराष्ट्रातील तमाम काँग्रेसींनी दिल्लीच्या पायाशी आपली निष्ठा वाहिली होती. मात्र काँग्रेसची सत्ता असूनही महाराष्ट्राच्या
वाट्याला कधी न्याय आला नाही. ही गोष्ट अनेकदा चर्चेत आली, महाराष्ट्रातील काँग्रेसींनीही ही सल कधीकधी बोलून दाखविली होती. असे असूनही दिल्लीने कधीही महाराष्ट्राला पुढे येऊ दिले नाही. त्याचे कारण या निकालानंतर समजले. ज्या महाराष्ट्रातील मुंबई हा देश चालविते, ज्या महाराष्ट्रातील लोकांनी काँग्रेसच्या पायी निष्ठा वाहिली, त्या गोष्टींबद्दल दिल्लीला कधीच आदर वाटला नाही, त्याचा सूड महाराष्ट्राने उगविला आहे. वर्षानुवर्षे दिल्ली काबीज ठेवण्यासाठी काँग्रेसला ज्या महाराष्ट्राने साथ दिली होती, त्याच महाराष्ट्रात काँग्रेसचे पानीपत झाले. भारताच्याच काय जगाच्या इतिहासात हे एकमेव उदाहरण असेक की, ४५ जागांपैकी फक्त आणि फक्त १ जागा काँग्रेसला दया म्हणून महाराष्ट्राने दिली.
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अधिकाधिक मते पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते नेटाने प्रयत्न करीत होते. सवयीप्रमाणे (मृत्युपंथाला लागलेल्या) काँग्रेसवाल्यांनी तर दिल्लीच्या शाही इमामाला आणि पाद्र्यांना नवसही बोलले होते. जाहीर सभांत भाषण करतांना हे काँग्रेसी छाती फुटेपर्यंत ओरडून सांगत होते की, ‘धर्मनिरपेक्ष मते विभागली जाणार नाही, धर्मनिरपेक्ष मते भाजपच्या
बाजूला जाणार नाहीत.’ अर्थात काँग्रेसींची एवढी तरी एक गोष्ट खरी ठरली. या देशातील धर्मनिरपेक्ष मते काँग्रेसला मिळाली. ती किती होती हे काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या संख्येवरून आपल्या लक्षात येते. आणि जर देशात धर्मनिरपेक्ष मते इतकीच आहेत, तर याचा स्पष्ट अर्थ हाच होतो की, हा देश हिंदूबहूल आहे आणि हिंदुत्ववादी मते इतक्या प्रमाणात आहेत. मात्र या हिंदू मतदारांना विश्वास वाटेल असा उमेदवार आजवर
मिळत नव्हता. मोंदींच्या रूपाने तो मिळाला आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व’ या दिशेने भारताचे पहिले पाऊल पडले आहे.
हिंदु नरसिंहाने काँग्रेसी हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला : एकूण परिस्थिती हेच सांगते की, काँग्रेस मृत्युपंथाला लागलेली आहे. ही निवडणूक कुठल्याही पक्षासाठी अस्तित्वाची ठरेल, असे अनेक विश्लेषकांनीही सांगितले होते. त्याप्रमाणे तमाम हिंदू मतदारांनी काँग्रेसची तिरडी बांधली. आता काँग्रेसी बंडखोर काँग्रेसची अंतयत्रा काढतील आणि नरेंद्र मोदी काँग्रेसच्या चितेला अग्नी देतील. काँग्रेसच्या मढ्यावर रडायला भारतात कोणी शिल्लक न राहिल्याने रडण्यासाठी इटली आणि पाकिस्तानातून भाडोत्री रडे बोलावण्याची वेळ येईल हे नक्की. कारण या निवडणुकीत हिंदु नरसिंहाने काँग्रेसी हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला आहे.
- विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद, मुंबई.
No comments:
Post a Comment