Thursday, 5 February 2015

प्रॉक्सी वॉर : पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध आणि आंधळे भारतीय राज्यकर्ते !

 श्री. विक्रम भावे
भारताच्या गुप्तचर विभागात काम करणार्‍या एका अधिकार्‍याच्या भाषणात काही सूत्रे आली. भारताशी समोरासमोर टक्कर देणे कदापि शक्य नसल्याने पाकिस्तानने (म्हणजे आय.एस्.आय.ने) भारताविरुद्ध जवळजवळ २० वर्षांपूर्वीच एक छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) आरंभले आहे; मात्र आंधळ्या भारतीय राज्यकर्त्यांना त्यांची गंधवार्ताही नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. भारताच्या गुप्तचर यंत्रणांना या सर्व गोष्टींची माहिती असते; परंतु त्यांनी दिलेल्या माहितीचा आजवरच्या राज्यकर्त्यांनी जातीय राजकारणासाठी वापर केला. वेळ प्रसंगी गुप्तचर यंत्रणांना तोंडावर पाडण्याचे काम आजवरच्या निधर्मी राज्यकर्त्यांनी केले आहे. आता भारतात सत्तापालट झाला आहे. भाजप शासन या गोष्टी जाणून त्यावर शाश्‍वत तोडगा काढेल अशी आशा आहे
संकलक - श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद
१. प्रॉक्सी वॉर अर्थात् छुपे प्रातिनिधीक युद्ध ! 
प्रॉक्सी वॉर म्हणजे छुपे प्रातिनिधीक युद्ध आहे. सर्वांना जंगली श्‍वापदांच्या शिकार करण्याच्या पद्धती माहीत आहेत. वाघ किंवा सिंह सरळ आक्रमण करून नरडीचा घोट घेतात आणि भक्ष्यस्थानी असलेल्या प्राण्याला संपवतात; मात्र जंगली कुत्र्यांची शिकारीची पद्धत वेगळी असते. भक्ष्यावर ते वाघासारखे सरळ आक्रमण करत नाहीत. जंगली कुत्रे त्या भक्ष्याचा पाठलाग करतात आणि धावता धावता त्याच्या शरिराचे लचके तोडतात. त्यामुळे रक्तस्राव होऊन तो प्राणी पळता पळता खाली पडतो आणि गतप्राण होतो.
भारताशी समोरासमोर टक्कर देण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. ते धैर्यही त्यांच्यात नाही. (हे आजवरच्या आक्रमणांवरून सिद्ध होते) जंगली कुत्र्यांप्रमाणे अनेक आघाड्यांवर भारताचे लचके तोडून भारताला कमकूवत करणे आणि मग भारताची शिकार करणे, ही पद्धत पाकिस्तानने म्हणजे त्यांची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने अवलंबली आहे.
२. छुप्या प्रातिनिधीक युद्धाची भूमी 
सर्वसामान्य भारतियांची युद्धाची कल्पना ठरलेली असते. आकाशात विमानांची घरघर चालू आहे. रणगाडे रोरावत जात आहेत. सैनिक आपापली शस्त्रे सांभाळत आक्रमण करत आहेत. तोफांचे आवाज येत आहेत, बंदुकांचे आवाज येत आहेत, घायाळांच्या आरोळ्या ऐकू येत आहेत आणि सरते शेवटी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या भूमीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आहे, अशी चित्रे आपल्या डोळ्यांसमोर उभी रहातात. कारण युद्ध म्हणजे हेच सर्व, अशी आपणा सर्वांची कल्पना आहे; पण आता युद्धाच्या संकल्पना पूर्णपणे पालटल्या आहेत. दोन देशांची सीमा ही युद्धभूमी राहिलेली नाही. भारतातील राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, व्यवसाय आणि उद्योगधंदे हे सर्व म्हणजे युद्धभूमी झाली आहे. इतकेच काय भारतातील गुन्हेगारी जगतही या प्रॉक्सी वॉरची युद्धभूमी झाली आहे.
३. छुप्या प्रातिनिधीक युद्धातील सैनिक 
ज्याप्रमाणे दोन देशांची सीमा ही आता युद्धभूमी राहिलेली नाही, त्याचप्रमाणे फक्त सैन्यातील जवानांनीच देशरक्षण करावे, हे गृहितकही आता पालटले आहे. ते केवळ जवानांचेच कर्तव्य राहिलेले नाही. ज्याप्रमाणे देशातील प्रत्येक क्षेत्र हे प्रॉक्सी वॉरची युद्धभूमी झालेले आहे, त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिक या प्रॉक्सी वॉरचे कळत नकळत सैनिक झालेले आहेत. स्पष्टच सांगायचे झाले, तर भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिक या प्रॉक्सी वॉरचा, म्हणजे प्रातिनिधीक युद्धाचा एक भाग बनला आहे; मात्र या गोष्टीची जाणीव भारतातील ९९ टक्के लोकांना नसावी. भारतातील प्रत्येक देशभक्ताला ही जाणीव असेल, तर देशाच्या सीमेवर आपल्या सैनिकांना लढण्याची वेळच येणार नाही. केवळ गरिबी आणि उपासमारीनेच पाकिस्तान संपून जाईल. 
४. प्रॉक्सी वॉरची लक्षणे आणि परिणाम 
हे वाचल्यावर प्रत्येकालाच या प्रॉक्सी वॉरमधील, म्हणजे प्रातिनिधीक युद्धातील मी एक सैनिक आहे, याची जाणीव होईल. भारत स्वतंत्र झाला तोच मुळी काँग्रेसच्या हातात पडला. त्याचे परिणाम आपण पहात आहोतच. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लाड करण्याचा जो सपाटा काँग्रेसने आणि तिच्या बगलबच्च्यांनी लावला होता, त्यामुळे भारतीय राजकारण प्रॉक्सी वॉरची युद्धभूमी बनले. पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेला जे काम करणे अवघड जाते, ते आपल्याकडील राजकारणी आनंदाने करत असतात. त्यामुळे असेही म्हणता येऊ शकते की, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आपल्याच देशातील काही लोकांचा भारताविरुद्धच वापर करत आहे; पण कदाचित् त्या लोकांना आपला वापर करून घेतला जातो आहे, या गोष्टीची कल्पना नसावी आणि जर ते जाणीवपूर्वक तसे वागत असतील, तर ते राष्ट्रद्रोह नावाचे फार मोठे पाप करत आहेत, याची जाणीव त्यांना नसावी, असे वाटते.
४ अ. भारतीय राजकारणातील प्रॉक्सी वॉरची लक्षणे आणि परिणाम
४ अ १. कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनचा उदोउदो करणारे नेते ! : अमेरिकेने आतंकवादी ओसामा बीन लादेनला शोधून काढून त्याच्या घरात घुसून त्याचा खात्मा केला आणि जागतिक व्यापार केंद्रावरील आक्रमणाचा सूड उगवला. जगापुढे हा आदर्श अमेरिका घालून देत असतांना आमच्याकडील एका मोठ्या राज्याचा माजी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेला एक राजकारणी त्या आतंकवाद्याचा लादेनजी म्हणून आदरार्थी उल्लेख करत होता. एक जागतिक संकेत आहे, जो हातात शस्त्र घेऊन, हिंसाचार करून काही साध्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रथम बंडखोर अथवा आतंकवादी म्हटले जाते. तो यशस्वी झाला, तर त्याचा उदो उदो होतो आणि उत्तम नेता म्हणून त्याची भलावण होते. याचे उदाहरण म्हणजे नेपाळमधील प्रचंड (नेपाळचे माजी पंतप्रधान आणि माओवादी नेते). तो माणूस जर अपयशी झाला किंवा मारला गेला, तर शेवटपर्यंत तो बंडखोर आणि खलनायक म्हणूनच गणला जातो. याचे उदाहरण म्हणजे श्रीलंकेतील व्ही. प्रभाकरन्.
४ अ १ अ. परिणाम : ओसामा हा इस्लामेतर जगात खलनायक म्हणूनच गणला जाणार; पण त्याची भलावण करून त्याच्या पापांचे गांभीर्यच न्यून केले गेले. त्यामुळे फार मोठा चुकीचा संदेश एका मोठ्या समुदायापर्यंत गेला. आपल्याकडील त्या राजकारण्याने हे काम परस्पर करून टाकले. आयएस्आयचे (पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा) श्रम त्याने वाचवले.
४ अ २. नक्षलवाद्यांशी घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तीला नियोजन आयोगामध्ये पद मिळणे : आपल्याकडे बिनायक सेन नावाच्या एका व्यक्तीला नक्षलवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याच्या कारणावरून अटक झाली होती. न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांना काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आणि त्याची वर्णी थेट नियोजन आयोगाच्या वैद्यकीय विभागाच्या प्रमुखपदी लागली.
४ अ २ अ. परिणाम : जर खरोखरच बिनायक सेन यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असतील, तर एक गोष्ट येथे स्पष्ट होते की, भारताच्या नियोजन आयोगापर्यंत नक्षलवाद्यांचे एक स्वतंत्र चॅनल(मार्ग) चालू झाला. ज्या न्यायालयाने बिनायक सेनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्या न्यायालयाच्या विश्‍वासार्हतेवर, म्हणजेच न्यायव्यवस्थेच्या विश्‍वासार्हतेवरच यामुळे प्रश्‍न निर्माण झाला.
४ अ ३. भारताच्या पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणारी विधाने करणारे राजकीय नेते ! : एका राजकीय नेत्याने दाऊदला पकडून भारतात आणणे अशक्य आहे, असे विधान केले होते. खरेतर हा राजकारणी पोलीस दलाशी किंवा संरक्षण विभागाशी संबंधित नव्हता किंवा दाऊदला भारतात आणण्याच्या प्रक्रियेचा भागही नव्हता; परंतु तरीही या राजकारण्याच्या तोंडून हे विधान आलेले आहे. दाऊदच्या गुन्ह्यांचे गांभीर्य न्यून करण्याचा तो प्रयत्न होता का ?
४ अ ३ अ. परिणाम : अशा विधानांमुळे भारताच्या पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होते. त्याचा लाभ दाऊदला होतो. आय.एस्.आय.ला जे काम करायला श्रम पडले असते, ते काम या विधानाने परस्पर करून टाकले.
४ अ ४. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी निधर्म्यांनी रचलेला कुटिल डाव ! : समझौता एक्स्प्रेसमध्ये भीषण स्फोट होऊन जवळजवळ ६० ते ७० पाकिस्तानी नागरिक त्यात मरण पावले होते. त्या स्फोटाचे खापर हिंदुत्ववादी संघटनांवर फोडून भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे, हे भासवण्याचा प्रयत्न भारतातील निधर्म्यांनी चालवला आहे. समझौता एक्स्प्रेसमधील स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी लष्कराचे आर्.डी.एक्स. पुरवले, अशी भारतातील निधर्म्यांची (मुसलमानांच्या चाकरांची) ओरड आहे; मात्र लष्कर म्हणते, लष्करात असे आर्.डी.एक्स गोणीत भरून ठेवलेले नसते की, ते कोणीही जाऊन घ्यावे आणि इतरांना पुरवावे. त्याच वेळी दुसरीही गोष्ट घडलेली आहे, जी भारतीय प्रसारमाध्यमांनी भारतियांपुढे येऊच दिलेली नाही. ती अशी की, समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाल्यावर डेव्हिड हेडलीची मोरक्कोतील बायको अमेरिकेच्या वकिलातीत (दूतावासात) येऊन ओरडून सांगत होती की, हा स्फोट माझ्या नवर्‍याने म्हणजे डेव्हिड हेडलीने घडवला आहे; पण त्या गोष्टीकडे आजही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
४ अ ४ अ. परिणाम : हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी निधर्मी कुठल्याही थराला जाऊ शकतात, याची खात्री या देशातील हिंदूंना झाली आणि त्यांनी निधर्म्यांना स्पष्ट अल्पमतात आणून ठेवले. ज्याचा राग येऊन भविष्यात हेच निधर्मी देशात जातीय दंगे घडवतील आणि त्याचे खापर सत्ताधारी हिंदुत्ववादी म्हणविणार्‍या पक्षावर फोडतील.
४ आ. भारतीय समाजकारणातील प्रॉक्सी वॉरची लक्षणे आणि परिणाम
४ आ १. जातीयवाद पसरवणार्‍या संघटनांमुळे अल्पसंख्यांकांच्या संघटनांना मजबुती येऊन आय.एस्.आय.चे काम सोपे होणे : आपल्या देशात काही संघटना आहेत, ज्या एका विशिष्ट जातीचा अभिमान सांगतात. स्वत:च्या जातीचा अभिमान असण्यात चूक काहीच नाही; पण स्वत:च्या जातीचा अभिमान सांगतांना इतर जातींना हीन लेखणे, इतर जातीच्या लोकांचा उपहास करणे, अत्यंत खालच्या थराला जाऊन इतर जातींविषयी, इतर जातीतील भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींविषयी, स्त्रियांविषयी लेखन प्रसिद्ध करणे, भाषणांतून किंवा मिळेल त्या संधीचा इतर जातींच्या उपहासासाठी लाभ घेणे, हेच आद्य कर्तव्य असल्याच्या थाटात या संघटनांची दुकाने चालत असतात.
४ आ १ अ. परिणाम : देशात बहुसंख्य असलेल्या समाजाला अशा छोट्या छोट्या समूहात विभक्त झाल्याने देशातील अल्पसंख्यांकांच्या संघटनांना अनायासे मजबूती येते. आय.एस्.आय.सारख्या संघटनेला भारतात हे काम करणे अवघड आहे; परंतु आपल्याकडील अशा जातीयवाद पसरवणार्‍या संघटना आय.एस्.आय.चे काम सोपे करीत आहेत.
४ आ २ : जातीच्या कुबड्यांमुळे देशाच्या कुठल्याही क्षेत्राला सक्षम पाय असलेले नेतृत्व लाभणार नसणे : आपल्या देशातील राजकारणाचे सर्वांत मोठे दुर्दैव हे की, संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू जात हा आहे. शुद्ध राष्ट्रहित केंद्रस्थानी ठेवून या देशाचे राजकारण कधीच हालले नाही. ठराविक जातीच्या लोकांची मते मिळवण्यासाठी त्या जातीच्या उमेदवाराला तिकीट देणे, ठराविक जातीला आरक्षण देण्याचे खूळ काढणे आणि त्यावरून राजकारण करणे, या गोष्टी या देशात आजवर चालत आल्या आहेत.
४ आ २ अ. परिणाम : शुद्ध राष्टहित जपणार्‍या उमेदवाराला या देशात राजकारणाची संधी कधीच मिळू शकणार नाही. जातीच्या कुबड्यांमुळे देशाच्या कुठल्याही क्षेत्राला सक्षम पाय असलेले नेतृत्व लाभणार नाही. पर्यायाने देशातील सर्वच गोष्टींची गुणवत्ता खालावून देश कोलमडेल. आय.एस्.आय.ला हे करणे कठीण गेले असते; पण भारतातील काही जातीयवादी राजकारणी आय.एस्.आय.चे काम सोपे करत आहेत.
४ आ ३. भारतातील तरुणांना व्यसनाधीन करण्याची पद्धतशीर मोहीम राबवली जाणे : आज जगात सगळ्यात अधिक तरुणवर्ग भारताकडे आहे. ती शक्ती, बुद्धी, ऊर्जा संघटित करून राष्ट्रहिताच्या ध्येयाप्रती लावल्यास भारत कुठल्या कुठे जाईल. तसे होऊ नये; म्हणून भारतातील तरुणांना व्यसनाधीन करण्याची पद्धतशीर मोहीम राबवली जात आहे. मादक पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेतील मूल्यापेक्षा अत्यंत अल्प दरात ते मादक पदार्थ भारतात उपलब्ध करून दिले जात आहेत.
४ आ ३ अ. परिणाम : एखादी प्रथा पडावी, त्याप्रमाणे श्रीमंत लोकांची मुले आज रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थांचे सेवन करून अर्ध किंवा पूर्ण नग्न होऊन धिंगाणा घालतांना दिसत आहेत. अशा पार्ट्यांवर धाडी मारून त्यांना अटक करतांनाच्या ब्रेकींग न्यूज पहायला मिळतात; पण पुढे त्या बिगडे दिल शहजाद्यांना शिक्षा झाल्याची ब्रेकींग न्यूज कधीच पहायला मिळत नाही. देशाची तरुण पिढी वाया जावी, ही शत्रूराष्ट्राची इच्छा आहेच. भारतीय राज्यकर्ते आणि श्रीमंत आई-बाप शत्रूराष्ट्राची ही इच्छा अनायासे पूर्ण करत आहेत. (क्रमश:)

No comments:

Post a Comment