Tuesday, 6 December 2016

ख्रिस्ती मिशनर्‍यांवर होणारी आक्रमणे, हिंदुत्वनिष्ठांवर येणारा दोष आणि त्या संदर्भातील उपाययोजना !

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
     काही मासांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्‍यांवर होणार्‍या आक्रमणांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी ओरड माध्यमांतून होत होती. मिशनर्‍यांवर आक्रमणे झाली किंवा तत्सम प्रकार घडले की, त्याचा दोष हिंदुत्वनिष्ठांना दिला जातो. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी काही धोरण अवलंबणे आवश्यक वाटते. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.
१. मिशनर्‍यांवरील आक्रमणाचा हिंदुत्वनिष्ठांवर
येणारा दोष, त्याची कारणे आणि परिणाम !
१ अ. माध्यमांचा दुटप्पीपणा : भाजप सत्तेत आल्यामुळे मिशनर्‍यांवरील आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे, अशी ओरड माध्यमांतून चालू असते. हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणाचे मात्र साधे वृत्तदेखील दाखवले जात नाही. त्याच माध्यमांना मिशनर्‍यांचा फार पुळका असतो. त्याची कारणे किती अर्थपूर्ण असतात, हे सर्वच जण जाणतात. त्याचे उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांना संत घोषित करण्याच्या चर्चा झडत असतांना दैनिक लोकसत्ताने असंतांचे संत, अशा मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख मदर तेरेसा आणि चर्च संस्था यांचे बेगडी स्वरूप जनतेसमोर मांडणारा होता. या लेखाला साहजिकच असहिष्णु आणि मूलतत्त्ववादी ख्रिस्त्यांनी आक्षेप घेतला. दुसर्‍या दिवशी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांकडून क्षमा मागण्यात आली. हे कशामुळे घडले ? हे नंतर सर्वांनाच समजले. मिशनर्‍यांवर न झालेल्या आक्रमणांविषयीही बेंबीच्या देठापासून ओरडण्याची सवय माध्यमांना का लागली ? हे त्यावरून लक्षात येते.

Friday, 8 January 2016

सबनीस जिंकले, रसिक हरले!!


अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये.
तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती. त्यावेळी अभिव्य्कती स्वातंत्र्याचा एरवी गजर करणारी मंडळी थंडच होती. शरद पवार आणि विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेत होते. पण यादवांच्या समर्थनार्थ सरकारने काहीही केले नाही. बघ्याची भूमिक घेतली असे म्हटले तर वावगे ठरू नये. यादव काही महाबळेश्वरच्या त्या संमेलनात पोचलेच नाहीत. अध्यक्षाविना पार पडलेले ते एकमेव संमेलन असावे.

Saturday, 2 January 2016

नमस्कार !
मोदींनी पाकिस्तानला अचानक भेट दिली. राजकिय सामाजिक आणि मिडियाच्या वर्तुळात जरा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात काही घडो न घडो पण निखील वागळेंच्या चॅनलला खाऊ मिळाला आणि त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली एवढे नक्की

Monday, 30 November 2015

हे साहित्यिक कि निधर्म्यांची प्यादी ?

श्री. विक्रम भावे
     गेल्या काही दिवसांपासून अनेक पुरोगामी साहित्यिक आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते येत आहेत. त्यात आता संशोधकांनीही पुरस्कारवापसीची फॅशन अंगीकारली असल्याचे समजते. आजवर कित्येक अणू शस्त्रज्ञांचे गूढ मृत्यू झाले; पण संशोधकांना लोकशाही आणि देशहित धोक्यात आल्यासारखे कधीच वाटले नाही ?
१. पुरस्कारवापसी म्हणजे प्रसिद्धीची भाबडी आशा
     देशातील लोकशाही धोक्यात असून त्याचा निषेध करण्यासाठी काही साहित्यिक आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते गेले काही दिवस वाचनात येत आहेत. अर्थात् ही वृत्ते तेवढी वाचनात आली; पण खरंच पुरस्कार परत केल्याचे विश्‍वसनीय वृत्त अजूनही वाचायला मिळालेले नाही. अर्थात् पुरस्कारप्राप्तीच्या वेळी जी प्रसिद्धी मिळाली, तशी परत न मिळाल्याने निदान पुरस्कार परत करण्याच्या नावाखाली तरी प्रसिद्धी मिळेल, अशी भाबडी आशाही असावी. पुरस्कारातील प्रमाणपत्र परत केले; म्हणजे पुरस्कार परत केला, असे म्हणता येत नाही. स्मृतीचिन्ह, मानधन (शाल विरून गेली आणि नारळ साहित्यिकांनी खाल्ला असेल, असे गृहित धरू) या सर्व गोष्टीही परत करण्याची साहित्यिकांची सिद्धता आहे का ? तसे नसेल; तर मात्र हा प्रसिद्धीचा स्टंटच म्हटला पाहिजे.

Thursday, 5 February 2015

प्रॉक्सी वॉर : पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध आणि आंधळे भारतीय राज्यकर्ते !

 श्री. विक्रम भावे
भारताच्या गुप्तचर विभागात काम करणार्‍या एका अधिकार्‍याच्या भाषणात काही सूत्रे आली. भारताशी समोरासमोर टक्कर देणे कदापि शक्य नसल्याने पाकिस्तानने (म्हणजे आय.एस्.आय.ने) भारताविरुद्ध जवळजवळ २० वर्षांपूर्वीच एक छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) आरंभले आहे; मात्र आंधळ्या भारतीय राज्यकर्त्यांना त्यांची गंधवार्ताही नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. भारताच्या गुप्तचर यंत्रणांना या सर्व गोष्टींची माहिती असते; परंतु त्यांनी दिलेल्या माहितीचा आजवरच्या राज्यकर्त्यांनी जातीय राजकारणासाठी वापर केला. वेळ प्रसंगी गुप्तचर यंत्रणांना तोंडावर पाडण्याचे काम आजवरच्या निधर्मी राज्यकर्त्यांनी केले आहे. आता भारतात सत्तापालट झाला आहे. भाजप शासन या गोष्टी जाणून त्यावर शाश्‍वत तोडगा काढेल अशी आशा आहे
संकलक - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

Wednesday, 9 July 2014

पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे अनावृत्त पत्र !

प्रति,
मा. पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांस,
सप्रेम नमस्कार !
सर्वप्रथम भारताच्या १६ व्या लोकसभा निवडणुकीत आपण अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल आपले हिंदु विधीज्ञ परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन! भोंदू निधर्म्यांना आणि त्यांच्या 'धर्मनिरपेक्षता' नावाच्या अंधश्रद्धेला तडा दिल्याबद्दल देशातील समस्त हिंदू आपले अत्यंत आभारी आहेत.
आजवर काँग्रेसने भाजपला जातीयवादी संबोधून स्वत: मात्र घाणेरडे राजकारण केले आहे. या निवडणुकीत भारतातील हिंदु मतदारांनी काँग्रेसला आणि काँग्रेसच्या राजकारणाला तिलांजली दिली. हे केवळ मोदी यांच्या लाटेमुळे शक्य झाले, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यात संशयाला किंवा वादाला निश्चितच जागा नाही. आपल्या संपूर्ण प्रचारात कोणत्याही धार्मिक सूत्राला हात न घालता केवळ विकासाच्या सूत्रावर आपण भर दिला. मतांकरता अल्पसंख्यांकांच्या पुढे राज्यकर्त्यांनी लोळण घेण्याच्या ६५ वर्षांच्या परंपरेला तोडून आपण नवीन पायंडा पाडला आहे.
त्यामुळेच देशातील हिंदु मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही, याची खात्री आम्हाला आहेच; पण हिंदूबहूल भारतात हिंदूंच्या भावनांचा आदर राखून आपण आपल्या राज्यकारभाराच्या जोरावर या देशातील स्थान पक्के करू शकता, असे वाटते. देशातील काही सूत्रांवर प्रथम प्राधान्याने निर्णय घेणे देशहिताच्या आणि हिंदुत्वाचे शासन घट्ट होण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे, असे वाटते. हे निर्णय घेतल्याने देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाहीच. उलट ही प्रकरणे तातडीने मार्गी लागल्याने कायदा आणि सुव्यवस्था यांना पोषक असेच वातावरण निर्माण हाईल. 'धर्मनिरपेक्षते'च्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लाड पुरवण्याची काँग्रेसची (कु)संस्कृती नष्ट होऊन पारदर्शक प्रशासन आल्याची खात्री देशातील जनतेला निश्चित पटेल.
ही सूत्रे पुढीलप्रमाणे

हिंदूंनो, मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाला रोखण्यासाठी या निकालाचा आधार घ्या !

चर्चकडून होणार्या ध्वनीप्रदूषणावर बंदी घालणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ! 
 श्री. संजीव पुनाळेकर
     सध्याच्या काळात धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात असतांनाही त्याविषयी योग्य आणि कडक कारवाई करण्याचे सामाजिक दायित्व असणारे सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे. मशिदींतून वेळी-अवेळी केला जाणारा भोंग्यांचा कर्णकर्कश आवाज हे त्याचेच एक उदाहरण आहे. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी कायदा होऊन अनेक दशके लोटली असतांनाही सामान्य जनतेला त्यांची इच्छा नसतांना या भोंग्यांचा आवाज प्रतिदिन नियमित ५ वेळा ऐकावा लागतो. कित्येकदा जागरूक नागरिक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यास पोलीसच स्वत:ची हतबलता व्यक्त करतात. 'आम्ही कारवाई केल्यास वरिष्ठांना आवडणार नाही', असे म्हणतात. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यास 'बाकीच्या नागरिकांना त्रास होत नाही; तुम्हालाच का होतो ?' असा निलाजरा प्रश्न विचारतात. काही वेळेस तक्रारदाराने वरिष्ठांकडे दाद मागण्यास जाऊ असे सांगितल्यास 'न्यायालयात जा'. 'इथे येऊ नका'. अशी उद्धट उत्तरेही पोलिसांकडून मिळतात. 'शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये' अशी एक म्हण आहे. न्यायालयीन प्रक्रिया ही फार विलंबाची आणि खर्चिक आहे. त्यामुळे अशावेळी संबंधित तक्रारदार निराश होतो आणि मशिदींच्या भोंग्यांचा जाच असाच चालू रहातो. तामिळनाडूमधील काही जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन संघटितपणे न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर एका बलाढ्य धर्मसंस्थेला न्यायालयापुढे कसे झुकावे लागले, या विषयीची कहाणी सुरस आणि स्फुरणदायी ठरेल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ख्रिस्ताब्द २००० मध्ये दिलेल्या निवाड्याची माहिती येथे देत आहे. - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.