Tuesday, 28 January 2014

                             ‘मी मरेन; पण तुला विधवा करेन’, अशा वृत्तीची एन्.आय.ए.

एन्.आय्.ए. म्हणजे ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा‘. देशभरातील अनेक गाजलेल्या (म्हणजे काँग्रेसने गाजवलेल्या) प्रकरणांच्या तपासाचे काम या यंत्रणेकडे देण्यात आले होते. त्यात मालेगाव स्फोट २००६ व २००८, मडगाव स्फोट अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. हे तपास करतांना एन.आय.ए.ने केलेली काळी कृत्ये आणि त्यावरून एन.आय.ए.ची लायकी काय आहे, हेही हिंदूंना कळावे यासाठी....

मी मरेन; पण तुला विधवा करेन’, या वृत्तीची एन.आय.ए. : नुकतेच एन्.आय्.ए.ने साध्वी प्रज्ञासिंग यांना सुनील जोशी यांच्या खुनाच्या आरोपातून मुक्त केले. सुनील जोशी यांच्या खुनाच्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग या मध्यप्रदेशात होत्या. कारागृहातील वैâद्यांना एक माणूस म्हणून ज्या सुविधा असायला हव्यात किंवा जे मानवाधिकार असायला हवेत, ते मध्यप्रदेशातील कारागृहातील वैâद्यांना मिळतात. साध्वी प्रज्ञासिंग यांना देखील त्या सुविधा तेथे मिळत होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील कारागृहाच्या तुलनेत साध्वी प्रज्ञासिंग या मध्यप्रदेशातील कारागृहात थोड्यातरी सुखात होत्या असे म्हणायला वाव आहे.

 पण हिंदूंना सूख मिळू न देणे हाच धर्म असलेल्या काँग्रेसशासनाचे पाळीव श्वान असलेल्या एन्.आय्.ए.ला देखील साध्वींचे सूखपहावले नाही. साध्वींना थोडेसे जरी सूख कुठे मिळाले, असे कळले तरी समस्त काँग्रेसी आणि त्यांच्या श्वान पथकांच्या अंगाची लाही लाही झाली असेल.
    त्यामुळे साध्वींना दु:ख देण्यासाठी या एन्.आय्.ए.ने त्यांच्यावरील सुनील जोशी यांच्या हत्येचा आरोप मागे घेऊन त्यांनात्यातून आरोपमुक्त केले. म्हणजे आता साध्वींवर मध्यप्रदेशात कोणताच खटला नसल्याने त्यांना पुन्हा महाराष्ट्रातील कारागृहात यावे लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. महाराष्ट्रातील कारागृहे ही हिंदूंच्या छळासाठी निर्माण केलल्या छळछावण्याच आहेत. त्यामुळे साध्वींना जीव जाईपर्यंत इथे छळता येईल, असा स्पष्ट विचार यामागे आहे.
    खरेतर एखाद्या पोलीस यंत्रणेने स्वत:च एखाद्या अरोपीला पकडून त्याच्यावर लावलेले आरोप त्यांना पुन्हा मागे घ्यावे लागणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असते. (अर्थात काँग्रेसच्या दृष्टीने मुसलमानांच्या मतांपुढे लाज-बीज या गोष्टींचे मूल्य शून्य आहे.) पण ती अपमानास्पद बाब पत्करूनही एन्.आय्.ए.ने साध्वींवरील आरोप मागे घेतले. एन्.आय्.ए.ची ही वृत्ती म्हणजे ‘मी मरेन; पण तुला विधवा करेन’, अशीच आहे.

सुधाकर चतुर्वेदीे हिंदू असल्याने त्यांच्या निर्दोषत्वाच्या पुराव्यांकडे पहायलाही एन्.आय्.ए. तयार नाही : २००६ साली मालेगावात झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने काही मुस्लीम तरुणांना अटक केली होती. काही काळगेल्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एन्.आय्.ए.ने त्याच
प्रकरणाचा तपास पुन्हा नव्याने केला. दहशतवाद विरोधी पथकाने पकडलेल्या त्या मुस्लीम तरुणांना एन्.आय्.ए.ने निर्दोष ठरविले. त्यातील काही जण तर स्फोटाच्या वेळी त्या ठिकाणापासून शेकडो किलोमीटर लांब असल्याचे पुरावेही सादर केले.
    २००८ साली मालेगावात झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणात ज्या हिंदू आरोपींना अटक करण्यात आली, त्यातील एक सुधाकर चतुर्वेदी हे देखील स्फोटाच्या वेळी त्या ठिकाणापासून जवळजवळ दीड हजार किलोमीटर लांब त्यांच्या गावी होते. या गोष्टीचे पुरावे आजही उपलब्ध आहेत; पण एन्.आय्.ए. त्या पुराव्यांकडे पहायलाच तयार नाही.

हिंदू कार्यकत्र्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल; म्हणून एन्.आय्.ए. २००८ मालेगाव स्फोटाचा तपास करीत नाही : २००६ साली मालेगावात झालेल्या स्फोटाच्या प्रकरणाचा एन्.आय्.ए.ने नव्याने तपास केला; पण २००८ सालच्या मालेगाव स्फोटाच्या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्यानेकरण्यास एन्.आय्.ए.ला रस नाही. ‘जुन्या प्रकरणांचा तपास आम्ही करीत नाही’, असे कारण त्यासाठी एन्.आय्.ए.ने दिले आहे. खरेतर २००६ चे मालेगाव स्फोट प्रकरण जुने आहे. पण २००८ प्रकरणात हिंदू कार्यकर्ते अटकेत असल्याने त्या प्रकरणाचा तपास नव्याने केला तर हिंदूं कार्यकर्तेही निर्दोष असल्याचे निष्पन्न होऊन त्यांनाही सोडून द्यावे लागेल. म्हणूनच २००८ चे स्फोट प्रकरण नवे असूनही त्याचा तपास एन्.आय्.ए. करीत नाही. 

हिंदूंना कारागृहातून मुक्त करावे लागेल; म्हणून एन्.आय्.ए. २००८ च्या स्फोट प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करीत नाही : मालेगाव स्फोट प्रकरणात जे चार आरोपी अगदी उशीरा पकडले गेले, त्यांच्या विरोधात मालेगाव २००६ प्रकरणात पुरवणी आपरोपपत्र एन्.आय्.ए.ने दाखल केले. ज्यामुळे २००६ प्रकरणात अटकेत
असलेल्या मुसलमान आरोपींचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. त्यांनाही जामिनावर सोडूनही देण्यात आले. २००८ च्या स्फोट प्रकरणात मात्र एन्.आय्.ए. या चार आरोपींच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखलच करीत नाही. कारण ते दाखल केले तर त्या प्रकरणात आधी अटक केलेल्या साध्वी, कर्नल पुरोहीत इत्यादिंच्या सुटकेचाही मार्ग मोकळा होईल. तो होऊ नये म्हणून त्या पुरवणी आरोपपत्रास जाणीवपूर्वक विलंब करीत आहे.

एन्.आय्.ए.च्या संकेतस्थळावर हिंदू कार्यकत्र्यांची छायाचित्रे फरार आरोपी म्हणून आहेत; पण त्यात दाऊदचे छायाचित्रच नाही : येत्या लोकसभा निवडणुकीत कुठलाच धंदा चालणार नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आल्याने आता दाऊदला पुन्हा भारतात आणण्याची टूम काँग्रेसने काढली आहे. इतकी वर्षे देशाबाहेर राहून, इस्लामी राष्ट्रांचा पैसा घेऊन मुंबईचे स्मशान करणार्‍या दाऊदला भारतात आणण्याची थाप आता काँग्रेस मारीत आहे. पण जागतीक दहशतवादी असरणार्‍या या दाऊदचे एक साधे छायाचित्रही एन्.आय्.ए.च्या अधिकृत संकेतस्थळावर नाही. मात्र रुद्र पाटील, रामजी कलसंग्रा, संदीप डांगे यांची छायाचित्रे एन्.आय्.ए.च्या संकेतस्थळावर आहेत.
    रुद्र पाटील, रामजी कलसंग्रा, संदीप डांगे ही लोकं एन्.आय्.ए.ला फार मोठे दहशतवादी वाटतात; पण दाऊदचा फोटो संकेतस्थळावर घालायचे एन्.आय्.ए.चे धाडस होत नाही. तसे केल्यास मुसलमान दुखावतील या एकाच हेतूने एन्.आय्.ए.च्या संकेतस्थळावर दाऊद, टुंडा, भटकळ यांची छायाचित्रे ठेवण्यास काँग्रेसनेच एन्.आय्.ए.ला मनाई केली आहे.

‘भगवा दहशतवाद’, हा काँग्रेसचा धंदा बंद पडण्याच्या भीतीने एन्.आय्.ए.ने भटकळ व टुंडाची कस्टडी घेतली नाही : विविध ठिकाणच्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात या एन्.आय्.ए.ने हिंदुत्ववादी कार्यकत्र्यांची ‘कस्टडी’ घेऊन त्यांच्या चौकशा केल्या; पण यासिन भटकळ किंवा टुंडा यांची ‘कस्टडी’ मात्र एन्.आय्.ए.ने घेतली नाही.
कारण त्यांची कस्टडी घेतली आणि त्यांची चौकशी केली तर भारतातील सगळ्याच बाँबस्फोटांची उकल होईल आणि अटकेतील सर्वच हिंदुत्ववाद्यांना सोडून द्यावे लागेल. त्याहीपेक्षा मोठी भिती एन्.आय्.ए.ला म्हणजे काँग्रेसला आहे ती ही की, असे झाले तर ‘भगवा दहशतवाद’ नावाचा काँग्रेसचा धंदाच बंद पडेल.

फरार आरोपींना शोधण्याच्या नावाखाली पैसे खाणारी एन्.आय्.ए. : राष्ट्रीय तपास यंत्रणा माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे खरे-खोटे माहीत नाही. पण रामजी कलसंग्रा, संदीप डांगे, रुद्र पाटील या सर्वांना शोधण्यासाठी एन्.आय्.ए.ने आतापर्यंत ५ कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात मात्र एन्.आय्.ए.मधील एका पोलिसाकडून हळूच कळलेली माहिती अशी की, या शोधाशोधीच्या कामाला एन्.आय्.ए.ने जेमतेम १० लाख रुपयेच खर्च केलेले आहेत. मात्र दाखवतांना मोठे आकडे दाखवून बाकी रक्कम
अधिकार्‍यांच्या खिशात गेली आहे.

हिंदूंनो, मतपेटीच्या माध्यमातून काँग्रेस आणि त्यांच्या टोळ्यांचे एन्काऊन्टर करा : आतापर्यंत समोर आलेल्या या गोष्टींवरून एन्.आय्.ए. ही तपास यंत्रणा काय लायकीची आहे, हे आपल्या लक्षात आले असेल. सी.बी.आय्. सारखी यंत्रणाही शासनाचा पोपट असल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या विश्वासार्हतेवर तर एन्.आय्.ए.नेच प्रश्न निर्माण केला आहे. हिंदूच्या छळासाठी काँग्रेसने स्थापन केलेल्या या अधिकृत टोळ्याच (गँग) आहेत. या टोळ्यांपासून वाचण्यासाठी येत्या निवडणुकीत हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून काँग्रेस आणि त्यांच्या या टोळ्यांचे एन्काऊन्टर करावे, हाच उपाय आहे.
                                                                                        - विक्रम विनय भावे, हिंदू विधाज्ञ परिषद, मुंबई.

No comments:

Post a Comment