हे साहित्यिक कि निधर्म्यांची प्यादी ?
![]() |
| श्री. विक्रम भावे |
गेल्या काही दिवसांपासून अनेक पुरोगामी साहित्यिक आपापले पुरस्कार
परत करत असल्याची वृत्ते येत आहेत. त्यात आता संशोधकांनीही पुरस्कारवापसीची
फॅशन अंगीकारली असल्याचे समजते. आजवर कित्येक अणू शस्त्रज्ञांचे गूढ
मृत्यू झाले; पण संशोधकांना लोकशाही आणि देशहित धोक्यात आल्यासारखे कधीच
वाटले नाही ?
१. पुरस्कारवापसी म्हणजे प्रसिद्धीची भाबडी आशा
देशातील लोकशाही धोक्यात असून त्याचा निषेध करण्यासाठी काही साहित्यिक
आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते गेले काही दिवस वाचनात येत आहेत.
अर्थात् ही वृत्ते तेवढी वाचनात आली; पण खरंच पुरस्कार परत केल्याचे
विश्वसनीय वृत्त अजूनही वाचायला मिळालेले नाही. अर्थात्
पुरस्कारप्राप्तीच्या वेळी जी प्रसिद्धी मिळाली, तशी परत न मिळाल्याने
निदान पुरस्कार परत करण्याच्या नावाखाली तरी प्रसिद्धी मिळेल, अशी भाबडी
आशाही असावी. पुरस्कारातील प्रमाणपत्र परत केले; म्हणजे पुरस्कार परत केला,
असे म्हणता येत नाही. स्मृतीचिन्ह, मानधन (शाल विरून गेली आणि नारळ
साहित्यिकांनी खाल्ला असेल, असे गृहित धरू) या सर्व गोष्टीही परत करण्याची
साहित्यिकांची सिद्धता आहे का ? तसे नसेल; तर मात्र हा प्रसिद्धीचा स्टंटच
म्हटला पाहिजे.
२. काँग्रेसी राजवटीत पुरस्कार दिल्या गेलेल्या साहित्यिकांची हीच पत का ?
पुरस्कारवापसी करणार्या अनेकांना काँग्रेसच्या राजवटीत पुरस्कार दिले
गेले होते. काँग्रेसच्या राजवटीत गांधी-नेहरू घराण्याच्या पायाशी इमान
वाहिलेल्या लोकांना साहित्यिक वगैरे समजले जात होते. इतकेच काय या
घराण्यांच्या पायाशी निष्ठा वाहिली, तर राष्ट्रपतीसुद्धा होता येते, असा एक
मतप्रवाह या देशात आहे, असे म्हणतात. असो; पण काँग्रेसच्या राजवटीत
ज्यांना साहित्यिक समजले गेले, त्यांना आताच भाजपच्या शासनकाळात लोकशाहीची
चिंता वाटू लागली आहे.
५२ रामभक्तांना रेल्वेत जिवंत जाळले गेल्यावर लोकशाही धोक्यात आली
नाही, संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आसाम, नागालँड आणि
केरळ राज्यांत हत्या झाल्यावर या देशातील लोकशाही कधी धोक्यात आली नाही.
स्वामी लक्ष्मणानंदांसारख्या एका वयोवृद्ध संन्याशाला गोळ्या घालून ठार
मारल्यावर या देशातील लोकशाही धोक्यात आली नाही. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी
७२ पोलिसांना ठार मारले, तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही, भिवंडीत जगताप
आणि गांगुर्डे या दोन पोलिसांना धर्मांधांनी चटके देऊन, बोटे छाटून, लिंग
छाटून, दगडाने ठेचून आणि मग जाळून ठार मारले, तेव्हा लोकशाही धोक्यात आली
नाही. मेरठ येथील मदरशात एका मौलवीने कित्येक तरुणींना कोंडून त्यांच्यावर
बलात्कार करून त्यांना विकण्याचा प्रयत्न केला; पण या देशातील लोकशाही कधी
धोक्यात आली नाही, आझाद मैदानात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदू महिला
पोलिसांवर अत्याचार केले, तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही; पण दादरीत एक
मुसलमान मेला, तर लोकशाही धोक्यात आल्याचे स्वप्न साहित्यिकांना पडते.
यावरूनच या वापसी फेम साहित्यिकांची पत लक्षात येते.
३. उशिरा का होईना, काँग्रेसी साहित्यिकांना वापसीचे शहाणपण सुचले !
वाट्टेल त्याला साहित्यिक समजून पुरस्कार वाटण्याचे धंदे काँग्रेसच्या
राजवटीत झाले. त्यामुळे एका अर्थाने ते पुरस्कार वाया गेले होते, असेच
म्हणायला हवे. हे वापसी करण्यात आलेले पुरस्कार आता योग्य व्यक्तींना देता
येतील. त्यामुळे पुरस्कारांची पत सुधारेल; कारण डर्टी पिक्चर मध्ये बोल्ड
सीन करणार्या विद्या बालनसारख्या नटीला आणि स्वत:ला समाजसेवक म्हणवत अनेक
घोटाळे करणार्या हिंदूविरोधी दाभोलकरांना एकच पुरस्कार दिला जातो. असे
असतांना पुरस्काराची किंमत ती काय उरणार ? तेव्हा पुरस्कारवापसी म्हणून जे
काही चालू आहे, ते उत्तमच आहे, असे म्हणायला हवे. काँग्रेसच्या राजवटीत
साहित्यिक समजल्या गेलेल्या या लोकांना उशीरा का होईना; पण हे शहाणपण
सुचले, हे ही नसे थोडके !
४. निधर्मी नेत्यांनी स्वत:ला मिळालेला एकही पुरस्कार परत केला नाही !
एका अर्थाने पाहिले, तर काँग्रेसी विचारसरणीचे हे साहित्यिक म्हणजे
निधर्म्यांची प्यादीच आहेत. मोदी लाटेत निधर्म्यांचा धुव्वा उडाल्यावर भाजप
शासनाची नाचक्की करण्याचे जे अनेक प्रयत्न निधर्म्यांनी केले, त्यापैकी हा
एक प्रयत्न आहे. स्वत:च्या शासनकाळात अनेक लोकांना पुरस्कार वाटून त्यांना
या निधर्म्यांनी मिंधे करून ठेवले होते. आता भाजपची कोंडी करण्यासाठी हे
साहित्यिक निधर्म्यांच्या मिठाला जागत पुरस्कार परत करत आहेत. त्यामुळे या
साहित्यिकांचा प्यादी म्हणून वापर केला जात आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरत
नाही. इतक्या साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत केले; पण टिळक आणि शिवाजी
विद्यापिठांनी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांना दोन वेळा डी.लीट केेले.
त्यांनी कधी पदवी परत केली नाही. न्या. रामाशास्त्री प्रभुणे
प्रतिष्ठानकडून शरद पवार यांना सामाजिक न्याय पुरस्कार दिला गेला; पण
पवारांनी तो कधी परत केला नाही. छगन भुजबळ यांना माळी समाज प्रबोधिनी आणि
सावता माळी महाराज सेवाभावी न्यासाकडून समाजभूषण पुरस्कार देण्यात आला
होता. तो त्यांनी परत केला नाही. या भुजबळांना वीरमणी समाजिक न्याय
पुरस्कार देण्यात आला. त्या पुरस्कारासोबत १ लक्ष रुपयेही देण्यात आले, ते
भुजबळांनी परत केले नाहीत. सुशीलकुमार शिंदे यांना नवशक्ती जीवनगौरव
पुरस्कार देण्यात आला; पण तो त्यांनी परत केला नाही.
५. आताच्या शासनाने खर्या साहित्यिकांना पुरस्कार देण्याची प्रथा पाडावी !
थोडक्यात काय ? तर या निधर्म्यांनी स्वत:चे पुरस्कार जपून ठेवले आहेत;
पण निधर्मी शासनकाळात ज्यांना साहित्यिक ठरवले गेले, त्यांचे पुरस्कार
सत्तेच्या बाजारात कवडीमोल ठरवले जात आहेत. या तथाकथित साहित्यिकांना हे
कळत नसेल, तर त्यांचे दुर्दैव आणि आणि कळत असून निधर्म्यांच्या मिठाला
जागण्यासाठी ही पुरस्कारवापसी चालू असेल, तर ते महाराष्ट्राचे सुदैव आहे.
आताच्या शासनाने यापुढे तरी खर्या साहित्यिकालाच पुरस्कार देण्याची प्रथा
महाराष्ट्रात चालू करावी !
- श्री. विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद, मुंबई.

No comments:
Post a Comment