Wednesday, 9 July 2014

मग महंमद अफझलला पंतप्रधान का नाही केले ?

श्री. विक्रम भावे
      राष्ट्र्रवादाच्या सूत्रावरून काँग्रेसशी तलाक घेतलेल्या आणि नंतर पुन्हा काँग्रेसच्याच पडवीत संसार थाटून स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्या शरच्चंद्ररावजी पवार साहेबांची पुण्याजवळील कुठल्यातरी माळावर त्यांच्या कन्यारत्नाच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. या सभेत शरच्चंद्ररावजी म्हणाले की, नरेंद्र मोदींची उमेदवारी म्हणजे संसदीय लोकशाहीवरील आक्रमण आहे. पुढे भाषणात हे म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला आहे. 
मग महंमद अफझलला पंतप्रधान करायचे होते ! 
     मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून भल्याभल्यांचे राजकीय जीवन उतरंडीला लागले आहे. सुब्रम्हण्यम् स्वामी ज्यांना इटालीतील बार गर्ल असे जाहीरपणे बोलले होते, त्या सोनियांनादेखील मोदींच्या नावाने धडकी भरली. सगळ्यात मोठ्या (म्हणवल्या जाणार्या) पक्षाच्या अध्यक्ष बाईंची ही स्थिती, तेथे राष्ट्रवादीसारख्या प्रांतिक पक्षाची काय कथा ? त्यामुळे पवारांच्याही काळजाचा ठोका चुकला आहे, हे लक्षात येते. मोदींची उमेदवारीच यांना संसदेवरचा हल्ला वाटू लागली. मग महंमद अफझललाच पंतप्रधान करायचे होते. जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी संसदेला वेठीस धरले म्हणून शिमगा करणार्या याच काँग्रेसींनी महंमद अफझलला इतकी वर्षे का पोसले ? म्हणजे संसदेच्या अब्रूची किंमत सोयीनुसार केली जाते का ? मुळात असले लोक संसदेत बसणे, याहून मोठी संसदेची बेअब्रू ती कोणती ? 

हिंदूंना जशा साध्वी प्रज्ञासिंह वंदनीय तशी कथित राष्ट्रवाद्यांना 'इशरत' प्रिय !
      प्रतिवर्षी शरच्चंद्ररावजी साहेबांपासून ते अगदी आबा, बाबापर्यंत सगळे जण रमजान आला की, हज हाऊसमध्ये जाऊन फरच्या टोप्या घालून, इमामांना खजूर भरवून त्याचे फोटो काढून घेतात; पण कोण्या दसर्याघला किंवा गुढीपाडव्याला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत पत्रावर सर्व हिंदूंना त्या-त्या सणांच्या साध्या कागदी शुभेच्छा कधी दिल्या नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक झाल्यावर हेच पवार म्हणाले की, 'मालेगाव स्फोट प्रकरणात अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यावर देशात स्फोट झाले नाहीत. याचा अर्थ आजपर्यंतचे स्फोट यांनी केले होते'. हे शरच्चंद्ररावजी इशरत जहाँसाठी इतके रडले की, त्यांच्या डोळ्यांतील पाणी सुकून गेले, असे म्हणतात. इतके होऊनही हेडलीने अमेरिकेतील न्यायालयापुढे दिलेल्या साक्षीत इशरत आतंकवादीच होती, अशी स्वीकृती दिल्यावर इशरतची बाजू घेऊन आम्ही चूक केली, असे म्हणायला हे सिद्ध नाहीत. म्हणजे हिंदूंना जशा साध्वी प्रज्ञासिंग प्रिय तशी कथित राष्ट्रवादी पक्षाला इशरत अजूनही प्रिय वाटते ! 
 दोन्ही काँग्रेसने मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले ! 
      २६ नोव्हेंबर या दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून प्रशिक्षित करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले. तेव्हा वारेमाप वक्तव्यांमुळे आणि माध्यमांच्या दबावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जड अंत:करणाने खुर्च्या सोडाव्या लागल्या होत्या. २०० पेक्षा अधिक माणसे मेल्यावर आबा म्हणतात, 'मुंबईसारख्या शहरात अशी एखादी घटना घडणारच'. दुर्दैवाची गोष्ट ही की, या दोन्ही मंत्र्यांनी खुर्च्या सोडून काही मास उलटले नाहीत, तोच देशमुख केंद्रात मंत्री म्हणून गेले आणि आबा आपले पुन्हा राज्याचे गृहमंत्री झाले ! हा प्रकार म्हणजे मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणेच आहे. पुढे कसाबच्या सुरक्षेसाठी इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस तैनात करण्यात आले. त्यांचे वर्षाचे १० कोटी रुपये देयक देण्याची वेळ आल्यावर आबा म्हणतात, 'हे तर देशावरचे आक्रमण होते. मग आम्हीच का पैसे द्यायचे ? केंद्रानेही द्यायला हवेत'. म्हणजे २६/११ चे आक्रमण हे देशावरील आक्रमण, असे आबांना वाटत होते, तर आक्रमण झाल्या झाल्या आबांनी केलेले वक्तव्य म्हणजे हल्लेखोर मुसलमान असल्याने घटनेचे गांभीर्य न्यून करून मुसलमानांना पंखाखाली घेण्यासाठी केलेला प्रयत्न होता, हे स्पष्ट होते. 
दोन्ही काँग्रेस आणि त्यांचे नेतेच खरे जातीयवादी ! 
      दोन्ही काँग्रेसचे नेते हिंदुत्ववादी व्यक्ती, पक्ष आणि संघटना यांना जातीयवादी असे संबोधतात. गुजरातेत दंगे होऊन एक तप उलटत आले, तरी उठसूट गुजरात दंग्याविषयी बांग देत दोन्ही काँग्रेसचे नेते मोदींवर टीका करतांना दिसतात. स्वत: मात्र मराठा जातीला आणि मुसलमानांना विशेष आरक्षण देण्याच्या बाता मारून स्वत:चे जातीयवादी दात दाखवून देतात. निवडणुका आल्या की, देहलीच्या शाही इमामाचे तळवे चाटायला दोन्ही काँग्रेसी पुढे असतात. हिंदु हा धर्म आहे. जात नव्हे. त्यामुळे हिंदुत्ववादी हे जातीयवादी ठरूच शकत नाहीत. उलट मुसलमानांना विशेष आरक्षण देणे हाच जातीयवाद आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच खरे जातीयवादी आहेत. 
दोन्ही काँग्रेसकडून घटनेची मोडतोड !
     ' डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला', असे पवार म्हणाले. त्या बाबासाहेबांनी आणखीही गोष्टी त्याच वेळी सांगून ठेवल्या होत्या. ज्यामध्ये दहा वर्षांनी आरक्षण रहित करावे, असेही सांगितले होत; मात्र आज डॉ. आंबेडकरांचा अपमान करत त्यांनी निर्माण केलेल्या घटनेची दोन्ही काँग्रेसेन मोडतोड चालवली आहे. 'धर्मनिरपेक्षता' हा शब्दच डॉ. आंबेडकरांनी लिहिला नव्हता. तोही यांनीच घुसवला. घटनेने दिलेले स्वातंत्र्य म्हणून आम्ही हिंदु राष्ट्र्राचा उघड पुरस्कार केला, तर काँग्रेसवाले घाबरले आणि आम्हाला घटनाविरोधी ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला.
 'मंत्र्यांच्या बायका, मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याशिवाय देशातील बलात्कार थांबणार नाहीत', असे एका मध्यमवर्गीय नागरिकाने सांगणे ! 
      ६० हून अधिक वर्षे भारतावर राज्य केलेल्या काँग्रेसला अजूनही मुली-बाळींना सुरक्षा देता आलेली नाही. झाडावरून पान गळणे, ही जशी क्षुल्लक गोष्ट आहे, तशी भारतात बलात्कार होणे, ही आज सामान्य गोष्ट झाली आहे. कार्याच्या निमित्ताने घरोघर फिरतांना हा विषय निघत असे. पुण्यातील एका गृहस्थांकडे गेलो असतांना देशात होणार्या बलात्कारांचा विषय निघाला. तेव्हा त्या गृहस्थांनी मनातील चीड व्यक्त केली. ते म्हणाले, या देशातील बलात्कार तेव्हाच थांबतील, जेव्हा केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या बायका मुलींवर सामुहिक बलात्कार होतील. सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या मनात काँग्रेसविषयी ही भावना आहे. काँग्रेसींनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. काँग्रेसने ६० वर्षांहून अधिक काळ भारतावर बलात्कार केला. त्यांची शिक्षा भोगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे काँग्रेसींना मोदींचे भय नसून त्या शिक्षेचे भय वाटते आहे, असे वाटते. 
संकलन : श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधिज्ञ परिषद, मुंबई

No comments:

Post a Comment