काँग्रेसची वधस्तंभाकडे वाटचाल !
![]() |
| श्री. विक्रम विनय भावे |
लोकसभा
निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय झाली
आहे. अशा काँग्रेसला आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आणखी एका धक्का
देऊन तिला वधस्तंभाकडे नेले पाहिजे.
- श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
काँग्रेसचे अपराध
देशावर
सहा दशके सत्ता गाजवतांना काँग्रेसला सत्तेचा माज आला होता. काँग्रेस
मदोन्मत्त झाली होती. त्या उन्मादात काँग्रेसने अनेक पापे केली.
सामाजिक गोष्टीत तर सोडाच; पण राष्ट्राच्या संरक्षणाच्या बाबतीतही बोफोर्स
सारखे घोटाळे करून काँग्रेसने राष्ट्रद्रोह केला आहे. मुसलमनांना तुष्ट
करण्यासाठी हिंदूंना जेथे जेथे म्हणून तुच्छ लेखता येईल, तेथे तेथे
काँग्रेसने हिंदूंचा मानभंग केला. हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी
जे जे म्हणून करणे शक्य होत होते, ते ते काँग्रेस (म्हणजे समस्त
काँग्रेसवाले) करत राहिले. ही सर्व पापकर्मे प्रत्यक्षपणे करणार्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह इत्यादी लोकांना मूकसंमती देणार्या मनमोहन सारख्या हतवीर्य लोकांनाही त्याचे तितकेच पाप लागते.
हिंदूंच्या मिठाला न जागलेली काँग्रेस !
सरकार
पित्याप्रमाणे असायला हवे. जनतेला सरकारने अपत्याप्रमाणे वागवायला हवे.
त्यामुळे जनतेला काय हवे यापेक्षा जनतेला काय आवश्यक आहे, ते देण्यावर
शासनाचा भर हवा. काँग्रेसच्या राज्यात मात्र उलट होत राहिले. काँग्रेसचे
प्रत्येक धोरणही अल्पसंख्यांकांना तुष्ट करण्यासाठी बनत राहिले. ज्या देशात
आपण रहातो, तो हिंदूबहूल देश आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या जिवावर आपण
सत्तेत आहोत, त्यांना डावलून चालणार नाही, हे सामान्य ज्ञानही त्या
उन्मादात काँग्रेसवाले विसरले. दक्षिण भारतातील एक प्रख्यात नेता तेथील
राज्याच्या पोलीस महासंचालकालाही म्हणाला होता की, 'ज्या पैशातून तू तुझ्या
बायको-मुलांचे कपडे घेतोस, तो पैसा मी भरलेल्या करातून निर्माण होतो.'
त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसने हिंदूंचे मीठ खाल्ले; पण खाल्ल्या मिठाला
ती जागली नाही. जातीच्या राजकारणाची, मुसलमानांच्या तुष्टीकरणाची,
हिंदूंच्या संतांच्या अपकीर्तीची, निष्पाप हिंदूंना कारागृहांत सडवण्याची,
महागाईची, भ्रष्टाचाराची, गुन्हेगारीची परिसीमा काँग्रेसने गाठली. त्यामुळे
हिंदूंचे मीठ खाऊन मुसलमानांच्या पायाशी निष्ठा वाहिलेल्या काँग्रेसला
हिंदूंनी लोकसभा निवडणुकीत जागा दाखवली.
चिंताग्रस्तांच्या चिंतन बैठका !
लोकसभेच्या
निवडणुकांचे निकाल लागून आता आठवडा उलटून गेला, तरी दोन्ही काँग्रेसच्या
चिंतन बैठकाच चालू आहेत. काँग्रेसच्याच गोटातून असे कानावर आले की, इतका
मानहानीकारक पराभव इतिहासात प्रथमच झाल्याने पत्रकारांपासून तोंडे
लपवण्यासाठी आमचे नेते चिंतन बैठकांत जाऊन एकमेकांची धुणी धुवत आहेत.
प्रत्यक्षातही तेच दिसते आहे. एक-दोन अपवाद सोडले, तर काँग्रेसच्या जुन्या
'जाणत्या' लोकांपैकी एकाचेही वाहिन्यांपुढे येण्याचे धैर्यच झाले नाही.
काही बोलघेवडे एकमेकांवर थेट आरोप करतांना दिसत आहेत. काँग्रेसच्या काही
कार्यकर्त्यांनी तर साक्षात राहुल गांधींचाच पुतळा जाळला. कोणाला प्रियांका
वडेरा या तारणहार वाटू लागल्या, तर कोणाला मनमोहनांचे मौन पराभवाला
कारणीभूत असल्याचा साक्षात्कार झाला. मोदी नावाच्या चक्रीवादळाचा परिणाम
पाहून काँग्रेसींच्या उरात अशी धडकी भरली आहे की, 'चिंतन बैठका' नावाचा एक
नवीन बैठा खेळ वेळ घालवण्यासाठी त्यांनी चालू केला आहे. येत्या विधानसभा
निवडणुकीत उरली-सुरली अब्रू तरी वाचावी म्हणून शक्य ते करण्याची धडपड
काँग्रेसच्या तंबूत चालू आहे.
एक धक्का और दो काँग्रेस को गाड दो !
स्वातंत्र्यवीर
सावरकरांची ही घोषणा होती की, 'एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो'
त्याप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत उरली-सुरली काँग्रेस संपवण्यासाठी 'एक
धक्का और दो, काँग्रेस को गाड दो' अशी घोषणा हिंदूंनी द्यावी. लोकसभा
निवडणुकीत काँग्रेस अर्धमेली झाली असली, तरी पूर्ण संपली नाही. हा
हिंदुस्थान अकबर-बाबरांसारख्या जिहाद्यांचा वारसा सांगत नाही तर
चंद्रगुप्त-चाणक्याचा वारसा सांगतो. चाणक्याने म्हणून ठेवले आहे की, अग्नि,
ऋण आणि शत्रू यांना पूर्णपणे नाहीसे करावे. कारण या तिन्ही गोष्टी
थोड्याशा शिल्लक राहिल्या तरी पुन्हा वाढतात. चाणक्याचे हे सूत्र लक्षात
घेऊन या वेळी हिंंदूंनी उरली-सुरली धर्मनिरपेक्षता सोडून शतप्रतिशत
हिंदुत्व रक्तात संचारू आणि सळसळू द्यावे.
काँग्रेसची वधस्तंभाकडे वाटचाल !
१६ मे या दिवशी शुक्रवार होता. 'धर्मनिरपेक्षता' नावाची अंधश्रद्धा पसरवणार्या काँग्रेसला
आशा होती की, निवडणुकीचे निकाल शुक्रवारी म्हणजे जुम्म्याच्या दिवशी
लागल्याने विजय मिळेल; पण या वेळी तो शुक्रवार जुम्म्याचा नसून कालीमातेचा
ठरला. चंड-मूंड संहारिणी कालीमातेने हिंदूंना भरभरून आशीर्वाद आणि चैतन्य
दिले. ज्याच्या जोरावर समस्त हिंदूंनी काँग्रेसची राजकीय हिंसा केली. आता
काँग्रेसचे उरले-सुरले प्राण विधानसभा निवडणुकीत हिंदु नरसिंहाने घ्यावेत.
म्हणजे काँग्रेसची वधस्तंभाकडे वाटचाल चालू होईल आणि भारताची हिंदु
राष्ट्राकडे !

No comments:
Post a Comment