Thursday, 23 January 2014

दाभोलकर हत्या आणि भारतीय गोबेल्सचा नाझीवाद

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महराष्ट्रातील माध्यमांत एक वादळ उठले.
कुठल्याही प्रसंगाचा माणसाच्या मनावर असणारा परिणाम काळ जाईल तसतसा कमी
होतो. समाजमनाचेही तसेच आहे. आपल्या देशात या गोष्टीची गती थोडी अधिकच
आहे. (२७ नोव्हेंबर २००८ रोजी सी.एस.टी. स्टेशनदाभोलकरांच्या हत्येनंतर ज्या
वादळाला सुरुवात झाली, ते वादळ आता वार्‍याच्या झुळुकीपेक्षाही अशक्त झाले आहे. हे
वादळ वेगात असतांना त्याचा फटका अनेक हिंदुत्ववाद्यांना बसला. त्यात सनातनच्या
साधकांची संख्या अधिक आहे.

    अर्थातच ‘प्रत्येक गोष्टीतून ईश्वर आपल्याला काहीतरी शिकवीत असतो’, या
विचारामुळे सनातनच्या साधकांना सकारात्मक रहाता आले. पण एकूण प्रसंगाचा अभ्यास
केल्यास लक्षात येते की, हिटलर मेला आणि त्याचा सहकारी गोबेल्सही मेला. पण
भारतात अजूनही गोबेल्स जीवंत आहेत. त्यांचा नाझीवाद फोफावण्यापूर्वीच तो ठेचायला
हवा.

१. दाभोलकरांची हत्या आणि खाकी गोबेल्स : राखी पौर्णिमेच्या दिवशी
२०.०८.२०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. ही हत्या सकाळी ७ च्या
सुमारास झाल्याचे समजते. ही हत्या पुण्यात झाली. त्यानंतर केवळ ३ तासांत पोलीस
चौकशीसाठी सातारा येथील सनातनचे साधक राहूल कोल्हापूरे यांच्या घरी पोहोचले.
    पुण्यात हत्या झाल्यावर तीन तासांत सातार्‍यात तपास सुरू होतो, ही गोष्टच
एकतर हास्यास्पद म्हणायला हवी किंवा मग सी.आय.ए., मोसाद, रॉ, आय.बी.,
एफ.बी.आय., या सगळ्यांनी आता अंतर्मुख होऊन स्वत:मध्ये सुधारणा करायला हवी,
आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांची मदत घ्यायला हवी.
    दाभोलकर नावाचा मनुष्य जर कधी मेलाच तर त्याला सनातनवालेच मारतील,
ही महाराष्ट्रातील खाकी गोबेल्सची निती आहे. त्यामुळे खुनी शोधतांना डोळ्यांना झापडे
लावून सनातनच्या मागे लागण्याचा प्रकार हा या खाकी गोबेल्सचा नाझीवादच आहे.

२. दाभोलकरांची हत्या आणि खादी गोबेल्स : दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे
प्रथम नागरिक असलेल्या व सर्वात महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर बसलेली
व्यक्ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री नामदार श्रीयुत. पृथ्वीराजरावजी उपाख्य ‘बाबा’जी
चव्हाणसाहेब (बिरुदावलीत काही लिहायचे राहिले असल्यास क्षमा असावी.) यांनी
पत्रकारांसमोर आपल्या पदाची व जबाबदारीची जाणीव (क्षमा असावी, काँग्रेसी माणसाला
जाणीव बिणीव नसते; पण लिहितांना तसे लिहावे लागते.) बाजूला सारून धडधडीत
विधान केले की, या हत्येमागे सनातनी प्रवृत्तींचाच हात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना
असा साक्षात्कार झाल्यावर आधीच झापडे लावलेल्या पोलिसांनी ती आणखी आवळून
घेतली.

३. दाभोलकरांची हत्या आणि ईलेक्ट्रॉनिक गोबेल्स : खरेतर गोबेल्सपेक्षा यांना
गवाणीतले कुत्रे म्हणणे योग्य ठरेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे बिरूद मिरविणार्‍या
या लोकांनी ठरवले, तर काहीही करू शकती, अशी क्षमता आहे. पण तीच क्षमता
वापरून हे ‘काय वाटेल ते’, करीत आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतर काही दिवस तर या
देशात टी.व्ही.वर दाखवण्यासारखे काही शिल्लकच नव्हते. चर्चा भरवायच्या, चर्चा
घडवायच्या आणि त्यात सनातनच्या प्रवक्त्यांना बोलावून एकटे पाडायचे, हा खेळ रोज
सुरू होता.
    स्वत:ला संपादक म्हणवणार्‍या, निखील वागळे सारख्या उडाणटप्पूने (त्याची म्हणे
आता नोकरी गेली आहे) तर म्हणे त्याच्या चॅनलवर एक घंटा टांगली होती आणि आज
दहावा दिवस, आज तेरावा दिवस, असे रोज तो वाजवीत होता. (एवढा गदारोळ करून
दाभोलकरांच्या दहाव्या-तेराव्याला काही हा गेला नसणार)
    सनातनच्या एका कार्यकत्र्याला गोव्यातून पोलिसांनी चौकशीसाठी पुण्याला नेले.
का ? तर म्हणे मारेकर्‍याच्या रेखाचित्राशी त्याचा फोटो जुळतो. मुळात गोव्यात
रहाणार्‍या साधकाचा फोटो आधीच पोलिसांकडे आला कसा आणि कुठून ? अशाच एका
खाकी गोबेल्सच्या बोलण्यातून समजले की, सनातनच्या जवळजवळ दोन हजार
साधकांचे फोटो पोलिसांनी जमवून एक अलबमच केलेला आहे. (भविष्यात किती
लोकांचा खून करून त्याचे खापर सनातनवर फोडले जाईल, देव जाणो)

४. जे.डे. हत्याकांडाचा तपास : एक पत्रकार होता, त्याचे नाव ज्योतीर्मय डे. त्याची
पवई भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ती हत्या झाल्यावर पत्रकारांवर तर
म्हणे आभाळ कि काय म्हणतात, ते कोसळ्यासारखे (त्यांनाच) वाटले. मग मोर्चा काय,
संप काय, निवेदने काय आणि काय काय, असो. याच ज्योतीर्मयाचे म्हणे अंडरवल्र्डशी
संबंध असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्यावर मोर्चे, संप, निवेदने, आणि आभाळ
सगळेच फाटले आणि त्या फाटलेल्या आभाळाच्या फटीतून पत्रकारितेचे सगळे वैâवारी
(सुसाट) पळाले.
    या जेडे हत्याकांडाचा तपास तर म्हणे आठ दिवसांत तडीस नेला गेला.
अत्याधुनिक यंत्रणा वापरून म्हणे रामेश्वरपर्यंत पळालेले आरोपी महाराष्ट्राच्या पोलिसांनी
धरून आणले होते. मोबाईल ट्रॅकींगचा वापर करून आणि अन्य तंत्रज्ञान वापरून
पोलिसांनी काही लाख भ्रमणध्वनी क्रमांकांमधून नेमके ५-६ क्रमांक शोधून काढले.
दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचे स्केच पोलिसांकडे आहे, त्यांच्या गाडीचा क्रमांक पोलिसांकडे
आहे. अत्याधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञान पोलिसांकडे आहे. तरीही दोन महिने होत आले,
तरी पोलीस मारेकर्‍यांना शोधू शकत नाही, हे शक्य आहे का ?

५. कारागृहात पोलीस : माझ्यावरील खटला सुरू असतांना मी मुंबई मध्यवर्ती
कारागृहात होतो. जवळजवळ मी तीन वर्षे तेथे होतो. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी माझी
व माझ्या सहआरोपींची चौकशी करण्यासाठी हे खाकी गोबेल्स मुंबई मध्यवर्ती
कारागृहातही गेल्याचे समजते.
    इतकेच काय, मी आणि माझे सहआरोपी श्री. गडकरी कोल्हापूर मध्यवर्ती
कारागृहात शिक्षा भोगत होतो. आम्ही ज्या बराकीत रहात होतो, त्या बराकीत सुद्धा
पोलीस जाऊन पाहून आले. (काय पाहिले कुणास ठाऊक) आम्ही ज्या बराकीत रहात
होतो, त्या बराकीतील १५-२० वैâद्यांना त्यांनी कारागृहाच्या कार्यालयात बोलावून
त्यांचीही चौकशी केली. चौकशी काय ? तर भावे आणि गडकरी काय खायचे, काय
बोलायचे, काय वाचायचे आणि काय सांगायचे. (एवढा तपास या खाकी गोबेल्सनी
लादेनचा केला असता, तर अमेरिकेच्या आधी भारताच्या हाती तो लागला असता.)

६. आश्रमात पोलीस : मी कारागृहातून आल्यावर ‘मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य
हात’, हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकातील एक पूर्ण प्रकरण दैनिक नवाकाळ ने
दिनांक ११ सप्टेंबर रोजी छापले होते. त्याच सायंकाळी स्वत:ला पोलीस म्हणवणारे
भामटे सनातन आश्रम, पनवेल येथे मला शोधत आले होते. पुणे पोलीस असल्याचे
त्यांनी सांगितल्याचे समजते.
    महत्त्वाची गोष्ट अशी की, अनेक ठिकाणी माझी चौकशी पोलिसांनी केल्याचे
समजते. पण दाभोलकरांच्या हत्येनंतर आजपर्यंत मला स्वत:ला एकाही पोलिसाने
फोनवरूनही एक साधका प्रश्नही विचारला नाही.

७. बायोडेटा कलेक्शन : दाभोलरांच्या हत्येनंतर सनातन आणि हिंदु जनजागृती
समितीच्या मिळून जवळजवळ २०० साधक आणि कार्यकत्र्यांची चौकशी अनेक वेळा
केली गेली. ही चौकशी करतांना साधकांच्या किंवा कार्यकत्र्यांच्या जबरदस्तीने स्वाक्षर्‍या
घेणे, ई-मेल पत्ते व त्यांचे पासवर्डही घेणे, संपर्वâ क्रमांक घेणे, त्यांचे जबरदस्तीने फोटो
काढून घेणे, हे प्रकार सर्रास सुरू होते. या सर्व साधक व कार्यकत्र्यांची चौकशी करतांना
त्यांना विचारण्यात येणारे प्रश्न म्हणजे नाव, वय, पत्ता, कुटुंबीयांची नावे, फोन नंबर,
ई-मेल पत्ता, पासवर्ड, फोटो.
    या सर्व गोष्टींचा आणि दाभोलकरांच्या हत्येचा संबंध काय ? तरीही याच गोष्टी
सगळ्यांना विचारण्यात आल्या आणि त्याच गोष्टी जमा करण्यात आल्या. म्हणजे
खरोखरच दाभोलकर हत्येचा तपास करायचा होता कि सनातनच्या साधकांचा व हिदु
जनजागृती समितीच्या कार्यकत्र्यांचा बायोडेटा पोलीस जमा करीत आहे ? आणि
कशासाठी ?
    जर खरेच तसे असेल, तर भविष्यात एखादी राजकीय किंवा अन्य स्वरूपाची
हत्या झाली किंवा बाँबस्फोट झाले, तर पुरावे तयार करण्यासाठी या गोष्टी वापरून
सनातनच्या साधकांना सहज अडकविले जाईल.
    खरच आताचे खादी आणि खाकी गोबेल्स दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीत
जन्मले असते, काय अनर्थ झाला असता.

८. लाल बावटेकरी : दाभोलकरांच्या हत्येनंतर म्हणे समस्त लाल बावटेकर्‍यांचे जीव
जायची पाळी आली होती. कोण्या एका मावशींना तर म्हणे महाराष्ट्रात रहाण्याची लाज
वाटू लागली. (मग थांबलात कशाला ?) वीदर्भात ७२ पोलिसांचे हत्याकांड नक्षलवाद्यांनी
केले. तेव्हा हे सगळे लाल बावटेकरी कुठे उलथले होते ? आणि एक दाभोलकर मेल्यावर
यांचा एवढा श्वास का कोंडावा ? दाभोलकर हत्येप्रकरणी नक्षलवादाचे कनेक्शन तपासले
का ?

९. प्रोफेशनल कीलर : दाभोलकरांची हत्या डोक्यात गोळ्या घालून झाली. आजच्या
गतीमान जगात शाळकरी पोरही सांगेल की, डोक्यात गोळ्या घालून मारणे, हे एक
‘प्रोफेशनल कीलर’च करू शकतो. कारण त्याला पुन्हा संधी मिळणार नसते. पोलिसांना
ही गोष्ट माहीत नाही कि ते या दृष्टीने विचारच करीत नाहीत कि त्यांना या दृष्टीने
विचार न करण्याच्या सूचना आहेत ? आठ दिवसांत जेडे हत्याकांडातील आरोपींना
धरणारे पोलीस दोन महिने झाले तरी दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना धरू शकत नाहीत कि
त्यांना न धरण्याविषयी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत ?

१०. उघड गुपित : स्पष्टच सांगायचे तर विश्वासातल्या माणसांजवळ होणार्‍या गप्पा -
चर्चांमधून दाभोलकरांच्या हत्येमागील गुपीत आता उघड झाले आहे. पोलिसांपासून
सामान्य माणसापर्यंत सर्वांच्या तोंडी ती गोष्ट चर्चीली जाते आहे. काहीतरी तथ्य
असल्याशिवाय ते होणार नाही. सामान्य माणसांच्या तोंडी असलेली गोष्ट पोलीस शोधू
शकत नसतील, तर त्यांच्यावर दया करायला हवी. पण हे गुपीत माहीत असूनही खादी
गोबेल्सच्या नादी लागून पोलीस हिंदुत्ववाद्यांना छळत असतील, तर हे खाकी गोबेल्सच
आहेत.

११. निधर्मी नाझीवाद : गोबेल्स निती ही जगातील चांगुलपणाला मारकच आहे.
जर्मनीतील गोबेल्स संपला. पण भारतात गोबेल्सची पिलावळ जीवंत आहे. तीची वळवळ
वाढू लागली आहे. वेळीच ही भारतीय गोबेल्सची पिलावळ ठेचायला हवी. अन्यथा निधर्मी
नाझीवाद या देशाचे वाटोळे करील.
                    विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद.

No comments:

Post a Comment