Monday, 24 March 2014

या वेळी तरी हिंदूंची निवड चुकू नये !


    काही दिवसांपूर्वी देशाचे अती म्हातारे पंतप्रधान मनमोहन सिंह (?) यांनी तोंड उघडले. बेरोजगारी, महागाई अशा समस्या सोडविण्यास आम्ही कमी पडलो, अशी प्रांजळ कबूली देण्याचे नाटक त्यांनी केले. त्याच वेळी मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर देश बरबाद होईल, अशी टीकाही त्यांनी मोंदींवर केली. मोदींवर टीका करतांनाच त्यांनी राहूल गांधींची देशाचा भावी पंतप्रधान म्हणून जाहीरातही करून घेतली.......

दूरगामी परिणाम, एक उदाहरण : एखादी गोष्टी घडल्यावर समोर दिसणारे प्रत्यक्ष दृश्य म्हणजे ती घटना असे मानणे चुकीचे आहे. त्या घटनेचे सर्वांगीण दूरगामी परिणामही विचारात घ्यावे लागतात. अल-वैâदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिच्या ‘ट्वीन टॉवर्स’वर आक्रमण करून ते पाडले. त्यात हजारो अमेरिकी नागरिकांचे बळी गेले. पडलेल्या इमारतीचा ढीगारा आणि धूळ व धूर. हे जरी प्रत्यक्ष दिसणारे दृश्य असले तरी त्याचे न दिसणारे परिणाम त्याहून भयंकर होते. या आक्रमणात मारल्या गेलेल्या लोकांची अनेक मुले (जी देशाची भावी पीढी आहे.) अनाथ झाली, अमेरिकेचे अनेक नागरिक सतत असुरक्षिततेच्या भावनेत आजही जगत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शेअर्सची किंमत घसरली, वाहतूक आणि प्रवासी विमान कंपन्यांना १ लक्ष ७० हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करावे लागले. एका प्रख्यात हॉटेल कंपनीच्या २० हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करावे लागले. हे त्या घटनेचे दूरगामी परिणाम आहेत.


इतिहासातील चुकांतून हिंदूंनी शहाणपण घ्यावे :
काही लोक ज्यांस महात्मा म्हणतात त्या मोहनदास गांधींवर पूर्वी हिंदूंनी विश्वास टाकला होता. ते आध्यात्मिक क्षेत्रात पुढारी असतील; पण एक देश चालविण्यासाठी जे गुण असायला हवेत, ते त्यांच्यापाशी नसल्याने त्यांच्या हातात देशाची सूत्रे देऊन फार मोठी चूक हिंदूंनी पूर्वीही केली व त्याचे दूरगामी परिणाम आजही हिंदूंना भोगावे लागत आहेत.
    आज मनमोहन सिंह हे पंतप्रधान आहेत. खरेतर मनमोहन (येथून पुढे मनमोहन असा उल्लेख केला आहे. ‘सिंह’ म्हणण्याची इच्छाच होत नाही.) हे अत्यंत विद्वान आहेत; पण ते त्यांच्याच क्षेत्रात विद्वान आहेत, हे ते स्वत:च विसरत आहेत. मनमोहन एक चांगले अर्थतज्ज्ञ आहेत यात वाद नाही; पण भारतासारख्या धार्मिक राष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वत:च ओळखायला हवे होते. जर ते स्वत:ला ओळखता आले नाही, तरी किमान कोणीतरी सुचविल्यावर तरी आत्मपरिक्षण करून पहायला हवे होते. मनमोहन यांचे चारित्र्य स्वत:पुरते स्वच्छ असले, (पण आता त्यांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दलही संशय येतो.) तरी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची बरबटलेली चारित्र्ये ते उघड्या डोळ्यांनी आजवर पहात होते व चालवूनही घेत होतेच ना ? मग ते कोणत्या तोंडाने मोदींवर टीका करू शकतात ? राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता मनमोहन यांच्यात नसतांनाही त्यांच्या हातात देशाची सूत्रे देऊन पुन्हा मोठी चूक हिंदूंनी केली आहे. त्याचे परिणाम आज हिंदू भोगीत आहेत.

काँग्रेसला अण्णा हजारे जवळचे कि अफजल गुरु ? : अण्णा हजारेंनी लोकपालसाठी उपोषण केल्यावर देश पेटला. तेव्हा अण्णांनी संसदेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये कारण संसद सर्वोच्च आहे, असा साक्षात्कार काँग्रेसला झाला.
    इतकी जर संसदेच्या अब्रुची काळजी होती, तर अफजल गुरुला इतकी वर्षे काँग्रेसने जावयासारखा का पोसला ? अण्णांनीतर जनहितासाठी संसदेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असेल; पण अफजलने तर संसद उडवून देण्याचा प्रयत्न चालविला होता. तरीही काँग्रेसला अण्णा हजारेंपेक्षा अफलज गुरु जवळचा वाटतो ? हा हिंदूंची निवड चुकल्याचा परिणामच नव्हे काय ?

१ लक्ष ७६ सहस्त्र कोटी रुपये ? : स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा काँग्रेसने केला. १ लक्ष ७६ सहस्त्र कोटी रुपये ही रक्कम मनमोहनना तरी एकटाकी लिहिता येईल का ? इतका पैसा काँग्रेसने खाल्ल्यामुळे देश गरीब झाला आहे. काँग्रेसच्या राज्यात भारताचे ‘विकसनशील देश’, हे बीरुढ काढी ढळले नाही. हा हिंदूंची निवड
चुकल्याचा परिणाम नव्हे का ?

काँग्रेसची प्रतिज्ञा, राम झालाच नाही : ज्या प्रभु श्रीरामांचे राज्य या देशावर होते, ज्यांच्या भावाच्या नावानेच या देशाचे नाव भारत पडले, त्या श्रीरामांचेच अस्तित्व काँग्रेसने नाकारले. रामसेतू पाडतांना सर्वोच्च
न्यायालयात याच काँग्रेसने प्रतिज्ञेवर सांगितले की, ‘राम झालाच नाही, तो सेतू नैसर्गिक आहे.’ हिंदूंच्या श्रद्धांची याहून मोठी विटंबान कोणती असेल ? तीही कँग्रेसने केली. हाही हिंदूंची निवड चुकल्याचा परिणाम नाही का ?

धरणात मुतायची भाषा ? : आज देशातील अनेक भागांत बारा महिने दुष्काळ आहे. शेती लांब राहिली. इथे प्यायला पाणी नाही म्हणून जनावरे तडफडून मरत आहे. माय-भगीनींना हंडाभर पाण्यासाठी तासन्तास टँकरची वाट पहावी लागते आहे. दोन-दोन कोस उन्हातान्हात माय-भगीनी पाण्यासाठी पायपीट करतांना पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतात. अशा परिस्थितीतही धरणात मुतायची भाषा करणारे नेते निवडून देतांना हिंदूंची निवड चुकली नाही का ?

काँग्रेस म्हणजे आपले ठेवायचे झाकून ......


आता शीलाबाईने सातशे रुपयांत संसार करावा :     राहिली गोष्ट मोदींवरील टीकेची. तर सातशे रुपयांत एक कुटुंब चालते की, असे विधान याच मनमोहनांच्या पक्षातील शीला दिक्षीत नावाच्या एका म्हातार्‍या मुख्यमंत्री बाईने केले होते. शीलाबार्इंचा पगार सोडाच हो त्यांच्या सरकारी गाडीच्या चालकाचा पगारही पाच आकडी असेल. मग कोणत्या आधारावर शीलाबाईने असे विधान केले ? सातशे रुपयांत एक कुटुंब चालते, असे म्हणून या शीलाबाईने गरीबांच्या जखमेवर मीठ चोळले. (अर्थात, त्याची फळे ती भोगते आहे. सध्या ती बेरोजगार आहे, असे कळले. तेव्हा सातशे रुपयांत घर चालविण्याचा प्रयोग करण्याचा संधी शीलाबाईस चालून आली आहे.) तेव्हा मनमोहनांना हे विधान खटकले नाही का ? अशी बालीश विधाने करू नका अशी तंबी त्यांनी शीलाबाईस दिली का ?

गरीब मनाची अवस्था म्हणजे राहूल गांधी :     गरिबी ही मनाची अवस्था आहे, असे बालीश विधान राहूल गांधी यांनी केले होते. (ही परंपरा मोहनदासांपासून आहे.) जर गरीबी ही मनाची अवस्था आहे, तर मग तुम्हाला सत्ता हवी कशाला ? सत्तेतून बाजूला झाल्यावर तुम्ही काही गरीब वगैरे होणार आहात का ? आणि झालात तरी ती मनाची अवस्था असल्याने त्याने काय बिघडणार आहे, असा जाब मनमोहन यांनी राहूल गांधीना विचारला का ?
    गरीबी ही मनाची अवस्था आहे कि गरीब मनाची अवस्था म्हणजे राहूल गांधी याचा आधी मनमोहन यांनी शोध घ्यावा.

काय म्हणावे या लादेनच्या वंशजांना ? :     मुस्लीमांच्या मतांसाठी एखादा काँग्रेसी नीचतेच्या किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे दिग्वीजय सिंग. ज्याने क्रुरकम्र्या लादेनचा ‘लादेनजी’ असा उल्लेख केला आणि अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. त्या दिग्वीजयला समोर बोलावून ‘थोबाडाला आवर घाल’, अशी तंबी देण्याचे धाडस मनमोहन यांनी का दाखविले नाही ? मग कोणत्या तोंडाने मोदींवर टीका करता ? खरच, काय म्हणावे या लादेनच्या वंशजांना ?

या वेळी हिंदूंनी धर्माचे राजकारण करायलाच हवे : आपल्याकडे वस्तुस्थितीविषयी असणारे अज्ञान, सहिष्णुतेच्या नावाखाली बोकाळलेली नपुंसकता आणि अपार संकुचीतपणा यांच्या मिश्रणाने एक वेगळेच रसायन सिद्ध झाले आहे. त्याचे परिणाम आपल्याला सहज दिसतात.
    मुस्लीम धर्मगुरु आपला प्रभाव थेट राजकाणावर पाडतात; हिंदूंचे धर्मगुरु मात्र राजकाणापासून चार हात लांब असतात. मुसलमांनांचा राजकारणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन ‘अस्तीत्वाची लढाई’ असल्याप्रमाणे आहे; पण हिंदूंचा राजकारणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन ‘तेल लगाने गया, आपनेको क्या करना है’, असा आहे. मुसलमान राजकारणावर प्रभाव टाकून धर्मप्रसार करू पहात आहेत; पण हिंदू मात्र स्वधर्माची होत असलेली हानीr रोखायलाही तयार नाहीत. मुसलमान राजकारणाकडे पहातांना ‘धर्मप्रसारासाठीची राजकीय चळवळ’ या
दृष्टीने पहातात, हिंदू मात्र धर्म व राजकारण यांचा संबंधच जोडायला तयार नाहीत. त्यामुळे सध्या देशात मुक्या-बहिर्‍यांनी गप्पा माराव्यात असा विनोद सुरू आहे. हिंदू म्हणतात, ‘सर्व धर्मांची शिकवण एकच असल्यामुळे अहिंसा परमो धर्म.’ राजकारणी म्हणतात की, ‘दहशतवादाला धर्मच नसतो’ आणि दहशतवादी म्हणतात की, ‘संपूर्ण जग इस्लाममय होईपर्यंत जिहाद सुरूच राहील.’
    ही वृत्ती हिंदूंना विनाशाकडे नेत आहे. धर्म आणि राजकारण यांचा संबंध आहेच. या वेळी हिंदूंनी धर्माचे राजकारण करायलाच हवे.

येत्या निवडणुकीत हिंदूंनी काँग्रेसचा ‘पंजा’ छाटून टाकावा :     इत्िाहासातून शहाणपण घेऊन हिंदूनी शहाणे व्हायला हवे. काँग्रेसाचा हात हा देणारा हात नाही, तर आपले असलेले ओरबाडून घेणारा हात आहे, हे आता तरी हिंदूंनी ओळखावे. अहिंसेच्या थापा, कल्पना हिंदूंनी खुशाल त्यागाव्यात. शत्रुने तड पाडावी आणि आम्ही जोडावी, असली तडजोड येथून पुढे हिंदूंनी खपवून घेऊ नये. दुर्जनाची हिंसा ही अहिंसाच आहे, हे साक्षात श्रीकृष्णाचे वचन आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हिंदूंनी सनदशीर हिंसा करावीच. हिंदूराष्ट्र स्थापनेच्या
आड येणारा हा काँग्रेसचा ‘पंजा’ हिंदूंनी येत्या निवडणुकीत मतपेटीच्या
माध्यमातून छाटून टाकावा. जय हिंदूराष्ट्र !

No comments:

Post a Comment