Thursday, 23 January 2014

आय.एन.एस. विक्रांत - सत्तातुराणाम् न भयं न लज्जा !

    राज्य सरकारने पुरेसे पैसे न दिल्याने आय.एन.एस. विक्रांत ही
युद्धनौका लिलावात काढण्याविषयीची चर्चा झाली व होतही आहे.
आय.एन.एस. विक्रांत ही युद्धनौका म्हणजे भारतीय नौदलाचा चेहराच
आहे, असे म्हटले जाते. या युद्धनौकेचे रूपांत युद्धसंग्रहालयात
करावयाचे होते. पण त्यासाठी पुरेसा निधी राज्य सरकारने न
दिल्यामुळे ती लीलावात काढयाची चर्चा सुरू झाली.


    ऐन उमेदीच्या काळात ‘विक्रांत’ने ज्या मोहिमा केल्या, त्या
मोहिमांमध्ये ‘विक्रांत’वर स्वार झालेल्या नौदलातील अधिकार्‍यांपैकी
एकाने त्याचे दु:ख वृत्तवाहिनीकडे सांगून मन मोकळे केले. तो
अधिकारी म्हणाला की, ‘ज्या देशात १ लक्ष ७६ हजार कोटी रुपयांचा
(म्हणजे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा) भ्रष्टाचार होऊ शकतो, तेथे
‘विक्रांत’साठी ५०० कोटी रुपये सुद्धा सरकार देऊ शकत नाही का ?’
    त्या अधिकार्‍याची ही प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.
‘विक्रांत’ची कालममर्यादा संपून ती आता नौदलात सेवा बजावू शकत
नसली, तरी ती एक माजी सैनिक आहे. ‘आमच्यासह राष्ट्ररक्षणाच्या
कार्यात ‘विक्रांत’चे मोठे योगदान आहे’, या विचारामुळे नौदलातील
अनेक राष्ट्रभक्त सैनिकांची भावना अजूनही ‘विक्रांत’शी जोडलेली
आहे. त्यांच्या भावनांचा लीलाव सरकार करू पहात आहे.
    पण एक गोष्ट हे सैनिक विसरत आहेत की, सैनिकांच्या
त्यागाची, देशभक्तीची, राष्ट्रभावनेची किंमत राज्यकत्र्यांच्या लेखी
कवडीमोलही नाही. राष्ट्ररक्षणार्थ प्राणत्याग केलेल्या जवानांच्या
विधवांना मिळणारी घरे राज्यकत्र्यांनीच खावीत, यापेक्षा अधिक
चोरटेपणा कुठला. सत्ता आणि पैसा यांव्यतिरिक्त कुठेही नीष्ठा
नसलेल्या राज्यकत्र्यांकडून सैनिकांनी अशा अपेक्षा ठेवणे योग्य आहे
का ?
    एक गोष्ट सांगतो. रशियाच्या सरक्षण योजनेभोवती असणार्‍या
अभेद्य पोलादी पडद्यामुळे त्यांच्या संरक्षण विभागात होणार्‍या नवनवीन
प्रगती आणि संशोधन यांकडे सगळ्या जगाचे लक्ष लागलेले असते.
अशी काही कुणकुण कानी आलीच, तर त्या देशाचे काही तंत्रज्ञान
मिळविण्यासाठी अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणा कामाला लागतात.
रशियाने बनविलेल्या अशाच एका अद्ययावत पाणबुडीचे तंत्रज्ञान
अमेरिकेच्या सि.आय्.ए.ला मिळवायचे होते; पण त्यांना काही ते शक्य
झाले नाही. योगायोगाने रशियन पाणबुडीतील बॅटरीज् चार्ज होत
असतांना सूक्ष्म प्रमाणात हायड्रोजन वायु बाहेर पडत राहिला व
पाणबुडीत तो साठत राहिला. एका क्षणी पाणबुडीतील वीजेचा दिवा
लावण्यासाठी एक जवान गेला व त्याने दिवा सुरू करताच कुठेतरी
ठिणगी पडून त्या हायड्रोजन वायुचा स्फोट झाला. त्या स्फोटात सर्व
जवान मृत्यु पावले आणि रशियन पाणबुडी सागरतळाला गेली.
अमेरिकेच्या गुप्तचरांना ही माहिती मिळताच त्यांनी ती पाणबुडी
मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
    त्यासाठी त्यांनी प्रथम त्या पाणबुडीचे स्थान शोधून काढले. मग
त्या पाणबुडीच्या आकाराचा आणि वजनाचा अंदाज घेतला. नंतर
पाण्याच्या पृष्ठभागापासून ते सागरतळापर्यंत असणारे जवळजवळ
१५०० मिटर (दीड किलोमिटर) अंतर जोडण्यासाठी एकापुढे एक
जोडता येणारे पाईपवजा दोर निर्माण केले. काही हजार टन वजन
असणार्‍या या पाणबुडीला सागरतळातून उचलून वर ओढणे व ओढत
अमेरिकेच्या किनार्‍याला नेणे, यासाठी अमेरिकेकडे काहीच व्यवस्था
नव्हती. मग अमेरिकेतील एका प्रसिद्ध उद्योगपतीला त्यासाठी गुंतवणूक
करण्यास सिद्ध केले गेले. त्या उद्योगपतीचा पैसा आणि अमेरिकन
नेव्हीतील तंत्रज्ञ यांच्या संयोगाने एक नवीन पण छोटेखानी जहाज
निर्माण करण्यात आले. ज्याची रचना खास ती हजारो टनांची पाणबुडी
उचलण्यासाठी व ओढण्यासाठी केली गेली होती. ठरल्याप्रमाणे सर्व
काही झाल्यावर रशियन पाणबुडी ओढून वर खेचण्याचा प्रयत्न सुरू
झाला. अती जडपणामुळे अध्र्यात आलेली रशियन पाणबुडी मध्येच
वाकून तुटली व अर्धा भाग पुन्हा सागरतळाला गेला. पण अमेरिकन
सैनिकांनी हरतर्‍हेने प्रयत्न करून ती मिळवली व त्याचा अभ्यास करून
आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या गोष्टी ते त्यातून
शिकले.
    या सर्व घटनाक्रमात अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे माहीत
आहे ? रशियन पाणबुडी सागरतळाला गेली हे कळल्यापासून ती ओढून
अमेरिकेच्या किनार्‍याला आणणे, या प्रकल्पाला साडेचार ते पाच वर्षे
लागली. त्यापैकी खास छोटेखानी जहाज बांधणीलाच दोन-अडीच वर्षे
गेली.
    एक पाणबुडी मिळवून तीचा अभ्यास करणे, का ? तर जगातील
सर्वात अद्ययावत जे काही असेल ते माझ्या देशाच्या संरक्षणासाठी
असलेल्या शस्त्रसंभारात असायला हवे, ही भूक.
    एक पाणबुडी मिळवण्यासाठी केला जाणारा हा खटाटोप कुठे
आणि भारतीय नौदलाची मान ताठ कराणारी ‘विक्रांत’ लिलावात
काढण्याची भाषा कुठे.
    हाच धागा पकडून एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छीतो की,
इस्रायलची घटना, कायदे, संसद, सेना, इतकेच काय अगदी
सामान्यातील सामान्य नागरिकही देशभक्तीने फूरफूरत असतो. याचे
कारण हेच की, जगभरात जिहाद ही ‘अंधश्रद्धा’ फोफावण्यास
कारणीभूत झालेली अरब राष्ट्रे इस्रायलच्या अवतीभवती आहेत. जगात
अनेक देश अण्वस्त्रसज्ज आहेत, अशा परिस्थितीत जगभरातील
ज्यूंसाठी हक्काची भूमी असलेले इस्रायल राष्ट्र जर आता नष्ट झाले,
तर त्यांना पुन्हा कधीच स्वतंत्र ज्यु राष्ट्र निर्माण करता येणार नाही.
या गोष्टीची जाणीव इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाला आहेच.
    हिंदूंनाही भारताशिवाय या जगात स्वत:ची भूमी शिल्लक
राहिलेली नाही. आहे ती भूमीही ‘विक्रांत’चा लिलाव करायला
निघालेल्या सत्तेतील व्यापार्‍यांची वखार होत चालली आहे. बहुसंख्य
असणारा हिंदू अल्पसंख्य होण्याच्या दिशेने चालला आहे. अशा वेळी
इस्त्रायली नागरिकांकडून हिंदू काहीही न शिकले तर आज ‘विक्रांत’चा
लिलाव करणारे उद्या ‘दुख्तरान-ए-हिंदुस्तान, मिल्लत-ए-दो दिनार’ असे
घोषीत करतील.
    (पानीपतच्या युद्धानंतर ज्या हिंदू माता-भगीनी अहमदशहा
अब्दालीने लुटून नेल्या, त्या तेथे दोन दिनारला (तेथील दोन रुपये)
विकल्या जात होत्या. तेव्हा तो म्हणाला होता. ‘हिंदुस्थानातील स्त्रीया
आमच्याकडे दोन दिनारला मिळतात.’)
                - विक्रम विनय भावे, हिदू विधीज्ञ परिषद.

No comments:

Post a Comment