Thursday, 6 February 2014

 सगळ्यांनी कर्तव्य ‘पार पाडल्यासारखे’ करा !

    नुकतेच एक वृत्त प्रस्द्धि झाले आहे. कुख्यात डॉन अबू सालेम याला लखनऊ येथील न्यायालयात खटल्यासाठी नेले जात असतांनात्याने रेल्वेत निकाह केला. पोलीस बंदोबस्तात त्याला लखनऊ येथे नेले
जात होते. तेव्हा आजूबाजूला पोलीस पहारा असतांनाही अबू सालेमनेधावत्या गाडीत निकाह केला. हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापल्यावर टाडा न्यायालयाची झोप उडाल्यासारखी झाली. मग टाडा न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यासारखे करून त्याची चौकशी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यासारखे केले. आता पोलीस चौकशी केल्यासारखे करतील. मग अहवाल सादर

करण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदत मागितल्यासारखे करतील. मग न्यायालय त्यांना मुदत वाढवून दिल्यासारखे करेल. मग पोलीस अहवाल सादर केल्यासारखे करतील. मग न्यायालय ताशेरे मारल्यासारखे करेल. मग वरिष्ठ पोलीस अधिकारी अबू सालेमच्या बंदोबस्तावरील पोलिसांना तंबी दिल्यासारखे करतील. फार फार तर त्यांना निलंबीत केल्यासारखे करतील. मग थोडे दिवसांनी कॉमरेड आर.आर. आबा विचार केल्यासारखे करतील. मग आबा अंतर्गत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यासारखे करतील. मग आबा त्या निलंबीत पोलिसांवर दया केल्यासारखे करतील. मग ते निलंबीत पोलीस पुन्हा कामावर हजर होतील.
    मग न्यायालय, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी हा सगळा प्रकार विसरून गेल्यासारखे करतील. जसे काही झालेच नव्हते. या सगळ्या विसराविसरीत अबू सालेम पुढील तारखेला लखनऊला जातांना रेल्वेत दुसरा निकाह करायला तयार असेल. 
 हेच धंदे करत रहायचे, तर मग चौकशीची नाटकं करता कशाला ? मागे अरुण खानविलकर नावाच्या एका पोलिसाला लाच घेतांनारंगेहात पकडले. त्याला जामीन मिळाल्यावर पुन्हा नोकरीवर घेतलेच ना ? (फक्त न वापरल्या जाणार्‍या) शस्त्रांची राखण करायला त्याला ठेवला. तो कॉमरेड आबांचा जवळचा होता म्हणून का ? कि त्याने साध्वी प्रज्ञासिंग यांना अधिकाधिक छळले म्हणून त्याला पुन्हा नोकरीत
घेतला ?
    मागे चेंबूर जीमखान्यावर गुंडांसोबत नाचकाम करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांनाही निलंबीत केल्यासारखे करून थोडे दिवसांनी त्यांना पुन्हा कामावर घेतले होते. का ? ते पोलीस कॉमरेड आबांचे जवळचे म्हणून ?
    आझाद मैदानात मुसलमानांनी केलेल्या दंग्यात ५० हजारांपैकी फक्त ५७ जणांना अट केली. त्यात भडकाऊ भाषणे करणार्‍यांत समशेर खान पठान हा पोलीस होता. त्याच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. का ? तो आबांचा जवळचा होता म्हणून ?
    कॉमरेड आबांच्या या वागण्याचे हिंदूंना काही नवल वाटणार नाही. पण साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर एका मुसलमान महिलेने आक्रमण केले, त्याची दखल न्यायालयाला घ्यावीशी वाटली नाही ? शंकराचार्य यांनी न्यायालयात सांगितले की, माझ्या तोंडात मांस कोबण्यात आले. त्या गोष्टीची दखल न्यायालयाला घ्यावीशी वाटली नाही ? सुधाकर चतुर्वेदींची याचिका न्यायालयाला विचारात घ्याविशी वाटली नाही ? सुधाकर चतुर्वेदींना अटक करून न्यायालयात हजर करण्यापूर्वीच त्यांची चाचणी केली गेली, या गोष्टीची न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटली नाही. या सगळ्या गोष्टी न्यायसंस्थेवरील लोकांचा विश्वास कमी करतील.
- विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद

No comments:

Post a Comment