Thursday, 23 January 2014

मडगाव स्फोट प्रकरण : पोलीस व काँग्रेस यांना दिगंबरावस्था

३१ डिसेंबर २०१३ या दिवशी गोव्याच्या विशेष न्यायालयाने मडगाव
स्फोट प्रकरणातून सनातनच्या सर्व सहा साधकांना निर्दोष सोडले.

स्फोटाच्या वेळी सनातनची ‘सुपारी’ घेऊन उर बडविणार्‍या
चॅनेलवाल्यांना खटल्याच्या निकालाच्या वेळी दातखीळ बसली होती.
चॅनेलवाल्यांची दातखीळ आणि पोलिसांच्या कानाचे दडे
उघडण्यासाठी.....




काँग्रेस आणि पोलीस यांना न्यायालयात ‘दिगंबर’ अवस्था : दिनांक
३१ डिसेंबर २०१३ या दिवशी मडगाव स्फोट प्रकरणातील सर्व सहा
आरोपींना गोवा विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. राष्ट्रीय तपास
यंत्रणा या आरोपींच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे न्यायालयासमोर
आणू शकली नाही. प्रथमदर्शनी अहवाल तर सनातन संस्थेला
अडकविण्याच्या हेतून लिहिला गेल्याचे न्यायालयाने विशेषत्वाने नमूद
केले.
    १६ ऑक्टोबर २००९ या दिवशी मडगावला स्फोट झाल्यावर
पोलिसांनी मागचा-पुढचा विचार न करता थेट सनातनच्या आश्रमावर
धाड टाकली. तेथे काहीच मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांचा पोपट
झाला. आता घडलेल्या घटनेशी सनातनचा संबंध जोडण्यासाठी
काहीतरी केलेच पाहिजे, या सनातन द्वेषाच्या विचाराने पोलीस आणि
काँग्रेसी या दोघांना झपाटले. त्या झपालेल्या अवस्थेतच पोलिसांनी
आणि ‘दिगंबर’ कामत सरकारने तपासात जीवाचे रान केले; पण
शेवटी काँग्रेस आणि पोलीस दोघांनाही न्यायालयात ‘दिगंबर’ अवस्था
प्राप्त झाली.

सनातनच्या निर्दोषत्वाची बातमी दाखविण्याची हींमत
चॅनेलवाल्यांमध्ये नाही :
मडगावात स्फोट झाला. त्यात सनातनचे दोन
कार्यकर्ते मारले गेले. असे असूनही सनातनलाच आरोपीच्या पिंजर्‍यात
उभे करून ‘दिगंबर’ सरकार, पोलीस आणि त्याहून अधिक उत्साहाने
चॅनेलवाल्यांनी झोडपण्यास सुरुवात केली. आय.बी.एन. लोकमतवर
नेहमी स्वत: संपादक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करणार्‍या निखील
वागळेची तर तेव्हा झोपच उडाली होती. ८-१० दिवस झाले, तरी
त्याच्या चॅनेलवर चघळायला दुसरा विषयच नव्हता. चर्चा, आरोप,
यांना भरती आली होती. ‘आता पृथ्वीच फुटते कि काय’, अशा
आविर्भावात वागळेची वटवट सुरू होती. मात्र खटल्याचा निकाल लागून
सगळे निर्दोष सुटल्यावर एकाही चॅनेलनी त्यावर चर्चा भरवली नाही.
आहो, चर्चा लांब राहिली. सनातनच्या निर्दोषत्वाची साधी बातमी
दाखविण्याची हिंमत या चॅनेलवाल्यांना झाली नाही.
    एरवी वृत्तपत्र स्वातंत्र्याची पाठराखण करणारे सगळे बोलघेवडे
३१ डिसेंबरला कुठल्या बिळात गेले होते ? एका हिंदुत्ववादी
कार्यकत्र्यांने म्हणे ‘सनातनच्या निर्दोषत्वाची बातमी का दाखवित नाही
?’, असे विचारायला आय.बी.एन्. लोकमतच्या कार्यालयात फोन केला
होता. तर समोरून असे उत्तर आले की, ‘आज थर्टीफस्र्ट असल्याने
वागळेसाहेब आलेले नाहीत आणि दोन दिवस ते (शुद्धीवर ?) येण्याची
शक्यता नसल्याने उद्याही येतील कि नाही सांगता येत नाही. तेव्हा
तुम्ही ३ जानेवारीनंतरच फोन करा.’

चॅनेलवाल्यांना पोलीस भगीनींची अब्रु कवडीमोल वाटते का ? मागे
११ ऑगस्टला आझादमैदानावर मुसलमानांनी दंगा केला. महिला
पोलीस भगीनींचे कपडे फाडून त्यांची विटंबना केली, ओबी व्हॅन
जाळल्या. पण हे सर्व घडत असतांना काही ठरावीक वाहिन्यांनीच
त्याच्या बातम्या दाखविल्या. हा वागळे मात्र नारायण राणेंच्या नावाने
आणि सिंचनाच्या नावाने चॅनेलवर बोंब मारत बसला होता. म्हणजे
पत्रकारितेच्या कथीत वैâवार्‍यांना पोलीस भगीनींच्या अब्रुची काहीच
किंमत वाटली नाही ? कि पोलीस भगीनींची अब्रु कवडीमोल असते,
असा यांचा समज आहे ?

काही तासांत तामीळनाडूत पोचू शकणार्‍या पत्रकारांना आठ दिवस
भीवंडी सापडली नाही ? :
भीवंडीत दोन पोलिसांना मुसलमान
दंगेखोरांनी दगडाने ठेचून मारले आणि मग पोलिसांच्याच गाडीत टाकून
गाडी पेटवून दिली. त्या दोन पोलिसांच्या शवविच्छेदनाचा अहवाल पहा.
तो अहवाल असे सांगतो की, त्या दोन पोलिसांच्या बोटांची नखे उपटून
काढण्यात आली, त्यांचे डोळे फोडण्यात आले, त्यांचे लिंग कापण्यात
आले होते, हात-पाय सांध्यांतून मोडण्यात आले होते.‘ धर्मांधांनी
पोलिसांना अशा पद्धतीने मारले. या एका अहवालावरच अनेक चर्चा
झडल्या असत्या; पण कोणाचीही हींमत झाली नाही. तेव्हाही
पत्रकारितेचे वैâवारी बिळात दडून बसले.
    कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना अटक झाली होती.
तेव्हा ‘ब्रेकींग न्यूज - जेलमे जगद्गुरु’ अशा नावाने चॅनेलवाल्यांचा
धींगाणा सुरू होता. मी स्वत: स्टार न्यूजच्या कार्यालयात फोन केला व
त्यांना विचारले की, शंकराचार्यांच्या बातम्या आपण अनेक दिवस झाले
दाखविता आहात; पण भीवंडीत झालेल्या प्रकाराबद्दल आपल्या चॅनेलवर
साधी तळटीपही का नाही ? त्यावर पलीकडून एक भगीनी म्हणाली
की, ‘आमचे रिपोर्टर अजून भीवंडीत पोचले नाहीत’. म्हणजे काही
तासांत यांचे रिपोर्टर कांची पीठाकडे पोहोचले; पण भीवंडी नावाची
गोष्ट त्यांच्या रिपोर्टरना सापडलीच नाही ?

याची नोंद घ्यावी :
समस्त चॅनेलवाले आणि पोलीस यांनी आतातरी
विचार करावा. राजकारण्यांचे ऐकून पोलिसांनी आम्हा हिंदूंवर खोटे
गुन्हे घातले तरी पोलिसांच्या माता-भगीनी या आमच्या माता-भगीनी
आहेत, हे आम्ही हिंदू कधीही विसरणार नाही. मात्र ज्या धर्मांधांना
खुष करायला तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे घालता, त्यांच्या दृष्टीने
तुमच्या माता-भगीनी या ‘युद्धात मिळालेली लूट किंवा हक्काची शेती’
आहेत हे विसरू नका.
    धर्मांधांना खूष करायला चॅनेलवाल्यांनी कितीही आटापीटा केला
तरी धर्मांधांच्या लेखी चॅनेलवाल्यांची किंमत काय आहे, हे ११
ऑगस्टला तुम्ही-आम्ही पाहिले आहे. इतके होऊनही हा लाळघोटेपणा
थांबणार नसेल, ११ ऑगस्ट आणि भीवंडी यांच्या पुनरावृत्त्या होतच
रहातील; मात्र कालांतराने हिंदू तुमच्या मदतीला ठाकणार नाहीत याची
नोंद घ्यावी.
                    विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.

No comments:

Post a Comment